अनुभवामृत - प्रकरण ९ वें

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


आता अमोद सुनास जाले । श्रुतिस श्रवण रिघाले । आरसे उठिले । लोचनचि ॥१॥
जीभ वोळवि रसे । कमळ सूर्यपणे प्रकाशे । चकोर कां जैसे । चंद्रमा जाला ॥२॥
फुले जालि भ्रमर । तरुणिया जाले नर । जाला आपुला सेजार । निद्राळुचि ॥३॥
आपुलेनि समीरपणें । वेल्हावताति विजने । माथेचि चापेपणे । बहकताति ॥४॥
च्युतांकुर जाला कोकीळ । अंगवले मलयानीळ । रस जाला रसाळ । रसनावंत ॥५॥
दिठिवियाचा रवा । नागरीयेचा ठेवा । घडिला कोरवा । परि जैसा ॥६॥
तैसे भोग्य भोग भोक्ता । दृश्य दिसणे देखता । हे सरले अद्वैता । अफूटामाजि ॥७॥
सेवंतेपणा बाहेरि । न निघताचि परि । पाति सहस्त्रवरि उपलविलि ॥८॥
नवनवा अनुभवि । वाजता वाधावी । परि अन्योक्तिचा गांवि । न निघे तो ॥९॥
विषयाचेनि नांवे । सुखे इंद्रियाचे थवे । सैरा घेति धांवे । समोरहि ॥१०॥
परि आरसा शिवो शिवे । तव दिठि दिठिते फावे । तैसे जाले धांवे । वृत्ति यया ॥११॥
नाग मुदि कांकण । त्रिलिंगि भेदलि खुण । घेता तरि सुवर्ण । घेइजे कि ॥१२॥
कां वेचुनि अणु कल्लोळ । ह्मणोनि घापे करतळ । तेथे तरि नि:खळ । पाणीच फावे ॥१३॥
हातापासि स्पर्शु । डोळ्यापुढें रूपसु । जिभे गमे मिष्टांशु कोण्हिएक ॥१४॥
परि परिमळा परोते । आसने नाहिं कापुराते । तैसे बहुतापरि स्फुरते । तेचि स्फुरे ॥१५॥
ह्मणोनि शब्दादि पदार्थ । श्रोत्रादिचे संघात घ्यावया जेथे हात उजू होति ॥१६॥
तेथें संबंध होय न होय । तव दिठिचे काय आहे । मग असतचि नव्हे । संबंध ना ॥१७॥
जिये पेरि दिसति उसि । तिये लाभति रसि । कां कळा निवडे शशि । पुनवेचिया ॥१८॥
पडिले चांदावरि चांदणे । समुद्रि जाले वर्षणे । विषय विषई करणे । भेटति तैसि ॥१९॥
ह्मणोनि तोंडा आड पडे । तेचि वाच्या वावडे । परि समाधि न मोडे । मौन मुद्रेचा ॥२०॥
व्यापाराचे गाडे । मोडताहि अपाडे । परि अक्रियेचे न मोडे । पाउल कही ॥२१॥
परसूनि निवृत्तिची वांवे । दिठि रूपाते देखवे । परि दृश्याचेनि नावें । कांहीच न देखे ॥२२॥
तमाते घ्यावया । उचलिल्या जरि सहस्त्र बाह्या । परि सेवटि रवि यया । हाचि जैसा ॥२३॥
कां स्वप्निचिया विलासा । भेटेन इया आशा । उठला तव जैसा । तोचि तो कि ॥२४॥
तैसा उदेलेनि विषये । ज्ञानिया विषई होउ जाय । तव दोन्हि न होनि होय । काय नेणो ॥२५॥
चंद्र वेंचु गेला चांदणे । तव वेंचिले काय कोण्हे । विउनि वांझे स्मरणे । होत जैसि ॥२६॥
प्रत्यहारादि योगि । अंग टेंकिलें योगि । ते झाले यया मार्गि । देहाचे चांद ॥२७॥
येथे प्रवृत्ति बहुडे जिणे । आणि निवृत्तिसि बाधणे । आता प्रत्यड्मुखपणें । प्रच्यार दिसे ॥२८॥
द्वैतदशेचे अंगण । अद्वैत वोळगे आपण । भेद तवं तवं दूण । अभेदासि ॥२९॥
कैवल्याहि चढावा । करीत विषयसेवा । जाला भक्त भज्य कालवा । भक्तिच्या घरि ॥३०॥
घरामाजि पाय । चालता मार्ग होय । ना बैसे तरि आहे । पावणेचि ॥३१॥
तैसे भलतेहि करिता । येथे कांहि पाहिजे आता । तैसें कांहि न करिता । ठाकिजे ना ॥३२॥
आठव आणि विसरु । तयाते घेउ नेंदि पसरु । दशेचा व्यवहारु । असाधारणु ॥३३॥
जालि स्वेच्छाचि विधि । स्वैर जालि समाधि । दशा या मोक्षसिद्धि । बैसो घापे ॥३४॥
देवेचि जाला भक्तु । ठावोचि जाला पंथु । होवोनि ठेला येकांतु । विश्वचि हे ॥३५॥
भलतेउतेनि देवे । भलतेनि भक्त व्हांवे । बैसला तेथे राणिवे । अकर्म हा ॥३६॥
देवाचिया दाटाणि । देउळा जालि आटणि । देशकालादि वांटणि । होईचि ना ॥३७॥
देवि देवचि न माये । मा दैविके असो पाहे । तेथे परिवार बहुवे । अघटता किं ॥३८॥
ऐसिया स्वामि - भृत्य - संबंधा । लागि उठलि जरि श्रद्धा । तरि देवचि नुसधा । मविजे किं ॥३९॥
अवघिया उपच्यारा । जपध्यान निर्धारा । नाहि आन दूसरा । देवावांचुनि ॥४०॥
आता देवातेचि देवे । देववरि भजावे । आपणाचेनि नावें । भलतेया ॥४१॥
देव देउळ परिवार । कीजे कोरोनि डोंगर । तैसा भक्तिचा व्यवहार । कां न करावां ॥४२॥
अहो मुगि मुग जैसे घेता न घेता आन नसे । केले देवपण तैसे । दोहिपरि ॥४३॥
पाहे पा अवघिया । रुस्त्रि रुखाचि छाया । परि दूसरा नव्हे तया । विस्तार जेवी ॥४४॥
अखताचि देवता । अखताचि असे न पूजिता । मा अखति काय आता । पुजु जावें ॥४५॥
दीप्तिचि लुगडि । दीपकळिके तू वेढी । हे न ह्मणता ते उघडि । ठाके काई ॥४६॥
कां चंद्राते चंद्र कळिका । न ह्मणिजे पा लोका । तरि तो असिका । तोचि तो कीं ॥४७॥
की अगीपन अगी । असतचि असे अंगि । मा कासियालागि । दीपण देणे ॥४८॥
ह्मणोनि भजता भजावे मा न भजता काय चेवे । ऐसे नाहि स्वभावे । श्री शिउचि असे ॥४९॥
आता भक्ति अभक्ति । जाले ताट येके पाति । कर्माकर्माचिया वाति । मालवोनिया ॥५०॥
ह्मणोनि उपनिषदे । अथातादेशादि निदे । ते निंदाचि विशदे । स्तोत्रे होति ॥५१॥
नातरि निंदास्तुति । दोन्हि मौनासाटि जाति । मौना मौन अथि । न बोलताहि ॥५२॥
घालिता अव्हासवा पाय । शिवयात्रा होत जाय । शिवा गेलिया नव्हे । कंहि जाणे ॥५३॥
चालणे आणि बैसक । दोन्हि मिळोनि एक । नव्हे ऐसे कवतुक । यया ठांई ॥५४॥
यर्‍हवि अडळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहला । भोगिजे भलतिये वेळा । भलतेनें ॥५५॥
कां समोर दिसे शिवही । परि देखिले कांहीच नाही । जे देवा भक्ता दोही । सरिसा पाडु ॥५६॥
आपणचि चेंडु सुटे । मग आपणया उपटे । तेणे उदळला दाटे । आपणपाचि ॥५७॥
ऐसि जरि चेंडुफळि । देखुजे का एके वेळि । तरि बोलि सरलि । प्रबोधाचि ॥५८॥
कर्माचा हात न लागे । ज्ञानाचे कांहि न रिघे । ऐसिच होत आंगे । उपास्ति हे ॥५९॥
निफजे ना निमे । आपेआप घुमे । सुखासुख उपमे । देवलसिया ॥६०॥
कोण्हि एक अकृत्रिम । भक्तिचे हे वर्म । योग - ज्ञान - विश्राम - । भूमिका हे ॥६१॥
अंगे कीर एक जाले । नामरूपाचे मासले । होते तेहि आटले । हारिहर येथे ॥६२॥
अहो अर्धनारिनटेश्वरे । गिळित उगळीत परस्परे । ग्रहण जाले एकसरे । सर्वग्रासे ॥६३॥
वाज्यजात खाउनि । वाचकत्व पीउनि । टाकिलि निदेजउनि । परा येथे ॥६४॥
शिवशिव समर्था स्वामि । येव्हडिये आनंदभूमि । घेपे दीजे एकी आह्मि । ऐसे केले ॥६५॥
चेतचि चेवविले । निदेले निजविले । अह्मा अह्मि आणिले । नवल जि तुझे ॥६६॥
अह्मि निख्खळ जि तुझे । वरि लोभे म्हणसि माझे । हे पुनरुक्त साजे । तू ह्मणोनि ॥६७॥
कोण्हाचे कांहि न घेसि । आणि आपले कोण्हा नेदेसि । कोण जाणे भोगिसि । गौरव कैसा ॥६८॥
गुरुत्वे जेव्हडा चांगु । तेव्हडाचि तारुनि लघु । लघु गुरु जाणे तो पांगु । तुझा करी ॥६९॥
शिष्या देता वाटे । अद्वैताचा समो न फुटे । तरि काह्या होति भाटे शास्त्रे तुझि ॥७०॥
किंबहुना दातारा । मी - तु - पणाचा संसारा । वेंचोनि होसि सोइरा । तेणेचि तोषे ॥७१॥
इतिश्रीमदबुभवामृते जीवन्मुक्ति - अभेदभक्ति - सहजस्थिति - वर्णनं नाम नवमप्रकरणम् ।

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP