मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४६ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ४६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ४६ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर प्रलंबो धेनुकोऽरिष्टस्तृणावर्तो बकादयः । दैत्याः सुरासुरजितो हता येनेह लीलया ॥२६॥सुरासुर अजिंक म्हणता ज्यांतें । ऐसे दैत्य कृष्णनाथें । शस्त्रेंवीण मारिले हातें । ऐक संकेतें उद्धवा ॥२६०॥पूतनाराक्षसी महथोर । दीड योजन क्रूर शरीर । उल्बण विषाचा स्तनपाझर । प्राशूनि समग्र मारिली ॥६१॥शकट भंगिला कोमल चरणें । तृणावर्त घेतला प्राणें । रिठासुर फोडिला दशनें । यमलार्जुन उन्मळिले ॥६२॥वत्सासुर त्राहाटिला । बकासुर चाभाडीं चिरियला । वत्सें वत्सप कृष्ण गिळिला । तो अघ वधिला प्राणरोधें ॥६३॥ धेनुक झुगारिला तालाग्रीं । असंख्या रासभमांदी आसुरी । निमाली रामकृष्णांच्या करीं । निमेषामाझारीं तालवनीं ॥६४॥कालियविषाचा कडकडाट । गगनीं खेचरां न फुटे वाट । उभय तटीं घडघडाट । स्थिरचरसंघाट भस्मती ॥२६५॥तैं विषाचें पिऊनि पाणी । गोप गोधनें पडलीं धरणीं । कृष्णें कृपेनें अवलोकूनी । अमृत वर्षोनि वांचविलीं ॥६६॥तया कालैयविषचिया ह्र्दीं । रिघोनि दंडिला खगेंद्रदंदी । तयासि वसति ओपूनि अब्धि । केली नदी सुखसेव्य ॥६७॥तेथ रात्रीं जाळितां वणवा । कृष्णें गिळिला व्रजजनकणवा । प्रलंब कपटी पशुपभावा । क्रीडतां रामें मारिला ॥६८॥अश्वरूपी तो केशी दुष्ट । कपटी व्योमासुर वरिष्ठ । वृषभरूपी तो अरिष्ट । अरिष्टकर्ता सुरासुरां ॥६९॥ऐसे मारिले सांगों किती । रामकृष्णांची अद्भुत शक्ति । ईश्वरावतार मानवाकृति । दोन्ही मूर्ति प्रत्यक्ष ॥२७०॥अगाध वेधक शक्ति यांची । चित्तें वेधलीं व्रजजनांचीं । गोपगोधनगोपिकांची । स्मृति सर्वांची कृष्णमय ॥७१॥ऐसा रामकृष्णांचे क्रीडे । स्मरतां नंद विसंज्ञ पडे । तें शुक सांगे रायापुढें । मानस वेडें हरिवेधें ॥७२॥श्रीशुक उवाच - इति संस्मृत्य संस्मृत्य नंदः कृष्ण्नुरक्तधीः । अत्युत्कंठोऽभवत्तूष्णीं प्रेमप्रसराविह्वलः ॥२७॥ऐकें कुरुकुळनरशादूर्ला । ऐसी क्षणक्षणा कृष्णलीला । स्मरोनि मूर्च्छित वेळोवेळां । नंद पडिला धरणिये ॥७३॥कृष्णीं प्रियतम नंदबुद्धि । यालागीं म्हणिजे अनुरक्तधी । उत्कंठेचा मोहउदधि । भरे प्रबळयाब्धीसारिखा ॥७४॥तेणें वदनीं शब्द न फुटे । उत्कंठित कंथ दाटे । नेत्रीं बाष्पपूर लोटे । हृदय फुटे संस्मरणें ॥२७५॥प्रेमसंरंभें विकळवृत्ति । नंद मूर्च्छित पडे क्षितीं । उद्धवें देखोनि अनन्य भक्ति । आपुले चित्तीं कळवळिला ॥७६॥म्हणे धन्य धन्य याचा प्रेमा । याचिया तपाची नेणवे सीमा । प्रेमें विंधिला परमात्मा । येवढी गरिमा पुण्याची ॥७७॥देवासि ज्याची अवसरी लागे । न विचारितां वृत्तांत सांगे । तो आजी प्रेमा देखिला आंगें । धन्य अनुरागें व्रजपति ॥७८॥नंदमुखें हे कृष्णगुण । वर्णितां यशोदा करी श्रवण । मोहें व्यापिलें अंतःकरण । तिचें लक्षण अवधारा ॥७९॥यशोदा वर्ण्यमानानि पुत्रस्य चरितानि च । शृण्वंत्यश्रूण्यवास्राक्षीत्स्नेहस्नुतपयोधरा ॥२८॥वर्ण्यमानें चरितें ऐके । स्नेह दुणवटोनि तंव तंव तवके । आपणही वर्णी मुखें । वियोगदुःखें तळमळी ॥२८०॥इये नाहाणीं नाहाणिला कृष्ण । येथें कृष्णा उद्वर्त्तन । जावळ माखीं स्नेहें करून । पाणी उष्ण प्रिय कृष्णा ॥८१॥पालवें परिमाजीं कृष्णांग । कृष्णासि तिलक रेखीं चांग । कृष्णा आभारणें लेववीं सांग । कृष्णापांग आठवती ॥८२॥हें कृष्णाचें बैसतें पीठ । हें कृष्णाचें जेवितें ताट । रत्नखचित वाटिया नीट । कृष्णासि अवीट आवडती ॥८३॥ हें कृष्णाची कनकझारी । रत्नजडित उपपात्र वरी । कृष्ण जैं कां भोजन करी । तैं स्वीकारी जळ येणें ॥८४॥कृष्णा आवडे घारी पुरी । कृष्णा आवडे रोटी उखरी । कृष्णा प्रियतम कुशिंबिरी । आळणें सांबारीं आवडती ॥२८५॥बोटवे देंटवे मालतिया । गहुंले नखुले चौकडिया । पुष्पें सरवळी सेवया । क्षीरी ऐसिया आवडती ॥८६॥कृष्णासि आवडे शाल्योदन । सोलींव डाळीचें वरान्न । दुग्धपाचित पायसान्न । घृतपक्कान्न गर्भादि ॥८७॥तैलवरिया सांजवरिया । फेण्या अनारसे गुळवरिया । लाडु खाजें करंजिया । विडोरिया प्रिय कृष्णा ॥८८॥पेढे बत्तासे मिठाई । सितापाचित अच्युत पाहीं । कृष्ण मागे जे जे समयीं । तें लवलाहीं देतसें ॥८९॥वाघारणीपूर्वक कथिका । कृष्ण भोक्ता विविधां वटकां । पर्पट सांडया लवणशाका । यदुनायका आवडती ॥२९०॥मेथी चाकवत चिमकुरा । पोकळा बसोळा राजगिरा । ऐसिया पत्रशाका अपारा । श्रीयदुवीरा आवडती ॥९१॥पुष्पां फळां मुळांचिया । शाका आवडती यदुवर्या । रायतीं मेतकुटें चटणिया । आंवळकाठिया नेलचटें ॥९२॥व्यंजनपाचित चित्रोदन । कृष्णासि प्रिय दध्योदन । सुंठी मिरें रामठ लवण । दहें कालवन ठोंबरा ॥९३॥कृष्णासि भाकरी आवडती । दिवे ढोंकळे धिरडीं रुचती । बहुविध सिदोरियांची प्रीति । संवगडे आणिती त्य अजेवी ॥९४॥लोणकदें सद्यस्तप्त । कृष्णासि आवडे गोघृत । हैयंगर्वान नवनीत । दुग्ध सुतप्त आणि साय ॥२९५॥सघन सव्यंजन साजुक तक्र । ज्यालागिं स्वर्गीं सकाम शक्र । अत्यंत कृष्णासि तें प्रियकर । परम सादर तत्पानीं ॥९६॥ऐसे पदार्थ सांगों किती । श्रीकृष्णाची ज्यांवरी प्रीति । जे जे कृष्णासि नावडती । त्ते त्रिजगतीं अपवित्र ॥९७॥आंग्या टोप्या पिंपळपानें । इयें कृष्णाचीं पायतनें । हें कृष्णाचें बाळलेणें । कोणाकारणें लेववूं ॥९८॥हे कृष्णाची कांबळी काठी । शृंग मोहरी वेणु वेताटी । सदन्नजाळी हे घाली पाठी । गाई तापटी जे समयीं ॥९९॥हें कृष्णाचें पीतांबर । बलरामाचें नीलांबर । कांच धातु गुंजाहार । पिच्छसंभार मोरांचे ॥३००॥ऐसें जें जें दृष्टीं पडे । आठवे कृष्ण ठाके पुढें । एवं कृष्णें लाविलें वेडें । मागें पुढें स्मरेना ॥१॥हे कृष्णाची मंचकशय्या । गोपी गडिणी कृष्णसखिया । श्रीकृष्णाची विनोदचर्या । जाकळी हृदया आठवतां ॥२॥कृष्ण नाचे सदनांगणीं । कृष्ण सुस्वर गाय गाणीं । कृष्ण रुचिकर सांगे काहणी । कृष्णबोलणीं आठवती ॥३॥कृष्णविहारमंडित धरणी । कृष्णक्रीडा यमुनाजीवनीं । कृष्णें प्राशन केला वह्नि । सुगंध पवनीं कृष्णाचा ॥४॥कृष्णप्रभा भासुर गगनीं । कृष्णमूर्ति कोंदली नयनीं । कृष्णक्रीडा भरली मनीं । कृष्णावांचोनी स्मरों नेदी ॥३०५॥जिकडे पाहों तिकडे कृष्ण । सबाह्य अवघा भरला पूर्ण । श्रीकृष्णाचें क्रियाचरण । कदा विस्मरण हों नेदी ॥६॥खातां पितां आठवे कृष्ण । आसनीं शयनीं भोजनीं कृष्ण । जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं कृष्ण । कृष्णें तनुमन वेधलें ॥७॥ऐसी यशोदा उद्धवापुढें । कृष्णचर्या वर्णितां तोडें । कृष्णानुरागें विकळ पदे । कृष्णीं जडे तादात्म्यें ॥८॥नेत्र पाझरती बाष्पांभें । हृदय व्यापिलें कृष्णबिंबें । स्तनीं पान्हा सुटला लोभें । कृष्णवालभें तो न धरे ॥९॥कौरवकुळांबरभास्वता । श्रवणासक्ता अभिमन्युसुता । नंदयशोदा हरिगुण कथितां । उद्धव चित्तामाजी द्रवे ॥३१०॥तयोरित्थं भगवति कृष्णे नंदयशोदयोः । वीक्ष्यानुरागं परमं नंदमाहोद्धवो मुदा ॥२९॥षड्गुणैश्वर्याचा निधि । त्या श्रीकृष्णीं अनन्यसिद्धि । परमानुरागें जदली बुद्धि । भवोपाधि विसरोनी ॥११॥ऐसी नंदयशोदेची । कृष्णीं प्रीति देखोनि साची । कुंठित प्रज्ञा उद्धवाची । सीमा भाग्याची कल्पितां ॥१२॥शिव विरंचि पद्मालया । कधीं न लाहती प्रेमा यया । तो येथ नंदयशोदा उभयां । फावला अनायासें करूनी ॥१३॥ध्यानीं नाकळें ध्याननिष्ठां । योगी न फवे ऐसी काष्ठा । अनेक तपांच्या सोसितां कष्टां । प्रज्ञा प्रतिष्ठा दुर्लभ हे ॥१४॥योगयागतपीं न लभे । तो हा प्रेमा हरिवालभें । नंदयशोदा यांसि शोभे । पुत्रलोभें वेधिलिया ॥३१५॥पुत्रलोभें तो अविद्याभ्रम । परंतु वस्तुमहिमा अगाध परम । कृष्ण केवळ परब्रह्म । पुरुषोत्तम परमात्मा ॥१६॥यास्तव कृष्णीं जैं अनुराग । तेव्हांचि भवभ्रमाचा भंग । जोडे कैवल्यपद अभंग । नंद सभाग्य या लोभें ॥१७॥उद्धवें ऐसें मानूनि चित्ता । म्हणे कृष्णें मज ज्या अर्था । येथें पाठविलें तत्त्वता । तो विवेक आतां यां बोधूं ॥१८॥ऐसें निर्धारूनियां मनीं । नंदाप्रति चातुर्यखाणी । उद्धव बोले प्रबोधवाणी । ते श्रोतीं श्रवणीं परिसावी ॥२९॥उद्धव उवाच - युवां श्लाघ्यतमौ नूनं देहिनामिह मानद । नारायणेऽखिलगुरौ यत्कृता मतिरीदृशी ॥३०॥पात्रापात्र विचारून । करी यथोचित सम्मान । मानद ऐसें संबोधन । यालागून नंदासी ॥३२०॥उद्धव म्हणे मानदा नंदा । देहवंतांचिया वृंदा । माजी तुम्ही नंद यशोदा । श्लाघ्यें सर्वदा हरिभजनें ॥२१॥इया मनुष्यलोकाच्या ठायीं । देहधायी जे असती पाहीं । त्यांमाजी श्लाघ्यता तुमचीच कांहीं । लोकीं तिहीं वाखाणें ॥२२॥तुमचेंचि श्लाघ्य जन्मकर्म । तुमचाचि सफळ सर्व धर्म । बहुतेक तुम्हीच पुरुषोत्तम । निष्काम भजनें तोषविला ॥२३॥ज्ञानसंपन्न त्रिजगीं साध्य । एक ऐश्वर्यें परम सभाग्य । श्लाघ्यतम तुम्ही त्यांहूनि सुभग । जे पूर्णानुराग भोगीतसां ॥२४॥तुमच्या पुण्याची नेणिजे सीमा । श्लाघ्यतम हा तुमचाचि महिमा । ज्या कारणास्तव पुरुषोत्तमा । लाविला प्रेमा सुतमोहें ॥३२५॥जीवसमूहा जो आयतन । यालागीं म्हणती नारायण । जगत्पिता जगत्कारण । तो कृष्ण भगवान अखिलगुरु ॥२६॥तया श्रीकृष्णाच्या ठायीं । अनुरक्त मति तुमची पाहीं । तुम्हां ऐसीं भुवनत्रयीं । देखिलीं नाहीं विधिशक्रें ॥२७॥तुमची अभंग कृष्णीं निष्ठा । यालागीं श्लाघ्य त्रिजगीं श्रेष्ठा । ऐसाचि भजेल जो वैकुंठा । तो हे प्रतिष्ठा पावेल ॥२८॥आपुलें विसरोनि जातिकुळ । विद्या वयसा लावण्य शीळ । निष्काम भज जो गोपाळ । तन्मय केवळ तो होय ॥२९॥एवं भगवान अखिलगुरु । कर्मसाक्षी नियंतारु । ते हे दोघे सहोदरु । रामकृष्ण प्रत्यक्ष ॥३३०॥तेंचि अखिलगुरुत्व कैसें । जगत्पितृनियंतृदशे । आणूनि वर्णील तें मानसें । श्रोतीं विशेषें परिसावें ॥३१॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP