मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६ वा| श्लोक १८ ते २० अध्याय ६ वा आरंभ श्लोक १ ते ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ ते १७ श्लोक १८ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ६ वा - श्लोक १८ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १८ ते २० Translation - भाषांतर बालं च तस्या उरसि क्रीडंतमकुतोभयम् । गोप्यस्तूर्णं समभ्येत्य जगृहुर्जातंग्रमाः ॥१८॥तंव ते राक्षसीच्या हृदयावरी । स्तन तैसाचि मुखाभीतरीं । निर्भय बाळक क्रीडा करी । पाहती सुंदरी अवचित्या ॥६१॥मग धाविन्नल्या उतावीळा । वेगीं उचलूनि घेती बाळा । म्हणती नंद दैवागळा । भाग्यसोहळा यशोदेचा ॥६२॥केवढा चुकला अनर्थ । अद्भुत झाला विघ्नपात । बाळ वांचलें आयुष्मंत । हें अघटित दैव पैं ॥६३॥भयें दचकलें असेल बाळ । झणें भयाचा बैसेल खळ । म्हणोनि रक्षा उतावीळ । करिती स्नेहाळ बल्लवी ॥६४॥यशोदारोहिणीभ्यां ताः समं बालस्य सर्वतः । रक्षां विदधिरे सम्यग्गोपुच्छभ्रमणादिभिः ॥१९॥मग यशोदारोहिणीप्रमुखा । सहित गोकुळींच्या गोपिका । गोपुच्छभ्रमणादि अनेका । रक्षा बाळका त्या करिती ॥६५॥बरव्या प्रकारें स्नेहभरें । सर्वस्वेंशीं प्रेमादरें । कळवळीलेनि अभ्यंतरें । मंत्रोच्चारें गोमयें ॥६६॥गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गोरजसार्भकम् । रक्षां चक्रुश्च शकृता द्वादशांगेषु नामभिः ॥२०॥अद्यापि संतानवंता नारी । तिहीं धरूनि हें अंतरीं । यशोदा बाळका रक्षा करी । तेचि परी आचरावी ॥६७॥जैसे आचरती श्रेष्ठ । तैसेचि वर्तती जरी कनिष्ठ । ते श्रेष्ठपदवी पावती स्पष्ट । विघ्नकष्ट न पावती ॥६८॥म्हणोनि यशोदे ऐसी बाळा । रक्षा करिती ज्या ज्या अबळा । भोगिती त्या संतानसोहळा । विघ्नावेगळा चिरकाळ ॥६९॥इतरा दुर्मति कनिष्ठा । स्वबाळार्थ कौटिल्यचेष्टा । इतरां बाळकां अनिष्टा । दुष्टपापिष्ठा चिंतिती ॥१७०॥आत्मसंततीचिये चाडे । परप्रजांसी चिंतिती कुडें । त्यांचा वंश न वाढे पुढें । विघ्न रोकडें तेंचि त्यां ॥७१॥देव द्विज गोत्रज गुरु । अभ्यागतार्चनीं आदरु । विश्वप्रिय विश्वमित्रु । तो सर्वत्र सुख भोगी ॥७२॥जो परांचा करी द्वेष । कपटें कौटिल्यें ओपी त्रास । त्याचा विघ्नें करिती नाश । न वाढे वंश चिरकाळ ॥७३॥जें जें चिंतिजे परांसी । तें ये आपुलिया घरासी । या लागीं कल्याणइच्छा ज्यासी । तेणें सर्वांसी सुख द्यावें ॥७४॥एवं यशोदा रक्षा करी । तैशा शिकती सुभगा नारी । दुर्भगा करिती कपटाचारीं । महाखेचरीकौटिल्यें ॥१७५॥असो हें शिकविण्याचे साठीं । परिहाराचे लागलों पाठी । श्लोकसंगतीं झाली तुटी । संतीं पोटीं क्षमावें ॥७६॥मग त्या गोपिका स्नेहाळा । गोमूत्रें स्नान घालूनि बाळा । पुन्हा करिती गोरजउधळा । हस्त डोळां लावूनि ॥७७॥ऐसें घालूनि गोरजस्नान । मग शुद्ध गोमय घेऊन । द्वादशांगीं नामें करून । करिती रक्षण गोपिका ॥७८॥केशवनामें लाविती भाळीं । नारायण नाभिमंडळीं । माधवनामें वक्षःस्थळीं । कंठनाळीं गोविंद ॥७९॥दक्षिणकुक्षीं विष्णुस्मरण । दक्षिणभुजीं मधुसूदन । करिती त्रिविक्रम स्मरोन । दक्षिनकर्णमूळदेशीं ॥१८०॥वामन स्मरोनि वामकुक्षीं । श्रीधर वामबाहुपक्षीं । वामकर्णमूळीं लक्षीं । श्रीहृषीकेशी रेखिती ॥८१॥पद्मनाभ रेखिती पृष्ठीं । दामोदर कुकुदीनिकटीं । द्वादश नामें अंगयष्टि । गोपगोरटी रक्षिती ॥८२॥करितां गोमूत्र गोरजस्नानें । गोमयें सनाम द्वादशस्थानें । रेखितां श्वास सांडिला कृष्णें । गोपिका तेणें हरिखल्या ॥८३॥म्हणती अल्प सावध बाळ । होतें अत्यंत व्याकुळ । आतां स्पर्शोनि शुद्धजळ । कीजे निर्मळ न्यासादि ॥८४॥तांतडीनें करितां जलस्पर्श । नामें गोमयें करितां न्यास । बाळकाचा परतला श्वास । झाला विश्वास गोपींसी ॥८५॥ N/A References : N/A Last Updated : April 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP