मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६ वा| श्लोक २६ ते ३५ अध्याय ६ वा आरंभ श्लोक १ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ ते १७ श्लोक १८ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६ वा - श्लोक २६ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३५ Translation - भाषांतर व्रजंतमव्याद्वैकुंठ आसीनं त्वां श्रियः पतिः । भुंजानं यज्ञभुग्पातु सर्वग्रहभयंकरः ॥२६॥बाळकाचे भोजनकाळीं । यज्ञभोक्ता श्रीवनमाळी । ज्या नामें भूतावळी । कांपे चळीं तो रक्षो ॥३॥दुष्टग्रह भयंकर । नानाविघ्नें निशाचर । * लंघूनि गेला दिगंतर । ऐका विस्तार कथेचा ( * घोर विखार खेचर हिंस्र । पळती सत्वर हरिनामें ॥४॥ ) ॥४॥घोर विखार खेचर हिंस्र । पूतनेचा सेनाभार । विष्णुस्मरणें अतिसत्वर । पळती सत्वर हरिनामें ॥२०५॥डकिन्यो यातुधान्यश्च कूष्मांडा येऽर्भकग्रहाः । भूतप्रेतपिशाचाश्च यक्षरक्षोविनायकाः ॥२७॥कोटरा रेवती ज्येष्ठा पूतना मातृकादयः । उन्मादा येह्यपस्मारा देहप्राणेंद्रियद्रुहः ॥२८॥स्वप्नदृष्टा महोत्पाता वृद्धबालग्रहाश्च ये । सर्वे नश्यंतु ते विष्णोर्नामग्रहणभीरवः ॥२९॥शाकिनी डाकिनी निशाचरी । कूष्मांड बालग्रह आसुरी । भूत प्रेत पिशाच खेचरी । भयंकरी नवचंडी ॥६॥यज्ञ राक्षस विनायक । ज्येष्ठा कोटरा रेवती प्रमुख । पूतना उन्माद मातृकादिक । अपस्मार फेंपरीं ॥७॥घुरीं भुररीं भ्रमकारकें । प्राणेंद्रियांचीं द्रोहकें । महोत्पात स्वप्नादिकें वृद्धें बालकें । जे पीडिती ॥८॥वेताळ झोटिंग मुंजे जखिणी । मुकी मैळी क्रूर डंखिणी । सर्व पळती विष्णुस्मरणीं । बाळालागुनी न बाधोत ॥९॥बाळका तुझीं हीं सर्व विघ्नें । नाश पावोत विष्णुस्मरणें । ऐशीं स्नेहाळ अंतःकरणें । केलीं रक्षणें गोपींहीं ॥२१०॥इति प्रणयबद्धाभिर्गोपीभिः कृतरक्षणम् । पाययित्वा स्तनं माता संन्यवेशयदात्मजम् ॥३०॥गोपी सप्रेम स्नेहाळा । तिहीं रक्षा करूनि बाळा । पुत्रवत्सला यशोबाळा । स्तन्य गोपाळातें पाजी ॥११॥मग झाडूनि शुद्ध मंचक । त्यावरी निजवूनि बाळक । मुखलालनें अतिकौतुक । दावी सम्यक् यशोदा ॥१२॥तावन्नंदादयो गोपा मथुराया व्रजं गताः । विलोक्य पूतनादेहं बभूवुरतिविस्मिताः ॥३१॥तंव नंदादिक मथुरेहून । गोकुळा पातले बल्लवगण । ऐकोनी पूतनेचें कथन । विस्मयापन्न ते झाले ॥१३॥मग देखोनि पूतनादेह दृष्टी । अत्यंत विस्मय वाटला पोटीं । वसुदेवाची अतींद्रिय दृष्टि । म्हणोनी गोष्टी बोलती ॥१४॥नूनं बतर्षिः संजातो योगेशो वा समास सः । स एव दृष्टो ह्युत्पातो यदाहाऽनकदुंदुभिः ॥३२॥परम विस्मय नंद मानी । म्हणे केवढें आश्चर्य देखिलें नयनीं । न देखतां हें कळलें ज्ञानीं । तरी तो मुनि वसुदेव ॥२१५॥नंद निश्चये सांगत । वसुदेव महर्षि झाला सत्य । तपश्चर्या घडली गुप्त । बंदिशाळेंत तयासी ॥१६॥कारागृहीं एकांतवास । आदिपुरुषीं लागला ध्यास । भविष्यवाणीचा विश्वास । अंतरास बाणला ॥१७॥येणें अंतरा झाला शम । निग्रहें इंद्रियां सहजचि दम । सर्वदा वृत्तीसि उपरम । जन्मकर्म स्मरोनि ॥१८॥दुष्टस्पर्शादि भाषण । वर्ज झालें कंसाभेणें । तपोनिष्ठा बाणली पूर्ण । साधनसंपन्न वसुदेव ॥१९॥ऐसा केवळ महर्षि झाला । किंवा योगाभ्यास घडला । ध्यानीं चिंतीतां परेशाला । ठसावला हृत्कमळीं ॥२२०॥एथूनि बंदिविमोचन । कर्ता एक श्रीभगवान । दुजा कैपक्षी नाहीं आन । म्हणोनि ध्यान ठसावलें ॥२१॥ध्यानीं ठसावतां भगवंत । फावला वसुदेवा एकांत । तेथ अतीत अनागत । सर्व क्लृस वसुदेवा ॥२२॥तस्मात्संकटीं धरूनि भाव । झाला योगीश्वर वसुदेव । तेणें कथिला विघ्नोद्भव । तो हा सावयव देखिला ॥२३॥कलेवरं परशुभिश्च्छित्वा तत्ते व्रजौकसः । दूरे क्षिप्त्वाऽवयवशो न्यदहन्काष्ठविष्ठितम् ॥३३॥मग नंद सुनंद उपनंद । तेथ मिळाले नवही नंद । निर्धारिला बुद्धिवाद । मंत्र विशद तो ऐका ॥२४॥अग्नीमाजीं जाळितां कपट । होय कपटाचें तळपट । तरी विघ्नप्रेत हें अचाट । हव्यवाट् या दीजे ॥२५॥सर्वां मानला हा विचार । मग घेऊनि आपुलाले कुठार । पूतनेचें कलेवर । बल्लववीर छेदिती ॥२६॥विखंड करूनि अवयव । लहान थोर वाहती सर्व । दुरी नेऊनिया बल्लव । चिता अपूर्व निर्मिली ॥२७॥प्रचंड रचूनि काष्ठराशि । जाळिलें पूतनाकलेवरासी । सुगंध पसरिला दशदिशीं । धूम गगनासी लागला ॥२८॥दह्यमानस्य देहस्य धूमश्चागुरुसौरभः । उत्थितः कृष्णनिर्भुक्तसपद्याहतपाप्मनः ॥३४॥शुक म्हणे कुरुभूषणा । ऐकें परीक्षिते विचक्षण । परमदुष्टा राक्षसगणा - । माजीं पूतना उद्धरिले ॥२९॥पूतनादेह अग्नीभीतरीं । जळतां सुगंध गगनोदरीं । भरला तेणें आश्चर्य भारी । सर्व सुरनरीं मानिलें ॥२३०॥पुण्यपावन देवतरु । हरिचंदन कृष्णागुरु । जवादीकस्तूरी मलयागुरु । न पावे कर्पूर ते समया ॥३१॥ऐसा सुगंध परमश्रेष्ठ । पूतनादेहीं झाला प्रकट । ज्याच्या दहनें हव्यवाट् । अवघे कष्ट विसरला ॥३२॥धूमगंधें गोकुळवासी । मानिती परमाश्चर्यासी । बालहंत्री हे राक्षसी । कस्तूरीऐशीं परिमळे ॥३३॥राजा परीक्षिति पुण्यश्लोक । हें ऐकूनि सकौतुक । म्हणे स्वामी प्रश्न एक । अलौकिक आठवला ॥३४॥दुष्टकपटी राक्षसी मेली । पुण्यपावन कैशी झाली । ऐशी आशंका उपजली । ते निरसिली पाहिजे ॥२३५॥शुक म्हणेगा नृपोत्तमा । जरी राक्षसा दुष्ट अधमा । स्तन पाजूनि सर्वोत्तमा । घातकर्मा प्रवर्तली ॥३६॥तरी श्रीकृष्णमुखस्पर्श । होतांचि झाली नित्यनिर्दोष । जळाली अविद्या अशेष । उरली सारांश सन्मात्र ॥३७॥पूतनालोकबालघ्नी राक्षसी रुधिराशना । जिघांसयाऽपि हरये स्तनं दत्वाऽऽप सद्गतिम् ॥३५॥कृष्णें प्राशिलें नाहीं स्तन । शोषिलें संचितक्रियमाण । प्रारब्धभोगें झालें क्षीण । शुद्ध निर्वाण पावली ॥३८॥ऐसा श्रीकृष्णभजनमहिमा । अशेष वर्णूं न शके ब्रह्मा । रमा रंगली पादपद्मा । निष्काम कामा अनुभवी ॥३९॥शंकर भजनप्रेमासाठीं । उपजत नेसोनि लंगोटी । दास्यानंदें संतुष्ट पोटीं । विषयरहाटी विसरला ॥२४०॥ऐसे अनेक भजनमार्गें । हरिप्रेम लेईले अंगें । ये अवतारीं क्रीडाप्रसंगें । मार्गें अमार्गें तारिले ॥४१॥प्रत्यक्ष बालघ्नी पूतना । दुष्ट राक्षसी रुधिराशना । प्रवर्तली कृष्णहनना । गरळपान्हा पाजूनि ॥४२॥कृष्णा मारावया कंसकाजीं । उल्वणविषमय पान्हा पाजी । इतुकेनि समरसली सायुज्यीं । हें आश्चर्य आजि तुज कथिलें ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP