मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर यथा भ्रमरिकादृष्ट्या भ्राम्यतीव महीयते । चित्ते कर्तरि तत्राऽत्मा कर्तेवाहं धिया स्मृतः ॥४१॥जीवा आणि परमात्मया । भेद इतुकाचि बल्लवराया । ज्ञानस्वरूप जे कां माया । अधिष्ठूनिया ईशत्वें ॥६२॥सृजनावनाप्ययादि करी । परी परमात्मा निर्विकारी । वास्तव स्वरूपाच्या अवसरीं । लीलावतारी होत्साता ॥६३॥वास्तवस्वरूपाचें अज्ञान । तें अविद्यात्मक गुणबंधन । तेणें जीवासि विपरीत ज्ञान । विषयभान प्रकाशी ॥६४॥मिथ्या विषय सत्य गमती । तदर्थ कामाची प्रवृत्ति । कामलोभें कर्में करिती । योनि भ्रमती फळभोगें ॥४६५॥प्रपंचा जें अधिष्ठान । जेथें उमटे विपरीत ज्ञान । तें कल्पनारूप बोलिजे मन । जें वर्ते होऊन चतुर्धा ॥६६॥बुद्धि निश्चय धूर धरी । चित्तें अनुसंधान करी । तदभिमानें अहंकारी । देहधारी दृढ होय ॥६७॥इंद्रियद्वारा विषयभान । भावी सत्य सुखनिधान । तत्स्माधनीं कर्तेपण । चित्तीं जाण आविष्करे ॥६८॥देहधारी जीव भिन्न । हेही विसरे आठवण । देहचि मी आत्मा म्हणून । धरी अभिमान विषयार्थ ॥६९॥देहाभिमानावलिप्तबुद्धि । तये नांव म्हणिजे अहंधी । तिणें आवरिला कर्तृशब्दीं । आत्मा निरुपाधि तो म्हणवी ॥४७०॥साच नसोनि साचासचिसें । मनादिइंद्रियव्यापारवशें । जीवचैतन्यालागी भासे । अविद्यापिसें या नांव ॥७१॥ऐसें बोधितां तुजला न कळे । तरी हें दृष्टांतें मोकळें । प्रतीतीमाजी जैसें उजळे । तैशिया बोलें अवधारीं ॥७२॥भंवतां भवंडी भरली देहीं । तो सपर्वत भ्रमतां मही । देखे साचाचि सारखी पाहीं । तेंविचि देही अहंभ्रमें ॥७३॥तरी हा भ्रमचि सांडीं नंदा । आत्मावबोधें भज गोविंदा । तो कवणाचा नोहें कदा । त्या अनुवादा अवधारीं ॥७४॥युवयोरेव नैवायमात्मजो भगवान्हरिः । सर्वेषामात्मजो ह्यात्मा पिता माता स ईश्वरः ॥४२॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । हर्ता जीवाचें अज्ञान । यालांगिं हरि हें अभिधान । त्रिजगीं जाण बुध गाती ॥४७५॥हा तुमचाचि नोहे पुत्र । सर्वांचाहि प्रीतिपात्र । पुत्र आत्मा मातापितर । जगदीश्वर जगन्मय पैं ॥७६॥जगन्मयत्वें प्रतिपादिला । तेव्हां अवघाचि जाण उगला । शत्रुमित्रादिभेदाथिला । परि तो संचला अभेद ॥७७॥तरी तें अभेदत्व कैसें । नंदा ऐक निरूपीतसें । प्रतीति येतां भेद निरसे । चांदिणां जैसें मृगतोय ॥७८॥दृष्टं श्रुतं भूतभवद्भविष्यत्स्थास्नुश्चरिष्णुर्महदल्पकं च ।विनाऽच्युताद्वस्तु तरां न वाच्यं स एव सर्व परमार्थमूतः ॥४३॥दृष्टीपुढें जें दृश्य दिसे । तें कृष्णाच्या चित्प्रकाशें । येर्हवीं वास्तव कांहींच नसे । विषयपिसें करणज्ञा ॥७९॥दृष्ट म्हणिजे दृग्गोचर । श्रुत म्हणिजे इहामुत्र । एवं पंचधा विषयमात्र । प्रकटी सर्वत्र चित्प्रभा ॥४८०॥तस्मात् चित्प्रभा नसतां देहीं । विषयप्रतीति कवणे ठायीं । कवणालागीं भासे पाहीं । यालागीं सर्वही कृष्णमय ॥८१॥दृष्ट श्रुत उमजल्या कांहीं । कृष्णावेगळें उरलेंचि नोहीं । भूत भावी वर्तमानही । तैसेंचि पाही कृष्णमय ॥८२॥स्थावर जंगम चेताचेत । स्वयंभ संचला श्रीकृष्णनाथ । गुरु लघु किंवा अणुत्व बृहत्त्व । प्रकटी समस्त हरिप्रभा ॥८३॥अच्युताविण इतर कांहीं । बोलावया वस्तु पाहीं । तत्वनिर्धारें पाहतां नाहीं । एवं सर्वही कृष्णमय ॥८४॥सूर्यचि सूर्यभामृगजळ । तैसाचि गोगोप्ता गोपाळ । ब्रह्ममयचि ब्रह्मांडगोळ । वस्तु केवळ अनिर्दिष्ट ॥४८५॥वस्तुतः निर्विचनीय ऐसा । कृष्णप्रकाश बल्लवेशा । बोधूनि उद्धव पाहे निशा । तंव अरुणें दिशा उजळिलिया ॥८६॥एवं निशा सा ब्रुवतोर्व्यतीता नंदस्य कृष्णानुचरस्य राजन् ।गोप्यः समुत्थाय निरूप्य दीपान्वास्तून्समभ्यर्च्य दधीन्यमंथन् ॥४४॥अरुणें सुरंग झाली प्राची । चेइली मंडळी व्रजौकसांची । जेथें वसती इंदिरेची । चर्या त्यांची शुभ सर्व ॥८७॥एर्हवीं प्रसूतिसमयावधि । मन्मथमंदिर जे न शोधी । ऐसी जिची तांद्रिकबुद्धि । अरुण बोधी केंवि तये ॥८८॥दिवस आलियाही प्रहरैक । घोरत निजे जे निःशंक । ते वळघली जयाचा अंक । तो नर शंख कां न करी ॥८९॥असो अवदशेचीं चिह्नें । निद्रालस्यप्रमाद रुसणें । दुर्भगांचीं दुर्लक्षणें । तमोगुणें प्रियतम त्यां ॥४९०॥व्रजीं अवतरला परेश । तैंहूनि तेथें कमलावास । रजतामदिदोषां नाश । शोभे विशेष सद्गुणश्री ॥९१॥शुक म्हणे गा परीक्षिति । उद्धवनंदसंवादप्रीति । सरोनि गेली अवधी राती । व्रजजनयुवति चेइलिया ॥९२॥सवेग उठिल्या द्विजांगना । शौचविधिदंतशोधना । संमार्जिती यज्ञायतना । प्रातःस्नाना सारूनी ॥९३॥सुस्नात विप्र प्रादुषीकरणें । करूनि संध्यापात्रसाधनें । अध्यापकीं अध्यायनें । छात्रांलागूनि आदरिलीं ॥९४॥एक प्रातःस्मरणें स्मरती । एक आत्मचिंतनें करिती । योगाभ्यासीं निश्चळवृत्ति । लक्ष्य साधिती पैं एक ॥४९५॥समस्त व्रजींच्या गोपललना । दीप लावूनि गृहार्चना । सेकोपलेपसंमार्जना । गोदोहना सारिती ॥९६॥एकी आस्तरणें काढिती । एकी प्रांगणें झाडिती । एकी गोपाळां वाढिती । वना धाडिती गोगोप्ते ॥९७॥कंडनें पेषणें करिती एकी । बालकें हालविती पर्यकीं । कृष्णचरितें गाती मुखीं । होती सुखी तद्वेधें ॥९८॥गाई वस्तां हुंबरती । वत्सें प्रतिशब्दें बोभाती । दोहनकाळीं बिडालपंक्ति । पायीं घोळती दुग्धार्थ ॥९९॥एकी क्षाळूनि तनुभाजनें । शुद्ध करिती दधिशोधनें । एकी करिती दधिनिर्मथनें । गाती आननें हरिचर्या ॥५००॥तिया गोपींची लावण्यगरिमा । कैशा मिरवती हेमललामा । एका श्लोकें कुरुसत्तमा । शुकमहात्मा निरूपी ॥१॥द्वितीयश्लोकीं त्यांचीं गानें । आणि हरिचर्यावर्ननें । छंदें करिती दधिनिर्मथनें । तीं व्याख्यानें परिसावीं ॥२॥ता दीपदीप्तैर्मणिभिर्विरेजू रज्जूर्विकर्षद्भुजकंकनस्रजः ।चलन्नितंबस्तनहारकुंडलत्विषत्कपोलारुणकुंकुमाननाः ॥४५॥क्षीरोद्भवा ज्या ललामललना । अमरपुरवविभूषणा । मुनिजनगंजन मन्मथसेना । या व्रजभुवनामाजी वधू ॥३॥कनकलतिका लावण्यमूर्ति । कनकाभरणीं रत्नपंक्ति । दीपप्रभेच्या बिंबतां दीप्ति । शोभा मिरविती परस्परें ॥४॥दीपप्रभेचीं प्रदीप्तकिरणें । तेणें भासुर ललनारत्नें । कांचनमंडित मणिभूषणें । तरुणी तारुन्यें मिरविती ॥५०५॥हेमरत्नाभरणाभर्रण । व्रजवनितांचें तनुलावण्य । हें दृष्टांतें विचक्षण । न्यून पूर्ण परिस तूं ॥६॥नकटीनाकीं मुक्ताफळ । कनकरत्नीं मणि सुढाळ । तद्वत् घ्रानें त्यांची किळ । होय समळ शोभवितां ॥७॥नासा श्वित्री सर्वाभरणीं । कुंकुममंडित सुभगा तरुणी । न शोभे जैसा नर दुर्गणी । उत्तमवर्णी होत्सात्ता ॥८॥दरिद्र्याआंगींच्या चातुर्यकळा । झांकी याञ्चेची अवकळा । कीं मद्यमृद्धट गंगाजळा । करी मंगळा अमंगळ ॥९॥तैशा व्यंगांगा अंगना । न शोभविती वस्त्राभरणा । कीं धर्मजिज्ञासा कौळिका मलिना । पढतां रसना लाजतसे ॥५१०॥तैशा नव्हती व्रजसुंदरी । ज्या दिव्यभूषणा भूषणकारी । शोभा मिरविती परस्परीं । निवती नेत्रीं पाहणारे ॥११॥रज्जु कर्षितां दधिनिर्मथनीं । कंकणीं झळकती रत्नमणि । उठती मंजुळ वलयध्वनि । भूषा श्रवणीं तळपती ॥१२॥बाहु चंचळ भूषायुक्त । मौळ नितंब कुच कंपित । कंठमाळा मणिमंडित । त्या डोलती तच्छंदें ॥१३॥कांचनमंडित रत्नकांचि । रुणझुण क्षुद्रघंटिकांची । कटिप्रदेशीं शोभा त्यांची । दाविती साची तन्वंगी ॥१४॥गंड मंडित कुण्डलकांति । कुंकुमें भालकपोलप्रांतीं । तेणें सुरंग आननपंक्ति । विशेष शोभती व्रजललना ॥५१५॥वांक्या नुपुर अंदु वाळे । चरणीं रुणझुनती सुताळें । कृष्णशैशवचरितें बहळें । सुस्वरमेळें आळविती ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP