मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५६ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ५६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ अध्याय ५६ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - सत्राजितः स्वतनयां कृष्णाय कृतकिल्बिषः । स्यमंतकेन मणिना स्वयमुद्यम्य दत्तवान् ॥१॥सत्राजित या नामें राजा । कृतापराधें पावोनि लज्जा । तत्परिहरणीं निजात्मजा । गरुडध्वजा दे मणिसहित ॥३९॥सत्राजित म्हणसी कोण । तरी वृष्णिपुत्र सुमित्र जाण । अनमित्र सुमित्राचा नंदन । त्याचा निघ्न आत्मज पैं ॥४०॥दोघे निघ्नाचे नंदन । सत्राजित आणि प्रसेन । विष्णुपुराणींचें हें कथन । संशयापन्नीं तें पहावें ॥४१॥एवं सत्राजित प्रसेन । हे महाभोजकुळींचे यादव जाण । द्वारकेमाजीच वसतिस्थान । सूर्याराधन दृढ नेम ॥४२॥हें ऐकोनि कुरुमराळ । विवेकचंचूनें दुग्धजळ । श्रवणपात्रीं जो प्राञ्जळ । निवडी केवळ पयग्रहणा ॥४३॥तेणें ऐकोनि मुकुळित कथा । सविस्तर श्रवणीं धरूनि आस्था । बादरायणीतें झाला पुसता । एकाग्रता तें ऐका ॥४४॥राजोवाच - सत्राजितः किमकरोद्ब्रह्मन्कृष्णस्य किल्बिषम् । स्यमंतकः कुतस्तस्य कस्माद्दत्ता सुता हरेः ॥२॥राजा सर्वज्ञ विचक्षण । बादरायणीतें संबोधून । ब्रह्मनिष्ठत्वें म्हणे ब्रह्मन् । करीं व्याख्यान प्रश्नांचें ॥४५॥श्रीकृष्णासीं दुष्टाचरित । काय आचरला सत्राजित । त्यासि स्यमंतक कोठोनि प्राप्त । कृष्णा किमर्थ तनया दे ॥४६॥इत्यादि प्रश्नांचें व्याख्यान । करावया शुक सर्वज्ञ । प्रवर्तला तें सावधान । श्रोतीं होऊनि परिसावें ॥४७॥श्रीशुक उवाच - आसीत्सत्राजितः सूर्यो भक्तस्य परमः सखा । प्रीतस्तस्मै मणिं प्रादात्सूर्यस्तुष्टः स्यमंतकम् ॥३॥असो स्वभक्ता सत्राजिताचा । जिवलग सूर्य सखा साचा । त्याकारणें स्यमंतकाचा । प्रसाद सूर्यें समर्पिला ॥४८॥सूर्यभक्त सत्राजित । असता झाला जगीं विख्यात । त्याकारणें संतोषभरित । मणि आदित्य समर्पी ॥४९॥द्वारकेबाहेरी सिंधुस्नान । करूनि स्तविला सहस्रकिरण । प्रसन होतां प्रकाशमान । आपणासमान करीं म्हणें ॥५०॥प्रियतम स्नेहाळ भक्तावरी । होवोनि स्यमंतक दिधला करीं । त्या मणीची प्रकाशथोरी । भास्करापरी भ्राजिष्ठ ॥५१॥स तं बिभ्रन्मणिं कंथे भ्राजमानो यथा रविः । प्रविष्टो द्वारकां राजंस्तेजसा नोपलक्षितः ॥४॥ स्यमंतकमणीच्या प्रसादलाभें । सत्राजित ऐश्वर्यक्षोभें । दाटला मानी दिवि दिव्यशोभे । देवेंद्र न लभे निज तुळणा ॥५२॥तदाढ्यत्वें न माय कोठें । निज गौरवाचिये हुटहुटे । द्वारावतीमाजी तो पेठे । दैवें बळिष्ठें नियोजिला ॥५३॥मणिभूषण तें धरूनि कंठीं । द्वारकेमाजी स्वधामवाटीं । प्रविष्ट होतां जनांच्या दृष्टी । किरणकोटि रवि गमला ॥५४॥कोणा न कळे मानव ऐसा । दृष्टि जडल्या मणिप्रकाशा । सत्राजिताचा आकृतिठसा । जनमानसा तर्केना ॥५५॥तं विलोक्य जना दूरात्तेजसा मुष्टदृष्टयः । दीव्यतेऽक्षैर्भगवते शशंसुः सूर्यशंकिताः ॥५॥द्वारकाजनीं लक्षिला दुरून । तंव तेजें वंचिले त्याचे नयन । द्यूत क्रीडतां श्रीभगवान । कथिती येऊन त्यापाशीं ॥५६॥जनीं भाविला सहस्रकिरण । तैसेंचि सभास्थानीं येऊन । करिते झाले निवेदन । तें सज्जन परिसोत ॥५७॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP