अनुभवामृत - प्रकरण ८ वे

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


तयाते म्हणपे अज्ञान । तरि न्याया भरले रान । आता म्हणो तयाचे ज्ञान । उपसाहो अम्हि ॥१॥
तरि प्रकाशिते ते अज्ञान । ऐसे म्हणने हान । निधि दावि तया अंजन । म्हणिजे जैसे ॥२॥
सुवर्ण गौरि अंबिका । न ह्मणिजे काय काळिका । तैसा आत्मप्रकाशका । अज्ञानवादु ॥३॥
यर्‍हवि शिवोनि प्रिथ्विवरि । तत्वाचिया वाणिपरि । जयाचे रश्मिकरि । उजाळा येति ॥४॥
जेणे ज्ञान सज्ञान होय । दृड्मात्र दृष्टिते विये । प्रकाशाचा दिवस पाहे । प्रकाशासि ॥५॥
तयाते कोण्हे निकृष्टे । दाविले अज्ञान बोटे । ना सूर्य तम मोटे । बांधता होय ॥६॥
अपुर्व ज्ञानाक्षरि । वसता ज्ञानाचि थोरि । अज्ञान शब्दार्थाचि उजरि । अपूर्व नव्हे ॥७॥
लाखेचिये मांदुसे । अगिचे ठेवणे जैसे । आंत बाहेर सरिसे । करोनि घालि ॥८॥
म्हणोनि जग ज्ञाने स्फुरते । आणि बोलता अज्ञान वादाते । विखुरालि होति आंते । वाचेचिये ॥९॥
अक्षरि तव गोवधु । पुढारा अनृत बाधु । मा कैसा अज्ञानवादु । ज्ञानि कीजे ॥१०॥
आणि अज्ञान ह्मणने । हे स्फुरतसे अर्थपणे । आता हेचि ज्ञान कवणे । मानिजेना ॥११॥
असो हे आत्मराजे । आपणाते जेणे तेजे । आपणचि देखिजे । बहुवेपरि ॥१२॥
निर्वचिता जे झावळे । तेचि कि लाहाति डोळे । डोळिया पुढेहि मिळे । तेचि तया ॥१३॥
ऐसे अज्ञान जे आहे । ते अज्ञान म्हणे मी विये । येणे अनुमाने हो पाहे । अथि ऐसे ॥१४॥
तव ज्ञान त्रिशुद्धि नाहि । हे जग ठेंविले ठाई । जे धर्मधर्मित्व नाहि । ज्ञानाज्ञानाचे ॥१५॥
काजळ मोति विये । राखोंडिया दीपु जिये । तरि ज्ञान धर्म होय । अज्ञानाचा ॥१६॥
चंद्रमा निघति ज्वाळा । आकाश आते शिळा । तरि अज्ञान उजळा । ज्ञानाते विये ॥१७॥
क्षिराब्धि काळकूट । हे एकेपरि विकट । परि काळकूटि चोखट । अमृत नाहि ॥१८॥
ना अज्ञानि ज्ञान जाले । ते होताचि अज्ञान गेले । पूढति ज्ञान येकले । अज्ञान नाहि ॥१९॥
म्हणोनि सूर्य सूर्या येव्हडा । चंद्र चंद्रासि सांगडा । दीपाचिया पडिपाडा । ऐसा दीपु ॥२०॥
प्रकाश तो प्रकाश कि । हे न वचे यया चुकि । ह्मणोनि जग असकि वस्तुप्रभा ॥२१॥
आणि विभाति यस्य भासा । सर्वमिदं हा ऐसा । श्रुति काय वायसा । ढेकर देति ॥२२॥
यालागि वस्तुप्रभा । वस्तुचि पावे शोभा । जात असे लाभा । वस्तुसीचि ॥२३॥
वांचोनि वस्तु यया । आपणा प्रकाशावया । अज्ञान हेतु वाया । बोलणे अवघे ॥२४॥
एवं अज्ञान सद्भावो । कोण्हे परि न लाहो । अज्ञान विषइ पावो । पाहो ठेल्या ॥२५॥
तमाशा उजिरा । न जोडेचि दिनकरा । रात्रिचिया घरा । गेला जरि ॥२६॥
का नीद खोळे भरिता । जागणेहि न ये हाता । येकले टळटळिता । ठाकिजे जेविं ॥२७॥
तैसे आमचेनि नावे । अज्ञान ज्ञान दोन्हि नव्हे । अम्हालागि गुरुदेवे । आम्हीच केलो ॥२८॥
हा ठाववरि गुरुराये । नांदविले उवाये । जे अह्मि न समाये । अह्मामाजि ॥२९॥
अह्मि अह्मिपणे न सटो । अंगि लागले न फुटो । स्वसंविति न घसवटो । कैवल्येहि ॥३०॥
परि आम्हि अह्मि आहो । ते कैसे पाहो जावो । तंव काय किजे ठावो । लाजिजे ऐसा ॥३१॥
आमचि करावया गोठि । ते जन्मलिच नाहि वागसृष्टि । आमुते देखे ते दिठि । दिठिच नव्हे ॥३२॥
अमुते करोनि विखो भोगहि न सके चाखो । आमुते अह्मि न देखो । आह्मिपणे ॥३३॥
प्रगटो लपो न लाहो । येथें नाहि नवलावो । परि कैसा नेणो विपावो । असणियाचा ॥३४॥
किंबहुना श्रीनिवृत्ति । ठेविले असो जयेस्थिति । ते काय देऊ हाति । वाचेचिया ॥३५॥
तेथे समोर व्हावया । अज्ञानाचा पाडु यया । केउते मेलिया माया । होउ पाहे ॥३६॥
आणि अज्ञानाचा प्रवर्तु । नाहि जया गांवा आतु । तेथें ज्ञानाचि तरि मातु । कोण जाने ॥३७॥
राति ह्मणोनि दिवे । पडति कि लावावे । वांचोनि सूर्यासवें । ठानदिवि असे ॥३८॥
ह्मणोनि अज्ञान नाहि तेथेचि गेले ज्ञानहि । आता निमिषोन्मेषा दोहि । ठेलि वाट ॥३९॥
एवं ज्ञानाज्ञाने । या दोहीचि अभिधाने । अथाचेनि अनाने । उपलविलि ॥४०॥
तव जैसि दंपत्ये परस्परे तोडोनि पालटिलि शिरे । तेथे पालट नाहि परिसरे । दोहिचे जिणे ॥४१॥
कां पाठि दाविला होय । तो दीपूचि वांया जाय । आणि दिठि अंधारे पाहे । ते दिठिचि वृथा ॥४२॥
ऐसे ज्ञान अज्ञाना आले । अज्ञान ज्ञाना गेले । तेथे फलेवीण वांझोले । दोण्हि जालि ॥४३॥
तैसे निपटोनि नेणिजे । ते अज्ञान शब्दे बोलिजे । आणि सर्व जेणे सुजे । ते ज्ञान ऐसे ॥४४॥
येथे जाणे तो नेणे । नेणे तोचि जाणे । अता के आसणे । ज्ञानाज्ञाना ॥४५॥
एवं ज्ञानाज्ञाने दोन्हि । पोटि सुवोनि आहनि । उदेला चिद्रगनि चिदादित्य हा ॥४६॥
इति श्रीमदनुभवामृते ज्ञानाज्ञानातीतवस्तुप्रतिपादनं नाम अष्टम प्रकरणम्

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP