मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर कच्चिदंग महाभाग सखा नः शूरनंदनः । आस्ते कुश्ल्यपत्याद्यैर्युक्तो मुक्तः सुहृद्वृतः ॥१६॥कोमळशब्दें म्हणे अंग । उद्धवा भेटलासि तूं जिवलग । तरी मथुरेचा वृत्तांत चांग । स्वमुखें सांग निवेदीं ॥५९॥शूरसेनाचा संभव । वृष्णिप्रवर जो वसुदेव । माझा सखा जिवाचा जीव । कुशळगौरव असे कीं ॥१६०॥महासभाग्य मरिषाकुमर । ज्याचे उदरीं बळश्रीधर । पुत्र होवोनि परमेश्वर । स्वयें साचार अवतरला ॥६१॥ते बळरामश्रीवनमाळी । गुप्त होते तम गोकुळीं । तंववरी कंस दुष्कृतशाली । यादव छळी निर्बंधें ॥६२॥वसुदेव देवकी उग्रसेन । यांसि करितां दृढ बंधन । यादवीं केलें पलायन । मथुरा सांडूनि दिगंतीं ॥६३॥सांप्रत निमाला तो कंस । तेणें निःशल्य यदूचा वंश । कांहींएक वृष्णि नरेश । कुशळ आतां असे कीं ॥६४॥कंसनिग्रहापासूनि मुक्त । रामकृष्णादि अपत्ययुक्त । सुहृदस्वगोत्रगणमंडित । क्कचित् स्वस्थ असे कीं ॥१६५॥दिष्ट्य कंसो हतः पापः सानुगः स्वेन पाप्मना । साधूनां धर्मशीलानां यदूनां द्वेष्टि यः सदा ॥१७॥विचित्र दैवाचा उभारा । समल्लसानुज सहानुचरा । स्वपापें पंचत्व कंसासुरा । निर्भय मथुरापुरा आतां ॥६६॥यादव साधु स्वधर्मशीळ । त्यांचा द्वेष्टा कंस खळ । तो निमालिया वसुधातळ । झालें निर्मळ मधुपुरही ॥६७॥आतां आपुलाली पदवी । सुखमय भोगिजे कीं यादवीं । असो हें राजा काय जेंवी । उठवाठेवी किमर्थ हे ॥६८॥आमुच्या जिवाचें जीवन । तो तेथ आहे श्रीकृष्ण । कांहीं आमुचें करी स्मरण । म्हणोनि प्रश्न करीतसे ॥६९॥अपि स्मरति नः कृष्णो मातरं सुहृदः सखीन् । गोपान्व्रजं चात्मनाथं गावो वृंदावनं गिरिम् ॥१८॥आम्ही स्मरतों मेघश्यामा । कांहीं तरी तो स्मरतो आम्हां । कीं मातेच्या सुस्निग्धकर्मा । स्मरोनि नामा कैं घेतो ॥१७०॥ज्यांसी नर्मोक्ति विनोद । ते कृष्णाचे सखे सुहृद । केव्हां तरी तो बल्लववृंद । स्वमुखें मुकुंद स्मरतसे ॥७१॥गोप गोरक्षक संवगडे । अनुयायी जे मागें पुढें । कृष्णवियोगें झाले वेडे । कैं त्यां तोंडें स्मरतसे ॥७२॥केव्हां तरी वृंदावन । स्मरत असेल व्रजभुवन । स्वयें पाळिला जो गोगण । कीं त्यांचें स्मरण होतसे ॥७३॥व्रजभुवनाचा आपण नाथ । स्वयेंचि म्हणवी कृष्णनाथ । आपणामागें व्रज अनाथ । ऐसी मात कैं स्मरतो ॥७४॥इंद्रक्षोभाच्या अवसरीं । गोवर्धन जो धरिला करीं । जेथ सदैव धेनु चारी । तो त्या गिरि आठवतो कीं ॥१७५॥आम्हां आठवे कृष्णगान । आम्हां आठवे कृष्णध्यान । आम्हां आठवे कृष्णवदन । कृष्णभाषण स्मरतसों ॥७६॥अप्यायास्यति गोविंदः स्वज्नान्सकृदीक्षितुम् । तर्हि द्रक्ष्याम तद्वक्त्रं सुनसं सुस्मितेक्षणम् ॥१९॥पहावया सुहृद सुजन । एकदां तरी येईल कृष्ण । तरी आमुचे निवती नयन । पाहोनि वदन स्मितयुक्त ॥७७॥सरळनासिका सुस्मित अपांग । श्रीकृष्णवदन पाहतां सांग । आमुचें निवेल तैं अष्टांग । कृष्णानुराग सकळांसी ॥७८॥श्रीकृष्णाचें उपकारश्रवण । होतां नंदाचें अंतःकरण । सर्वप्रकारें अभिभूयमान । विवश कथन करी मुखें ॥७९॥दावाग्नेर्वातवर्षाच वृषसर्पाच्च रक्षिताः । दुरत्ययेभ्यो मृत्युभ्यः कृष्णेन सुमहात्मना ॥२०॥यमुनापुलिनीं दावानळ । क्षोभोनि जाळितां व्रजजन सकळ । कृष्णें प्राशूनियां तत्काळ । निर्भय केवळ वांचविला ॥१८०॥तृणावर्तें पीडिला व्रज । गगना नेला अधोक्षज । तो मारूनि पापपुंज । अक्षत व्रज वांचविला ॥८१॥स्वमानभंगें क्षोभला इंद्र । तैं बाळक उचली जेंवि शिलींध्र । तेंवि गोवर्धनगिरींद्र । यादवेंद्रें उचलिला ॥८२॥तळीं करूनि निर्भय स्थळ । सप्तरात्र सर्व गोकुळ । रक्षितां देखोनि आखंडळ । ठेवी मौळ हरिचरणीं ॥८३॥अरिष्टनामा वृषभासुर । क्षोभें भंगितां व्रजपुर । कृष्णें मर्दूनि तो दुष्कर । घोष समग्र सुखी केला ॥८४॥अघासुरनामा महासर्प । त्रिदशां न साहवे ज्याचा दर्प । तेणें ग्रासितां वत्सें वत्सप । पूतनागरप हरि लक्षी ॥१८५॥वत्सप मरतां मरती पशुप । वत्सांसाठीं धेनुकळप । ऐसिया काकुळती सकृप । कंदर्पबाप कळवळिला ॥८६॥मग रिघोनि सर्पावदनीं । प्राण रोधूनि फोडिला मूर्ध्नि । अमृतापांगें वांचवूनी । वत्सें वत्सप काढिले ॥८७॥दुःखें करूनि शक्य तरतां । तो दुरत्यय महामृत्यु तत्वता । तयापासूनि झाला रक्षिता । विश्वगोप्ता श्रीकृष्ण ॥८८॥प्रत्यक्ष श्रीकृष्ण महात्मा । विश्वगोप्ता विश्वंतरात्मा । तेणें बहुधा हरूनि विषमा । श्रमापासोनि रक्षिलें ॥८९॥ऐसे कृष्णाचे उपकार । नंद स्मरे वारंवार । ध्यानस्मरणीं चमत्कार । कथी साचार तो ऐका ॥१९०॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP