मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर धारयंत्यतिकृच्छ्रेण प्रयः प्राणान्कथंचन । प्रत्यागमनसंदेशैर्बल्लव्यो मे मदात्मिकाः ॥६॥गोपी माझिया विरहानळें । भस्म झालियाचि असती न कळे । येवढ्या वियोगदुःखें बहळें । जीवनकळे नुरणूक ॥९२॥परंतु एक भरवंसा मना । महता क्लेशें धरिती प्राणा । विश्वासोनि माझिया वचना । प्रत्यागमना लक्षिती त्या ॥९३॥बहुतेक माझिया त्या बल्लवी । मदात्मिका सर्वभावीं । मी सर्वस्वें त्यांच्या जीवीं । यास्तव जीववीं जगज्जीवन ॥९४॥शीघ्र येईन ऐसी वाणी । स्वमुखें बोलिलों चक्रपाणि । त्या विश्वासें पंचप्राणीं । शरीरभुवनीं वसिजेल ॥९५॥ऐशा सक्लेश प्राण धरिती । बहुतेक वाटतें माझ्या चित्तीं । तरी त्वं जावोनि तयांप्र्ति । मम वचनोक्ति बोधाव्य ॥९६॥त्या वचनोक्ति म्हणसी कैशा । तुम्ही प्रियतमा मम मानसा । मजसीं वियोग नाहीं सहसा । हृदयीं ठसा ठसावतां ॥९७॥मी तुमचिया अभ्यंतरीं । तुम्ही मत्प्रेमें मजमाझारी । असतां न बाधी विरहलहरी । मम वैखरी हे बोधीं ॥९८॥चतुरा उपदेशवचान एका । शताब्द बोधितां न बणे मूर्खा । सुरेज्यशिष्य उद्धव निका । वृत्तांत असिका त्या कळला ॥९९॥शुक म्हेणे गा परीक्षिति । उद्धवें परिसोनि कृष्णोक्ति । कैसा चालिला गोकुळाप्रति । तें तूं सुमति अवधारीं ॥१००॥श्रीशुक उवाच - इत्युक्त उद्धवो राजन्संदैशं भर्तृरादूतः । आदाय रथमारुह्य प्रययौ नंदगोकुलम् ॥७॥गुह्यगोष्टी परम रहस्य । वदतां साशंक मानस । त्याही निःशंक उद्धवास । बोलिला परेश निष्कपट ॥१॥भर्ता बोलिजे आपुला स्वामी । तेणें योजिलें रहस्यकामीं । त्याचे निरोप हृदयपद्मीं । धरूनि सद्मींहूनि ऊठला ॥२॥आज्ञा घेऊनि निज नाथाची । रथ सज्जिला समयीं तेचि । रथीं बैसोनि गोकुळींची । मति विवंची चालतां ॥३॥धन्य नंदाचें गोकुळ । धन्य धन्य तो बल्लवपाळ । धन्य यशोदा सुकृतशीळ । मानिती बाळ जगज्जनका ॥४॥धन्य धन्य तो बल्लवीगण । न कळे त्याचें सुकृत कोण । ज्याच्या प्रेमें श्रीभगवान । कळवळून मज बोधी ॥१०५॥ऐसिया नंदगोकुळाप्रति । रथीं बैसोनि उद्धव सुमति । अस्तगिरीं पावे गभस्ति । जाता झाला ते समयीं ॥६॥प्राप्तो नंदव्रजं श्रीमान्निम्लोचति विभावसौ । छन्नयानः प्रविशतां पशूनां खुररेणुभिः ॥८॥विभावसूचिय मंडळा । चुंबीत असतां अस्ताचळा । ऐसिये समयीं नंदगोकुळा । उद्धव पावला सप्रेमें ॥७॥पशूंचे कळप सायंकाळीं । प्रवेशतां घोषमंडळीं । त्यांच्या खुरें उधळल्या धुळी । जीमूतावळीसम गमती ॥८॥तया खुररेणूंहीं रथ । झांकोळला गोकुळेंसहित । नंद्सदनद्वारीं स्वस्थ । नेऊनि केला सारथियें ॥९॥गोपी रथातें लक्षून । नेणतां कोणाचा हा कोण । म्हणती अक्रूरें आणिला कृष्ण । कीं आमुचे प्राण नेईल हा ॥११०॥असो गोपींचे वितर्क । व्रजवर्णना करी शुक । ते संक्षेपें पांच श्लोक । श्रोतीं सम्यक परिसावे ॥११॥वासितार्थेऽभियुद्ध्यद्भिर्नादितं शुष्मिभिर्वृषैः । धावंतीभिश्च वास्राभिरूधोभारैः स्ववत्सकान् ॥९॥प्रवेशकाळींची गोकुळशोभा । ऐकें कुरुभूतवल्लभा । धेनु ऋतुमति निमित्त वृषभा । युद्धें क्षोभा पावविती ॥१२॥युद्धें करिती वृषभ ऐसे । सकाम उन्मत्त तनुआवेशें । डारक्या फोडिती गंभीरघोषें । मेघ जैसे प्रावृटीं ॥१३॥तयां उक्षांच्या फुंपाटध्वनि । युद्धार्थ इतस्ततः धावनीं । ऐसी गोकुळशोभा नयनीं । उद्धव पाहोनि संतुष्ट ॥१४॥वत्सासाठीं नवप्रसूता । वोरसें दाटोनि वत्समाता । धेनु धांवती त्वरान्विता । तिहीं तत्वता व्रज शोभे ॥११५॥वोहे दटले दुग्धभारें । सस्निग्धवत्सांच्या हुंकारें । स्तनीं लागले दुग्धझरे । तें पाझरे भूतळीं ॥१६॥अचलाग्रींहूनि जैसें जल । तळवटीं धांवे उताविळ । तेवीं वत्सार्थ धेनुमेळ । जवनशीळ क्षोभ्ती ॥१७॥गाई धांवती वत्सांसाठीं । तेवीं औत्सुक्य वत्सां पोटीं । ऐकें तयांची राहटी । स्नेहाळें पोटीं परस्परें ॥१८॥इतस्ततो विलंघद्भिर्गोवत्सैर्मंडितं सितैः । गोदोहशब्दाभिरवं वेणूनां निःस्वनेन च ॥१०॥ऐकोनि धेनूंने हुंकर । धांवो इच्छिती वत्सें समोर । कंठीं निरुद्ध पाशदोर । तेणें आतुर उफाळती ॥१९॥इतस्ततः उडिया घेती । गाई समोर उकावती । क्षुधातुरें हुंकारती । स्थिर न होती आंवरितां ॥१२०॥काळी निळी धवळी पिवळी । धेनुवत्सांची मंड्ळी । तेणें व्रजशोभा आगळी । दृष्टि निहाळी उद्धव ॥२१॥गोदोहनें बल्लव करिती । पात्रीं पयधारा वाजती । तेणें वत्सें हुंकारती । सशब्द भ्र्मती मार्जारें ॥२२॥सोडा सोडा रे वांसुरें । प्यालीं अखंडा म्हणती त्वरें । घ्या घ्या म्हणती दोहिलीं पात्रें । पुन्हा सत्वरें द्या म्हणती ॥२३॥तर्णकांचे हुंकारगजर । वेणुध्वनि त्यांमाजी मिश्र । तेणें नादें व्रज समग्र । नादाकार ब्रह्म गमे ॥२४॥ऐसी व्रजशोभा उद्धवें । श्रवणें नयनें पाहतां निवे । गोपी गाती सप्रेमभावें । तें परिसें आघवें हरिचरित ॥१२५॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP