अनुभवामृत - प्रकरण ३ रें

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


जयाचेनि बोभाटे । आत्मयाचि झोप लोटे । तरि ऋण न फिटे । जे चेणेचि नीद कीं ॥१॥
यहृवि परादि चौघी । जीवा मोक्षाचे उपयोगि । अविद्यासंवे अंगि । वेचति कीर ॥२॥
देहासंवे हातपाय । जाति मनासंवे इंद्रिये । कां सूर्यासवें जाय । किरणजाळ ॥३॥
नातरि निद्रेचे आवधि । स्वप्ने सरति आधि । तेवि अविद्यासंबंधि । आटति ईया ॥४॥
परि मृते लोहे होति । तिये रसरूपे जीति । जळोनि इंधने येति । वन्हिदशे ॥५॥
लवण अंगे विरे । परि स्वादे जळि उरे । मरोनि जागरे । जिये नीद ॥६॥
तेवि अविद्यासंवे । चौघि वेंचति जिवे । परि तत्वज्ञानाचेनि नावे । उठति ईया ॥७॥
आता तत्वज्ञान - दिवा । मरोनि इहि लावावा । तरि तोहि सिना लेवा । बोध्यरूपे ॥८॥
येउनि स्वप्ने मेळवि । गेलिया आपणपे दावि । दोन्हि दिठि नांदवि । नींद जैसि ॥९॥
जिति अविद्या तैसि । अन्यथाबोधे गिवसि । तोचि यथाबोबेसि । निमालि उठे ॥१०॥
परि जिति ना मेलि । अविद्या हे न मोकलि । बंध - मोक्षि घालि । बांधोनिया ॥११॥
मोक्षचि बंध होय । तरि मोक्ष शब्द कां साहे । परि अज्ञाना घरि त्राय । वाउगि हे ॥१२॥
बागुलाचेनि मरणे । तोषावे कि बाळपणे । येरा तोचि नाहि, मा कोण्हे । मानावा मृत्यु ॥१३॥
घटाचे नाहीपण । फुटलियाचि नागवण । मानिति ते जान । ह्मणो येति ॥१४॥
ह्मणोनि बंध तव वावो । मा मोक्षा के प्रस्तावो । परि मरोनि केला ठावो । अविद्या इया ॥१५॥
आनि ज्ञानबंध ऐसे । शिवसूत्राचेनि मिषे । ह्मणितले असे । सदाशिवे ॥१६॥
वैकुंठिचेहि सुजाणे । ज्ञानपाशी सत्वगुणे । बांधिजे हे बोलणे । बहू केले ॥१७॥
परि शिवे काम श्रीवल्लभे । बोलिले येणेचि लोभे । मानु ते नव्हे हे लाभे । न बोलताहि ॥१८॥
जो आत्मा ज्ञानमात्र नि:खळ । तोहि धे ज्ञानाचे बळ । तरि सूर्य चिंति सवळ । तैसे नोव्हे ॥१९॥
ह्मणोनि ज्ञाने श्लाघतु मोहे । तै ज्ञानपण धाडिले वाये । दीप वांचुनि दिवा लाहे । तै अंग भुलला की ॥२०॥
आपनापे आपणासि । नेणता देशोदेशि । आपणाते गिवसि । हे कीर होय ॥२१॥
परि बहुता का दिया । आपणपे आठविलिया । ह्मणे मि मिया । कैसा रिझो ॥२२॥
तैसा ज्ञानरूप आत्मा । ज्ञानेचि आपलि प्रमा । करिता सोहमा । ऐसा बंधु ॥२३॥
जे ज्ञान स्वये बुडे । ह्मणोनि भारि नावडे । ज्ञाने मोक्ष घडे । तो निमालेनि ॥२४॥
म्हणोनि परादि वाचा । तो शृंगार चौ अंगाचा । वेचु अविद्या जीवाचा । जीवत्वत्यागे ॥२५॥
अंगाचेनि इंधने दाहसु । उठोनि ज्ञानाग्निप्रवेशु । करिता तेथे भस्मलेशु । बोधाचा उरे ॥२६॥
जळि ना जळावेगळ । कापूर न दिसे आडळ । परि होउनि परिमळ । उरे जेवि ॥२७॥
अंगि लाविता विभूति । परमानु तितके झडति । तरि पांडुरत्वे कांति । उरे जेवि ॥२८॥
ना वोहळा अंगि जैसे । पाणि पाणिपणे नसे । तरि वोल्हासाचे मिषे । अथीच कि ॥२९॥
नातरि मध्यान्हकाळि । छाया न दिसे वेगळि । परि असे पांयातळि । रिघोनिया ॥३०॥
तैसे ग्रासुनि दूसरे । स्वरूपि स्वरुपाकारे । आपलेपणे उरे । बोध जो का ॥३१॥
 ते ऋणशेष वाचा इया । न फेडवेचि मरोनिया । हे पायां पडोनि मिया । सोडविले ॥३२॥
म्हणोनि परा पश्यंति । मध्यमा हान भारति । या निस्ताराव्या लागति । ज्ञानेचि पां ॥३३॥
इतिश्री अनुभवामृते वाक्चतुष्टय - ऋण - निरसनं नाम तृतीय प्रकरणम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP