मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५६ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ५६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ५६ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर तमपूर्व नरं दृष्ट्वा धात्री चुक्रोश भीतवत् । तच्छुत्वाऽभ्यद्रवत्क्रुद्धो जाम्बवान्बलिनां वरः ॥२१॥परम विकराळ महाद्भुत । देखतां बाळक अकस्मात । आक्रंदोनि मूर्च्छागत । सळोनि पडत ज्यापरी ॥७९॥तैसीं आस्वलें श्वापदजाती । पर्वतीं विवरीं ज्यांची वसती । अपूर्व देखोनि नराकृति । धात्री अवचिती आक्रंदे ॥१८०॥ऐकोनि धात्रीचा आक्रोशगजर । सक्रोध धांविला ऋक्षेश्वर । बळिष्ठांमाजि बळिया वीर । जो अवतार ब्रह्म्याचा ॥८१॥कळीकाळाचा प्रसूतिपवन । लागतां विपरीत क्रियाचरण । तेंचि प्रत्यक्ष प्रवर्तमान । ऐका दुश्चिह्न उदेलें ॥८२॥पिता विष्णु तो वासुदेव । पुत्र ब्रह्मा जो ऋक्षराव । पित्यापुत्रांमाजि माव । युद्ध अपूर्व मांडिलें ॥८३॥पुत्र उन्मत्त नोळखे पिता । आंगीं बळाची उद्धतता । जाणोनि पुत्राची योग्यता । तदनुरूपता येरू नटे ॥८४॥वृद्ध पिता बळिष्ठासी । जाणोनि दंडी स्वपुत्रासी । तेंवि पुराणपुरुष नववपूसीं । जाम्बवतासीं युद्ध करी ॥१८५॥स वै भगवता तेन युयुधे स्वामिनात्मनः । पुरुषं प्राकृतं मत्वा कुपितो नानुभाववित् ॥२२॥आपुला स्वामी श्रीभगवंत । तेणेंसीं तो जाम्बवत । प्रतापक्षोभें युद्ध करीत । पुरुष प्राकृत मानूनी ॥८६॥कोधाचिये भरला भरीं । ऐश्वर्याची तेणें थोरी । जाणोनि प्राकृत पुरुषापरी । समकेसरी संघटला ॥८७॥आस्वलयुद्धाची परिभाषा । वश्य होवोनि क्रोधावेशा । सर्वकौशल्यें जगदधीशा । तो त्यासरिसा युद्ध करी ॥८८॥द्वंद्वयुद्धं सुतुमुलमुभयोर्विजिगीषतोः । आयुधाश्मद्रुमैर्दोर्भिः क्रव्यार्थे श्येनयोरिव ॥२३॥द्वंद्वयुद्धा पेटले दोन्ही । साह्य नाहींच कोणा कोणी । दोघां विजयाची शिराणी । निकरेंकरूनि संघटती ॥८९॥परम तुमुल निर्वाण युद्ध । दोघे वीर महाप्रसिद्ध । करिते झाले तो प्रबंध । कोण प्रबुद्ध वदों शके ॥१९०॥क्रव्य म्हणिजे आमिष जाण । तदर्थ भांडती जैसे श्येन । परस्परें घेऊं पाहती प्राण । तैसे दारुण भिडताती ॥९१॥जैसें विस्तीर्ण पाताळ । तैसें जाम्बवताचें बिळ । वृक्ष वल्ली जळ पुष्कळ । अतिसोज्वळ श्रीमंत ॥९२॥ऐसिये स्थळीं प्रचंड बळी । दोघे युद्ध करिती सळीं । निघे उपटती पाताळीं । वर्षाकाळीं घन जैसे ॥९३॥जाम्बवतें अकस्मात । कृष्णहृदयीं मुष्टिघात । वोपूनि पाडिला व्यस्तखस्त । मूर्च्छागत करूनियां ॥९४॥जैसा द्यूतकाराचा भाव । प्रथम आपण हारवी डाव । तैसा मूर्च्छित पडला देव । आस्वला हांव दुणावली ॥१९५॥हांवे चढोन जाम्बवत । पुन्हा ओपितां मुष्टिघात । क्रुष्ण लागह्वें धरूनि हात । आंसडूनियां पाडिला ॥९६॥झोंकासरसा तोंडघसी । सवेग आदळला पृथ्वीसी । जानू ललाट घ्राणमुखासी । रक्तप्रवाह लागले ॥९७॥तेणें थरारिला ऋक्ष । म्हणे हा बलिष्ठ योद्धा दक्ष । उठोनि घेतला प्रचंड वृक्ष । तेणें कंजाक्ष ताडिला ॥९८॥वृक्षप्रहार पडतां शिरीं । कृष्णें धरिला वरचेवरी । हिरोनि घेतला बलात्कारीं । आस्वलाशिरीं ताडावया ॥९९॥तेणें उसळोनि सवेगें । ऋक्षें वांचविलीं निजाङ्गें । शतधनुष्यें सरोनि मागें । बळें अभंगें आवेशला ॥२००॥उपडुनि घेतला प्रचंड ताल । सक्रोधें जैसा प्रळयकाळ । हृदयीं ताडूनियां गोपाळ । केली विशाळ गर्जना ॥१॥कृष्णें चुकवूनि तालघात । वृक्षें ताडिला जाम्बवत । मूर्च्छित पाडिला एक मुहूर्त । पुन्हा नधरत क्षोभला ॥२॥मग राहोनि दूरच्या दुरी । वृक्ष टाकिले सहस्रवरी । कृष्णें वारिले वरिच्या वरी । घाव शरीरीं नादळतां ॥३॥वृक्षें वृक्षां वारी हरी । देखोनि ऋक्ष कोपला भारी । राम स्मरोनि अभ्यंतरीं । मग पाथरी अभिवर्षे ॥४॥म्हणे माझिया प्रतापापुढें । न थरे कुंभकर्ण बापुडें । म्यां लंकेचे पाडिले हुडे । केलें वेडें मज येणें ॥२०५॥म्हणोनि टाकी शिळा धोंडी । गगनीं उफाळे दुपांडीं । घोष गाजवी ब्रह्मांडीं । दे मुरकुंडी धरावया ॥६॥येरू वृक्षहस्तें करोनी । धोंडी झोडूनि पाडि धरणी । आस्वल आंगीं जडतां दुरूनी । वृक्षें लक्षूनि झोडिला ॥७॥तो साहोनि वृक्षघात । सवेग उसळला गगनांत । विशाळ शीळा घेऊनि त्वरित । निक्षेपित हरिमाथां ॥८॥कृष्णें मस्तकीं पडतां शिळा । वृक्ष हातींचा विसर्जिला । वरच्या वरी धरिली हेळा । तेणें ठोकिला ऋक्षपति ॥९॥ऋक्षप मारी जे जे पाषाण । वरच्या वरी ते धरी श्रीकृष्ण । तेणें आस्वला करी ताडन । निर्भय पूर्ण स्वस्थानीं ॥२१०॥प्रथम त्रिरात्र लटापटी । दहा दिवस वृक्षकाठी । सप्तरात्र शिळावृष्टि । अंगसंघट्टी याउपरी ॥११॥शिळायुद्धीं नावरे हरि । जाम्बवत क्षोभला भारी । मुष्टिघातें हृदयावरी । ताडिला हरि वज्रवत् ॥१२॥कृष्णें साहोनि मुष्टिघात । लघुलघवें मारिली लात । उलथोन पाडिला जाम्बवत । विचकोनि दांत पद खोडी ॥१३॥आपुला भक्त हें जाणिनि हरि । मदगर्वातें मात्र परिहरी । वांचूनि जेवें सहसा न मरी । दैत्यापरी क्षोभोनी ॥१४॥ऋक्ष मूर्च्छना सांवरोनि । झेपावला कव घालूनी । मुष्टि मारिली कृष्णमूर्ध्नी । येरें वदनीं ताडिला ॥२१५॥मग परस्परें मुष्टिप्रहार । करिते झाले निरंतर । मुसळीं पृथककंडनपर । जेंवि सत्वर वधूयुग्म ॥१६॥मुखीं मस्तकीं उरीं शिरीं । पृष्ठग्रीवाकटिकर्पूरीं । नितंबदेशीं जानुजठरीं । मुष्टिप्रहारीं ताडिती ते ॥१७॥कटाकुक्षिवक्षस्थळीं । नासाचिबुकीं कर्णीं कपोळीं । स्कंधीं दंतीम नेत्रयुगळीं । मर्मस्थळीं वज्रमुष्टि ॥१८॥प्रजनीं वृषणीं पायुरंध्रीं । जंघागुल्फीं पदपदाग्रीं । सक्थिबस्तिनाभीवरी । करपदप्रहारीं हाणिताती ॥१९॥पृष्ठवंश अंस ऊरु । मणिबंधादि देश अपर । लक्षूनि निकरें मुष्टिप्रहार । ताडिती वर्जपडिपाडें ॥२२०॥अष्टौ रात्र महाघोर । अंगसंघट्टनद्वंद्वसमर । परस्परें मुष्टिप्रहार । महाक्रूर संग्राम ॥२१॥आसीत्तदष्टाविंषाहमित्यरेतरमुष्टिभिः । वज्रनिष्पेषपरुषैरविश्रममहर्निशम् ॥२४॥एवं अट्ठावीस अहोरात्र । युद्ध केलें घोर विचित्र । विद्युत्पातासम कठोर । मुष्टिप्रहार परस्परें ॥२२॥जैसीं विंध्याद्रीचीं शिखरें । इंद्र भंगी वज्रप्रहारें । तैसीं उभयतांचीं गात्रें । भंगतीं निकरें मुष्टितळीं ॥२३॥अट्ठावीस अहोराती । न लावितां नेत्रपातीं । युद्ध केलें ऐसिये स्थिती । अविश्रमगती परस्परें ॥२४॥तया युद्धचा फलितार्थ । जय पराजय कोणा प्राप्त । तोहि ऐका देऊनि चित्त । मूळश्लोकोक्त संक्षेपें ॥२२५॥कृष्णष्मुटविनिष्पातनिष्पिष्टांगोरुबंधनः । क्षीणसत्त्वः स्विन्नगात्रस्तमाहातीव विस्मितः ॥२५॥कृष्णमुष्टीचे निष्ठुर प्रहार । वज्राहूनि अतिकठोर । लागतां ऋक्षाचें सर्व शरीर । झालें चकचूर निष्पिष्ट ॥२६॥ऊरुबंधनें प्रौढसंधि । बाहू कूर्परादि मणिबंधीं । कळा लागल्या बंधोबंधीं । जानुजघनीं गुल्फादिकें ॥२७॥ढिले झाले सर्व सांदे । उतरोनि गेलें आढ्यत्वमांदें । सर्वाङ्ग व्यापिलें प्रबळ तोंदें । आस्वल मोदें सांडवलेरं ॥२८॥दुःकें धैर्या झाला भंग । स्वेदें डबडबिलें सर्वाङ्ग । सुटला मदगर्वाचा संग । मग श्रीरंग ओळखिला ॥२९॥जाम्बवताचे मुष्टिप्रहार । कृष्णाआंगीं लागतां क्रू । त्याणें त्याचेच भंगले कर । अभंग श्रीधर सर्वात्मा ॥२३०॥जितुकें जळ वर्षें सागरीं । तो तें आत्मत्वें स्वीकारी । कीं घट मठ पर्वत पृथ्वीवरी । अभेदें धरित्री जड न मनी ॥३१॥इन्धनीं आच्छादितां वैश्वानर । इन्धनेंचि होय प्रचुरतर । तेंवि श्रीधर जगदाधार । शक्ति समग्र चेतविता ॥३२॥जाम्बवताचें जितुकें बळ । कृष्णाआंगींचेंचि तें केवळ । तेणें कृष्ण होय विकळ । हें बोलणें वोफळ मूर्खाचें ॥३३॥घटाकाशें गिळिजे मठ । कीं मठाकाशा ब्रह्माण्डघोंट । न करवे तेंवि वैकुंठपीठ । न पवे कष्ट ऋक्षबळें ॥३४॥श्रीकृष्णाच्या मुष्टिप्रहारीं । परम वैकल्य ऋक्षशरीरीं । विस्मय पावोनि अंतरीं । विचार विवरी हृदयांत ॥२३५॥मजसारिखा वीर वरिष्ठ । उचलूं शके ब्रह्माण्डघट । मुष्टिप्रहारें मेरु पीठ । करीन घोंट सिंधूचा ॥३६॥कीं शेष काढूनि पाताळीं । सोडूनि देईन गगनबिळीं । भूगोल सांवरीन करतळीं । अतुलबळी मज ऐसा ॥३७॥ऐसा गर्व माझ्या आंगीं । त्या मज भंगिलें समररंगीं । मजहूनि बळिष्ठ या भूभागीं । कोण हा जगीं मज मीनला ॥३८॥मजहूनि याचें प्रचंड बळ । सामान्य नर नोहे केवळ । विस्मित होत्साता प्राञ्जळ । त्रैलोक्यपाळ हाचि गमे ॥३९॥एवं विवरूनि अंतःकरणीं । म्हणे हा प्रत्यक्ष कोदंडपाणि । बोलता झाला नम्रवाणी । बद्धपाणि नतमूर्धा ॥२४०॥पूर्ण परिचय भगवंतातें । दावूनि म्हणे तुज म्यां निरुतें । जाणितलें त्या संकेतातें । श्रीअनंतें परिसावें ॥४१॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP