एक स्त्रीरत्नाचा पराक्रम

संकीर्ण वाड्मय साहित्य.


जंग घ्यावे आतां ऐकून ॥ होति फार बहादर जैतून ॥ पटाईत होती ति पैलवान ॥ नित्य हिंडती पांच हात्यार घेऊन ॥ पुरशाचा पोशाक घेऊन ॥ नित्य लढाई करिति धाऊन ॥ अंगे आपलि फौज ति घेऊन ॥ एके दिवशीं निघालि सिनगार करुन ॥ जंग घ्यावे आतां ऐकून ॥ होति फार बहादर जैतून ॥ पुढं पुरषाला ति पाहुन ॥ फार भंड करि त्यास न्हेऊन ॥ कैकाला टाकले मारून ॥ नौरि पळत आसे नित्य दचकून ॥ ति खबर महंमदे हानिप ऐकून ॥ आले जैतूनवर चालून ॥ भेट झाले म्हणाले आसें जैतून ॥ आहेस कवणांचा तु कौन ॥ जंग घ्यावें आतां० ॥ध्रु०॥
महंमद हानीप म्हणाले कडकडून ॥ मि महमद हानिप आलो चालून ॥ मौलाचा पुत्र आलि सुग्रीवान ॥ ऐकून तप्त झालि जैतुन ॥ कर वार म्हणाले पुढें येऊन ॥ तेव्हां जसे सांगितले महमएद हानिपान ॥ तु नार आहेस घे उमजून ॥ कसे वार करू तुजवर धाऊन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
मग म्हणाले हानिपाला जैतून ॥ नार म्हणून कसि धरलि तुम्ही खूण ॥ महमद हानिप म्हणाले वळकून ॥ नाहि रिकाबे मध्यें पाय जुळुन ॥ थलथल ते गे तुझे दोने जोबन ॥ आम्ही पाहिली आता त्रिभुवन ॥ ति नार केली वार सुदसन ॥ लागला वार डोईवर जाऊन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
पडले महंमद हानिप भुल येऊन ॥ घोड्यावरून उतरली जैतून ॥ नाहि जिवाची खबर झाला गमन ॥ ऐकावे म्हणे धड ह्याचे कापुन ॥ हात लाऊन पाहिले हालवुन ॥ काय हासिल मऎड्याची मान कापुन ॥ प्राण गेला म्हणुन दिले सोडुन ॥ च्यार स्वार होते नेले धरून ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
बापापासि जैतुन जाऊन ॥ उभा र्‍हायली बहादारि सांगुन ॥ महमद हानिपाला आले मि खपऊन ॥ च्यार स्वार आणिले हात बांएधुन ॥ बाप म्हणाला ऐक आता जैतुन ॥ महमएद हानिपाला मारणार आहे कोण ॥ खरे वाटेना बोलने तुझे आजुन ॥ सिर घेऊन ये जा मान कापुन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
घ्या मागची हाकिकत ऐकून ॥ महमद हानिप पडले घोड्यावरून ॥ एक गुलाम होता मकबुल म्हणुन ॥ तो बसला होता तिथे दडून ॥ सर्व हकिकत सांगुन ॥ महमद हानिपाला उठविले जाऊन ॥ फार खजिल झाले घरि येऊन ॥ मातोसरिने रागें भरले ऐकून ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
मी मौला आलि वर लढून ॥ सात दिवस र्‍हाइले वाचून ॥ आसल्याचा पुत्र तू पैलवान ॥ कसा पडलास भुईवर भुल येऊन ॥ आई निजली होति दोन प्रहरि जेऊन ॥ हानिप निघाले मुकबुलला घेऊन ॥ आई निजून उठली हाडबडून ॥ मुलगा दिसेना झाला पाहाति हुडकुन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
मि उगिच म्हणालि त्याला दुखऊन ॥ तो खचित गेला मला लाजून ॥ निघाली घोड्याला जिन घालुन ॥ गेलि सडकेचा मार्ग नीट धरुन ॥ तिकडुन येत हुती जैतुन ॥ भेट झालि पाहिली हानिपान ॥ दोघिची लागलि छनापन ॥ जैतुन वार मारलि जपुन ॥जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
बिबि हानिपाची ढाल तुटुन ॥ चार बोट सिरलि डोक्यात जाऊन ॥ मकबूलास म्हणाले महमद हानिपान ॥ डोंगरावर चढून पहा मार्गान ॥ पाहिले सवारास मकबूलान ॥ चला जलदि आली जैतून ॥ घटकेत पोंचले जाऊन ॥ मातोसरीस पाहिले जाऊन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
जैतुन आलि पुढें धावून । केलि वार घेतले चुकवून ॥ मग धरुन जैतूनाला हानिपान ॥ फेकलि आकाशावर रागान ॥ मातोसरि म्हणाली तेव्हां वरडून ॥ धर वरच्यावर जाईल प्राण ॥ माझे दुध तुला बक्षीस करीन ॥ न धरल्यास श्राप तुला देईन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥
धरलि आदर कडिवर घेऊन ॥ तेव्हां जैतुन म्हणालि लाजून ॥ मला भेटला न्हवता कोनि आजुन ॥ कलमा वाचून झाली मुसलमान ॥ मातोसरिला म्हणाले हानिपशान ॥ हात बांधुन हवाली केलि जैतुन ॥ जावा घरला सर्व तुम्ही निघुन ॥ च्यार स्वार आनतो माझे जाऊन ॥ जंग घ्यावे आता ऐकून ॥ होति फार बहादर जैतून ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP