तुका विप्रकृत कांहीं कविता

संकीर्ण वाड्मय साहित्य.


( श्री. रा. तु. जगदळे, पिंपोडे बुद्रुक )

द्रौपदीचा धांवा

अभंग ॥१॥
सदासीव नाम अखंड श्रीराम ॥ जपतां विश्राम पावला तो ॥१॥
म्हणोनी स्मरावा श्रीहरी अखंड ॥ साधन उदंड नका करूं ॥२॥
रामनाम घेतां निवाला तात्काल ॥ वीष वडवानल शांत जाला ॥३॥
गिर्जा तुका वीप्र जाहालें भुषण ॥ श्रीराम - स्मरण नीलकंठ ॥४॥
॥२॥
प्रल्हाद स्मरला वाचें नरहरी ॥ दुःखाच्या सागरी सोडविला ॥१॥
प्रताप आगला नामाचा त्रीजगीं ॥ सत्य युगायुगी प्रचीती हे ॥२॥
कश्यप हिरण्यपुत्रासी गांजीता ॥ जाला सोडवितां नरहरी ॥३॥
गिर्जा तुका वीप्र आघातापासूनी ॥ सोडवितां जनीं स्वामी माझा ॥४॥
॥३॥
द्रौपदीच्या धावा ऐकोनी तातडी ॥ देव घाली उडी नामासाठीं ॥१॥
न लाविता आला उसीर मुरारी ॥ होवूनी कैवारी पांडुरंग ॥२॥
राखियेली लाज देवें नामासाठीं ॥ पाहुनी शेवटी कृपामूर्ती ॥३॥
गिर्जा तुका वीप्र नामाची आवडी ॥ स्मरताची उडी हरी घाली ॥४॥
॥४॥
उभी वृंदावनीं द्रुपदनंदीनी ॥ पाव बा निर्वाणीं कृष्णराया ॥१॥
आले रुषीश्वर भोजना मागती ॥ देवा मध्येरात्रीं अवकालीं ॥२॥
सत्व जाऊं पाहे अजी बंधुराया ॥ दावी आतां पाया मजप्रती ॥३॥
गिर्जा तुका वीप्र रुषीप्रति अन्न ॥ न मिल्लतां जाण शाप देती ॥४॥
॥५॥
ऐकोनिया धावा पावले सत्वर ॥ द्रौपदीं समोर उभे हरीं ॥१॥
सावल्ला सुंदर राजीवलोचन ॥ दिव्य परिधान पीतांबर ॥२॥
म्हणे याज्ञसेनी संकठ निवारी ॥ दयाल्ला कौसारी नारायेण ॥३॥
रुषीश्वर अन्न मागूं (?) येथें ॥ त्रप्त करीं त्यातें कोणे परी ॥४॥
गिर्जा तुका वीप्रा न दिसे उपाय ॥ कांहीं कृष्णराया तुजवीण ॥५॥
॥६॥
करुणा वचनीं ऐकोनीये कानीं ॥ आलो मी धावूनी भगिनिये ॥१॥
विस्तारिले ताठ न जेवितां पाहे ॥ तुजलागी माय आलो त्वरें ॥२॥
क्षुधेनें बहुत पीडिले मजला ॥ देईं भोजनाला कांहीं तरी ॥३॥
मग तूं न करी चिंता कांहीं जाण ॥ करितो प्रणाम रुषी त्रुप्त ॥४॥
गिर्जा तुका वीप्र म्हणे दयाघना ॥ करूं मी प्रार्थना कोणा आतां ॥५॥
॥७॥
भाजीचिया पानें तोषला श्रीहरी ॥ पाहुनी अंतरी सुद्ध भाव ॥१॥
विश्वंभर - ध्यात्म्या धाले त्रिभुवन ॥ ऐसेचि वचन वेदमुखें ॥२॥
निवारी संकठ(ट) भक्तांचा माधव ॥ शुद्ध भक्तीभाव जेथें खरें ॥३॥
गिर्जा तुका वीप्र भक्तांचा कोवसा ॥ पुर्ण भरंवसा देवराया ॥४॥
॥८॥
भृ(ण्र)ष्ट आचरण पापी आजामेल ॥ दुष्ट बुद्धी काल घालविला ॥१॥
त्या धर्माचा योग करोनि विषय ॥ आचरण पाहे केले बहूं ॥२॥
कुंभपाका योग्य कृइ(क्रि) या ज्याची जाणा ॥ यमाचा पाहुणा नेमियेला ॥३॥
तंव दैवयोगे पुत्रमिस नाम ॥ स्मरितां विश्राम पावला तो ॥४॥
गिर्जा तुका वीप्र ऐसा नाममंत्र ॥ तात्काल्ल(ळ) पवित्र महादोषा ॥५॥
॥९॥
वाल्हा कोल्ली(ळी) महा घातकी प्रमाण ॥ जिव घात जाण पार नाहीं ॥१॥
मारुनिया जीव खडा टाकी ये(ए)क ॥ पा यापरी लेख सप्त संख्या ॥२॥
भरीली यापरी कल्लवेरी ॥ बुडाला सागईं पापाचिया ॥३॥
अवचिता भेटी झाली नारदाची ॥ सर्व सुक्रुताची राशी महा ॥४॥
गिर्जा तुका वीप्र रामनाम बोध ॥ जाहला प्रसिध वाल्मीक तो ॥५॥
॥१०॥
किर्तन - रंगणी हासणें मस्करी ॥ अभावी[क] करी सत्य जाणा ॥१॥
सोंग तें जाणावे शिमग्याचें खरें ॥ अविश्वासी नर कोणेपरी ॥२॥
कोठला बोलणें बोलती पाखंडी ॥ स्वहिताची जोडी हाणी जाली ॥३॥
गिर्जा तुका वीप्र दैवहीन जाणीं ॥ किर्तनी - रंगणीं हासे करी ॥४॥
॥११॥
अभक्त - लक्षण उमटली पहा ॥ कथारंगी महा घात होय ॥१॥
पापाचें हें फल्ल(ळ) नामी न विश्वास ॥ आतां काय यास करावें तें ॥२॥
सि(शि)कविले जरी दुर्ग(र्गु)ण न टाकी ॥ विटंबना लोकीं सहजची ये ॥३॥
गिर्जा तुका वीप्र ऐसा अवगुणी ॥ कीर्तनी - रंगणीं येऊं नये ॥४॥
॥१२॥
हासता किर्तनीं क्षोभे पांडूरंग ॥ नसावा दुसंग किर्तनीया ॥१॥
जयाची संगती श्व(स्व)हिताची हानी ॥ करावें तें मनीं विवेक हा ॥२॥
पांडूरंगा ऐसा देऊं नको संग ॥ किर्तनाचा रंग भंग करी ॥३॥
म्हणोनी य(ए)कांत असावा किर्तनी ॥ देवा दयाघना क्र(कृ)पा मूर्ती ॥४॥
असंग - संगती फजीतीसी मुल्ल(ळ) ॥ अविश्वासाशी खल्ल(ळ) दुष्ट नष्ट ॥५॥
गिर्जा तुका विप्र प्रेमाविण काय ॥ जरी नाचे गाय जोडी नाहीं ॥६॥
॥१३॥
व्यर्थ नपूसका काय करावी पद्मीणी ॥ तैसी या रंगणीं अविश्वास ॥१॥
व्यर्थ भूमीभार अभाविक नरा ॥ कुंभपाकी थारा सत्य घडे ॥२॥
भाव नाहीं मनी बिगारी जाणावा ॥ संसारीचा गोवा कैसा तुटे ॥३॥
फुंदताती फार ज्ञान - गर्व - बलें(ळें) ॥ अभक्त कांबलें(ळें) भक्तीहीन ॥४॥
गिर्जा तुका वीप्र भाव नाहीं मनीं ॥ न येवो किर्तनी घातकी तो ॥५॥
॥१४॥
भाव - बले(ळे) हाक प्रल्हाद मारितां ॥ प्रगटे तत्वतां स्तंभामाजी ॥१॥
ऐसा अनुभव युगायुगांतरी ॥ दासाचा कैवारी नारायण ॥२॥
पसु(शू) याती गज संकटी बोभाये ॥ म्हणे धावूनी ये पावला की ॥३॥
गिर्जा तुका वीप्र म्हणे दुरदैवासी ॥ पावें संकटासी नाना साटीं(ठीं) ॥४॥
॥१५॥
मध्य रात्रीं दिल्ले ऋषी प्रती ॥ संकठी(टी) श्रीपती द्रौपदीच्या ॥१॥
ऐसा पांडूरंग नामाचा अल्लका ॥ राबतसे फुका धर्मा घरीं ॥२॥
लाक्षा(सा) घरी हरी रक्षी पांडवासी ॥ स्मरतां मानसी शुद्ध भाव ॥३॥
गिर्जा तुका वीप्र आग सोसी दैवें ॥ रक्षिले पांडवें दुःख सर्व ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP