मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर मा खिद्यतं महाभागौ द्रक्ष्यथः कृष्णमंतिके । अंतर्हृदि स भूतानामास्ते ज्योतिरिवैधसि ॥३६॥महाभाग या संबोधनें । यशोदानंदांसि उद्धव म्हणे । तुम्हीं भाग्याचीं याचि गुणें । जें कृष्णीं तनुमनें वेधलां ॥१७॥खेद न करावा मानसीं । कृष्ण पहा आपणांपासीं । सर्वभूतांच्या हृदयावकाशीं । ज्योति एधसि तेंवि नांदे ॥१८॥म्हणाल सर्वभूतांतरीं । समान नांदे जरी श्रीहरि । तरी कां भूतें दैवानुसारी । श्रम संसारीं भोगिती ॥१९॥ऐसी शंका मानाल झणें । काष्ठीं नांदतां हुताशनें । काष्ठ तयासि सहसा नेणे । काष्ठाभिमानें भ्रम भोगी ॥४२०॥गुरुशुश्रूषासंवादमथनीं । प्रकटे ज्योतिरूप ज्ञानाग्नि । तैं काष्ठत्वदेहाभिमानी । करी जाळूनि शून्यता ॥२१॥सप्रेम भजन परस्परें । वस्तुसामर्थ्य सहज संस्कारें । मथन घदे तैं हृदयीं स्फुरे । निजनिर्धारें श्रीकृष्ण ॥२२॥कृष्णज्योति झळकल्या भजनीं । कृष्णप्रभाचि दिवसरजनी । शून्य पदे प्रपंचभानीं । तुम्हांलागोनि ते दशा ॥२३॥अखंड समाधि तें या नांव । तुम्हां फावली स्वयमेव । आतां किमर्थ साधनीं हांव । देहात्मभाव कां धरितां ॥२४॥येईन म्हणोनि बोलिला कृष्ण । यदर्थीं शंका धरील मन । जें मातापितरें प्रियतम स्वजन । कां पां त्यागून येईल तो ॥४२५॥तरी हें ऐसें मानूंच नका । हृदयांतील सांडूनि शंका । यदर्थीं मद्वचनें आइका । स्थिति व्यापकता कृष्णाची ॥२॥न ह्यस्यास्ति प्रियः कश्चिन्नाप्रियो वाऽस्त्यमानिनः । नोत्तमो नोधमा नाऽपि समानस्यासमोऽपि वा ॥३७॥मान म्हणिजे देहाभिमान । जो भेदाचें जन्मस्थान । ज्याचेनि आप्त इतर स्वजन । तो निपटूनि ज्या नाहीं ॥२७॥अमानासि अत्यंत प्रिय । किंवा अत्यंत अप्रिय । दोहींचाही अप्रत्यय । जें तो अद्वय परमात्मा ॥२८॥अद्वयासि अधमोत्तम । न्यून पूर्ण असम सम । म्हणणें हाचि केवळ भ्रम । तो निस्सीम निखिलाद्य ॥२९॥माती आप्त कवणा घटा । कीं तंतु अनाप्त कवणा पटा । नभ अनुत्तम कवण्या मठा । कोण्या चोहटा उत्तम तें ॥४३०॥पाणि कवण्या तरंगा सम । कवण्या बुद्बुदामाजी विषम । कवणे अळंकारीं हेम । स्वपरनाम प्रियाप्रिय ॥३१॥आपण झालेनि स्वप्नींचीं रूपें । प्रियाप्रियत्वें कोणतें घे पें । तेंवीं अखिलाद्य चिन्मात्र आपें । ब्रह्मांड जोपे भ्रमगर्भी ॥३२॥यालागीं कृष्ण सर्वांचा आदि । तेंचि श्लोकार्थें प्रतिपादी । सावध होऊनि विद्वद्वृंदीं । पदीं विशदीं परिसावें ॥३३॥न माता न पिता तस्य न भार्या न सुतादयः । नात्मीयो न परश्चापि न देहो जन्म एव च ॥३८॥जयापासूनि जिये ठायीं । जन्म पावे जो कां देही । आदिकारण तया दोहीं । लागीं पाहीं म्हणिजेत ॥३४॥ तरी कृष्णासि देहचि नाहीं । मा तो जन्मला कोठोनि कांहीं । माता पिता त्यासि काई । कोणे समयीं कल्पावी ॥४३५॥कैंची भार्या देहातीता । कैची तयासि पुत्रदुहिता । कैंचा भ्राता आप्त चुलता । द्वैतरहिता कें शत्रु ॥३६॥म्हणसी प्रत्यक्ष देहधारी । यावत्काळ आमुचे घरीं । आतां वर्ते मथुरापुरीं । मातापितरीं कुळयुक्त ॥३७॥तरी हें नंदा सावधान । होऊनि ऐकें निरूपण । देहाधारी म्हणिजे कोण । तें लक्शण तुज कथितों ॥३८॥संचित प्रारब्ध क्रियमाण । या तिहींसि कर्माभिधान । येणें निबद्ध प्राणिगण । देह होऊन विचंबती ॥३९॥सुखदुःखांचें अधिष्ठान । कर्मनिर्दिष्ट देह जाण । षड्विकारी त्रिधाभिन्न । देवतीर्यग्मनुजादि ॥४४०॥काम्य सुकृतें देवयोनि । दुष्कृततमें तिर्यग्योनि । पापपुन्यसमतेसरूनी । मनुजयोनि मिश्रकर्में ॥४१॥देवां तिर्यगांण क्रियमाण नाहीं । पुण्यपापांचा क्षय दो ठायीं । दोन्ही समान तैं नरदेहीं । भोगी सर्वही सुखदुःखें ॥४२॥सुकृतफळें सुखाभिव्यक्ति । दुष्कृतें घडे दुःखावाप्ति । एवं न चुके पुनरावृत्ति । कर्में भ्रमती बहुयोनि ॥४३॥न चास्य कर्म वा लोके सदसन्मिश्रयोनिषु । क्रीडार्थः सोऽपि साधूनां परित्राणाय कल्पते ॥३९॥तें कर्मचि नाहीं कृष्णीं । जें क्रीडार्थ बीजसाधनीं । म्हणसी तरी कां देह धरूनी । जीवनीं भुवनीं अवतरे ॥४४॥स्वभक्त तारावया कारणें । जगदुद्धरणार्थ क्रीडा करणें । आणि साधूंच्या परित्रानें । आविर्भवणें निष्कर्मा ॥४४५॥मत्स्य कच्छ वराह सिंह । इत्यादि तिर्यग्योनिप्रभव । दुष्कर्मासि नसतां ठाव । आविर्भव स्वजनेच्छा ॥४६॥वामन भार्गव भूदेववंशीं । जन्मले महर्षींचिये कुशीं । सुकृतफळाची नसतां राशि । सुरकार्यासी अवतरे ॥४७॥रामकृष्ण मनुजां घरीं । जन्मले मनुष्यदेहधारी । मिश्रकर्मफळाधिकारी । केवीं चतुरीं मानावे ॥४८॥जो अविद्याकामकर्मातीत । तोही साधुपरित्राणार्थ । जन्मे नानायोनींआंत । जन्मरहित अयोनि ॥४९॥अगाधलीलाचरितें करी । श्रवणें पठनें जगदुद्धारी । भक्तां रक्षी दैत्यां मारी । परी निर्विकारी उभयात्मा ॥४५०॥जन्म धरूनि जन्मातीत । कैसा म्हणोनि कल्पील चित्त । तरी आपुलीच पाहें प्रतीत । कृश्ण तव सुत कीं नोहे ॥५१॥जैसा जन्मला तुमचे उदरीं । वोरसें क्रीडला तुमचेच घरीं । तैसाचि वसुदेवदेवकीजठरीं । परी नोहे श्रीहरि कवणाचा ॥५२॥म्हणाल जन्मकर्माविरहित । तरी त्या कैसें क्रीडाचरित । तुम्ही ते सावध ऐका मात । जे माया स्वीकृत गुणमयी ॥५३॥सत्त्वं रसस्तम इति भजते निर्गुणोगुणान् । क्रीडन्नतीतोऽत्र गुणैः सृजत्यवति हंव्यजः ॥४०॥गुणातीत कैसा क्रीडे । तरी हें मायांगीकारें घडे । मायमाजी गुण देव्हडे । चिन्मात्र उजेडें प्रकाशी ॥५४॥अनेकगुणविकार जड । मायेमाजी भरले निबिड । चित्प्रकाशें होती रूढ । कर्ता दृढ तैं म्हणती ॥४५५॥जड रामठ अचेतन । शुद्ध साधु करी सेवन । मग तो करू कां गंगास्नान । परी हिंगटपण नवजाय ॥५६॥कीं कनकबीज विकारवंत । जडत्वें विकाररूपा न येत । सचेतन नर जईं भक्षण करीत । तैं विकार तेथ प्रकाशती ॥५७॥कीं लटिकाचि स्वप्नभ्रम । परी निद्रावशें मनोधर्म । अधिष्ठूनि करवी कर्म । सम विषम भोगवी ॥५८॥तैसा निर्गुणही मायावशें । गुणविकारां भजला दिसे । मज गुणकार्य गुणावेशें । करी आपैसें गुणनिधि ॥५९॥रजोगुणें करी स्रुजन । सत्वगुणें करी अवन । तमोगुणें सर्व निधन । करी आपण अजन्मा ॥४६०॥म्हणसी मायागुणें निबद्ध झाला । तैं जीवाहूनि कें वेगळा । तरी जो श्रेष्ठीं विचार केला । तया बोला अवधारीं ॥६१॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP