अनुभवामृत - प्रकरण ७ वें
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
यर्हविं तरि अज्ञाना । जै ज्ञानाचि नसे क्षोभना । तै तरि काना । खालीच दडे ॥१॥
आड सुवोनि अंधारि । खद्योत दीप्ति झिरमिरि तेसे हे लटिके वरि । अनादि होय ॥२॥
हे जाणनियाचे घरि । खांचिले अनन न करि । काय चांदणा उठे लहरि । मृगजळाचि ॥३॥
जैसि स्वप्नि स्वप्नमहिमा । कि तमि मान असे तमा । तेवि अज्ञान - गरिमा अज्ञानिचि ॥४॥
कोल्हेरिचे वारु । न अयेति धार धरु । नये लेणा शृंगारु । वोडंबरिचा ॥५॥
आणि ज्ञान जे म्हणिजे । ते अज्ञानचि पा दुजे । एक लपवोनि दाविजे । एक जैसे ॥६॥
परि असो हा प्रस्तावो । अधि अज्ञानशुद्धि घेवो । मग तयाचे लागि लाहो । ज्ञानही लटिके ॥७॥
अज्ञान ज्ञानाते । अधिष्टुन जारे । वर्ते तरि जेथे असे त्याते । नेण कां न करि ॥८॥
अज्ञाने जेथे असावें । तेथे सर्वनेण व्हांवे । ऐसि जाति स्वभावे । अज्ञनाचि ॥९॥
शास्त्रसंमत ऐसे । अज्ञान ज्ञानीच असे । तेने तो गिवसे । आश्रय जरि ॥१०॥
तरि न उठता दुजे । अज्ञान जे बीज । ते अथि हे बुझे । कोण हान ॥११॥
अज्ञान आपणाते । जडत्वे नेणे निरुते । अप्रमाण प्रमाणाते । येत असे ॥१२॥
यालागि अज्ञान । करि आपले ज्ञान । म्हणता घेववि मौन । विरोधचि ॥१३॥
जाणति वस्तु एका ते अज्ञाने कीजे मुर्ख । तै अज्ञान हे लेख । कवण धरी ॥१४॥
आपणयाहि पुरता । नेण न करि जाणता । तया अज्ञान ह्मणता । लाजिजे की ॥१५॥
अभाळे भानु ग्रासे । ते अभ्र कोण्हे प्रकाशे । सुषुप्ति सुषुप्तिस रुसे । तै तेचि कोण्हे ॥१६॥
तैसे अज्ञान असे जेथे । तेचि जरि अज्ञान आंते । तरि अज्ञान अज्ञानाते । नेणत गेले ॥१७॥
नातरि अज्ञान एक घडे । हे जयास्तव निवडे । ते अज्ञान नव्हे फुडे । कोण्हे काळि ॥१८॥
पडळ अथि डोळा । आणि डोळा नव्हे आंधळा । तरि त्या पोकळा । बोलिया कि ॥१९॥
इंधनाचे आंगि । खवळलेनि अगि । न जळे तै वाउगि । शक्तिचि ते ॥२०॥
कोंदोनि धरि । घरा पडसाई न करि । तै अंधारु येहि अक्षरि । न ह्मणावा तो ॥२१॥
वोसरु नेदि जागणे । तियेते नीद कोण ह्मणे । दिवसा नाणि उणे । ते रात्रि कैचि ॥२२॥
तैसे आत्मत्वि अज्ञान असके । असता तो तेणे कां न माखे । तै अज्ञान शब्दा लटिके । आलेच की ॥२३॥
यर्हवि तरि आत्मया । माजि अज्ञान असावया । कारण ह्मणता न्याया । चुकिजे की ॥२४॥
अज्ञान तमपेळइनि । आत्मा प्रकाशाचि खाणि । आता दोहीसि मीळनि । एक कैसि ॥२५॥
निद्रा आणि जागरु । आठव आणि विसरु । इये युग्मे एक हारु । चालति जरि ॥२६॥
सीतातप येकवट । वस्तिच वाहे वाट । तमे बांधिजे मोत । सूर्यरस्मिचि ॥२७॥
नाना राति आणि दिवो । येति एके ठांई राहो । तै आत्मा जीवे जिवो । अज्ञानाचेनि ॥२८॥
हे असो मृत्यु आणि जेणे । ये शोभति मेहुणे । तरि अज्ञाने आसणे । आत्मेनसि ॥२९॥
अहो आत्मेन जे बाधे । तेचि आत्मेनसी नांदे । ऐसि कायसी विरुद्धे । बोलणे ईये ॥३०॥
अहो अंधारपणाचि पैज । सांडोनि अंधारचि तेज । जाला तै सहज । सूर्यचि तो ॥३१॥
लांकुडपण सांडिले । आणि आगिपण मांडिले । तै तेचि आगि जाले । इंधन की ॥३२॥
कां गंगा पावतखेवो । आन पणाचा ठावो । सांडि तै गंगा हो । लाहे पाणि ॥३३॥
तैसे अज्ञान ते अज्ञान नव्हे । ह्मणोनि आत्मा असो लाहे । यहवि अज्ञान ते आहे । वेगळेचि ॥३४॥
आत्मेनसि विरोधि । ह्मणोनि नुरे एक संधि । ना वेगळे तरि सिद्धी । जाईचिना ॥३५॥
लवणाचि मासोळि । होय जरि जिव्हाळित तरी जळि ना जलावेगळी । न जिथे जेवी ॥३६॥
जे येथें अज्ञान नसे । तरीच आत्मा असे । हे बोलणे वायसे । नायकावे की ॥३७॥
दोरि सर्पाभास होय । तो तेणे दोरे बांधो नये । ना दवडणेही न साहे । जयापरि ॥३८॥
ना ना पुनवेचे अंधारे । देहाभेणे रात्रि मोहरे । की येताचि सुधाकरे । गिळिले जेवि ॥३९॥
तियापरि उभयथा । अज्ञानशद्व गेला वृथा । हा तर्कावांचोनि हाता । स्वरुपे नये ॥४०॥
अज्ञानस्वरूप कैसे । कार्यानुमेय असे । कि प्रत्यक्ष दिसे । धांडोळिता ॥४१॥
प्रत्यक्षादि प्रमाणि । कीजे जयाचि घेणि । ते अज्ञानकार्य ह्मणोनि । अज्ञान नव्हे ॥४२॥
अंकुरेसि सरेअळ । वेलि दिसे वेल्हाळ । ते बीज नव्हे केवळ । बीजकार्य ॥४३॥
कां शुभाशुभरूपे । स्वप्नसृष्टि आरोपे । ते नीद नव्हे जाउपे । नीदेचे कीं ॥४४॥
ना चांद एक असे । तो व्योमि दुणा दिसे । ते तिमिरकार्य जैसे । तिमिर नव्हे ॥४५॥
तैसे प्रमाता प्रमेय । प्रमाण हे जे त्रय । ते अज्ञानाचे कार्य । अज्ञान नव्हे ॥४६॥
ह्मणोनि प्रत्यक्षादिकि । अज्ञान कार्य विशेषी । न घेपे ये विखि । आन नाहि ॥४७॥
अज्ञानकार्यपणे । घेइजे ते अज्ञान ह्मणने । तरि घेताति जे करणे । ते तयाचेच की ॥४८॥
स्वप्नि दिसे ते स्वप्न । मा देखता काय आन । तैसे कार्यचि अज्ञान । केवळ जरि ॥४९॥
तरि चाखला गुळ गुळे । माखले काजळ काजळे । काय घेपे दिजे सुळे । आपुले सुळा ॥५०॥
तैसे कारण अभिन्नपणे । कार्यही अज्ञान होणे । ते अज्ञान मा कोण्हे । काय घेपे ॥५१॥
आणि घेते घेवविते ऐसा । व्यवहार ये उमासा । तरि प्रमाण जाला मासा । मृगजळीचा ॥५२॥
जे प्रमाणाचिया मापा । न सांपडेचि बापा । तया आणि खपुष्पा । विशेष काई ॥५३॥
ना हे प्रमाणाचे नुरवी । मा अथि कोण प्रस्तावि । येणेहि बोले जाणावि । अज्ञान उखि ॥५४॥
एवं प्रत्यक्ष अनुमान । यया प्रमाणा भाजन । नहोनि अप्रमाण । अज्ञान जाले ॥५५॥
आत्मया स्वप्न दाउ । न शके करि बहु । परि ठाये ठाउ । निदेजउ न शके ॥५६॥
ना स्वकार्याते विये । कारणपणाहि नये । मा अज्ञान ऐसे बिये । कोण साच ॥५७॥
हे असो जिये वेळे । आत्मपणे नि:खळे । आत्मा अज्ञानमेळे । असे जरि ॥५८॥
न करिता मथन । काष्टि असे अवस्थान । जैसे कां हुताशन । सामर्थ्याचे ॥५९॥
जै आत्मा ऐसे नाव । न साहे आत्मबरव । तै आज्ञान हावं । बांधे तेथे ॥६०॥
काय दीप न लाविजे । तैच काजळि फेडिजे । कि नुगवत्या चाळिजे । रुखाचि छाया ॥६१॥
नुठता देहदशा । के लाविजे चिकसा । न घडता आरसा । उतिजे कायि ॥६२॥
उव्हाचे दुधि । सायेचि व्हावि अधि । मग फेडु या बुद्धि । पवाडु कीजे ॥६३॥
तैसे आत्मयाचे ठाई । जै आत्मपणा ठाव नाहि । तेव्हा अज्ञान हे कायी । कासया ऐसे ॥६४॥
ह्मणोनि तेव्हा अज्ञान नसे । हे जालेचि आहे अपैसे । आता तरि कायसे । नाहि ह्मणो ॥६५॥
ऐसाही आत्मा जेव्हा । नातळे भावाभावा । अज्ञान असे तेव्हा । परि ते ऐसे ॥६६॥
घटाचे नाहीपण । फुटोनि होय चूर्ण । सर्वा परि मरण । मारवले ॥६७॥
कां निदे नीद आलि । मूर्च्छा मूर्च्छित जालि । अंधारि पडलि । अंध कूपि ॥६८॥
अभाव अवघडला । केळिचा गाभा मोडला । चाखळा असुडला । आकाशाचा ॥६९॥
निवटलिया सूदले विष । मुक्याचे बांधले मुख । नुठता लेख । पुसिले जैसे ॥७०॥
तैसे अज्ञान आपले वेळे । भोगि हेहि टवाळ । आता तरि केवळ । वस्तुचि असे ॥७१॥
देखे वांच कैचि विये । विरुढति भाजलि बिये । सूर्य कोण्हा लाहे । अंधाराते ॥७२॥
तैसा चिन्मात्रि चोखडा । भलतैसा अज्ञानझाडा । घेतला तरि पवाडा । येईल काई ॥७३॥
सायेचिये जाडे । डव्हळिता दुधाचे भांडे । ते दिसे कां विघडे । विचारि पा ॥७४॥
नीद धरावया हाति । चेउनि उठला झडति । तरि ते लाभे कि थिति । नाशलि होय ॥७५॥
तेवि अज्ञान ऐसे । पहावया कायसे पिसे । न पाहता अवेसे । न पाहाणेनि गेले ॥७६॥
एवं कोण्हेही परि । अज्ञानभावाचि उजरि । न पडेचि नगरि । विच्याराचिये ॥७७॥
अहो कोण्हेही वेळे । आत्मा अथवा वेगळे । विच्याराचे डोळे । देखते कां ॥७८॥
ना निर्धाराचे तोंड न माखे । हे प्रमाण स्वप्नि नाईके । निरुक्ति हान मुके । अनसाईपणा ॥७९॥
इतुलियाहि भागु । अज्ञान हा मागु । निवे ऐसा बागु । पढता का देवो ॥८०॥
अंवसेचे चंद्रबिबे । निर्वाळालेये शोभे । कां मांडवति खांबे । शशविवानाचे ॥८१॥
गगनफुलाचिया माळा । वांझे जालयाच्या गळा । घापति तो सोहळा । सांगता हा ॥८२॥
अनुन कासविचे तूप । भरु आकाशाचे माप । साचा येति संकल्प । ऐसे ऐसे ॥८३॥
एवं पुढत पुढति । किति अणावे निरुक्ति । आता नाहि ते किति । वटवटु पा ॥८४॥
ह्मणोनि अज्ञान अक्षरे । नुमसु आता नीदसुरे । परि वटवटु पा ॥८५॥
जे आपणा ना आणिकाते । देखोनि होय देखते । वस्तु तैसिया पुरते । नव्हे अंगे ॥८६॥
ते हे आपणापुढे । दृश्य पघळे यव्हडे । आपण करि फुडे । द्रष्टेपण ॥८७॥
जेथे आत्मत्वाचे सांकडे । तेथे हे उठेल यव्हडे । उठले ते तव रोकडे । देखत असे ॥८८॥
न दिसे तरि अज्ञान । आहे हे नव्हे आन । येथे दृश्य अनुमान । प्रमाण जाले ॥८९॥
चंद्र एक असे । तो व्योमि दुर्गा दिसे । डोळा तिमिर जैसे । मानु ये की ॥९०॥
भूमि वेगळि झाडे । पाणि घेति कोण्हिकडे । न दिसति आणि आपाडे । सांजि असति ॥९१॥
तरि भरवसेनि मुळे । पाणि घेति हे न ढळे । तैसे अज्ञान हे कळे । दृश्यास्तव ॥९२॥
चेईलिया नींद जाय । निद्रिता टाउवि नव्हे । परि स्वप्न दाउन आहे । ह्मणो ये की ॥९३॥
ह्मणोनि वस्तु मात्र चोखे । दृश्यादि हे फांके । तरि अज्ञान अथि सुखे । ह्मणो ये की ॥९४॥
अगा ऐसिया ज्ञानाते । अज्ञान ह्मणने केउते । काय दिवो करि तयाते । अंधार ह्मणिपे ॥९५॥
चंद्रापासोनि उजळ । वस्तु राविलि धवल । होय तया काजळ । ह्मणिजेत असे ॥९६॥
आगिचे काज पाणि । निफजा जरि आणि । अज्ञान इया वाहानि । मानु तरि ॥९७॥
कळि पूर्ण चंद्रमा । अणुन मेळवि अमा । तरि ज्ञान ते अज्ञाननामा । पात्र होय ॥९८॥
वोरसोनि लोभे । विष का अमृत दुभे । ना दुभे तरि लाभे । विष ह्मणने ॥९९॥
तैसा जाणनियाचा व्यवहारु । जेथे मावळला सुभरु । तेथे आत्मा आणि पुरु । अज्ञानाचा ॥१००॥
तया नाव अज्ञान ऐसे तरि ज्ञान व्हांवे ते कैसे । यर्हवि कांहि असे । आत्मया काई ॥१॥
कांहिच जया न होणे । होय ते स्वये नेणे । शून्याचि दे वाणे । प्रमाणासि ॥२॥
ऐसे ह्मणावया जोगे । नाचरे कीर अंगे । परि नाहीपणाहि लागे । जोडावांचि ॥३॥
कोण्हाचे आसनेन असे । किं कांहि देखता दिसे । हे अथि तरि कायसे । हारतलेपण ॥४॥
मिथ्या वादाचि कुटी आलि । ते निवांतचि साहिलि । परि विशेषा दिधलि । पाठि जेणे ॥५॥
जो निमालि नीद देखे । तो सर्वज्ञ यव्हाडिया चुके । परि दृश्याचिया न ठके । सोईच जो ॥१०६॥
वेद काई येक न बोले । परि नावचि नाहि घेतले । ऐसे कांहि जोडले । नाहि जेणे ॥१०७॥
सूर्य कवणा न पाहे । परि आत्मा दाविला आहे । गगन व्यापूनि ठाये । ऐसि वस्तु ॥८॥
देह हाडाचि मोळि । मी ह्मणोनि पोटाळि । तो अहंकार । गाळि । पदार्थ हा ॥९॥
बुद्धि बोधा सोंके । ते येव्हडि वस्तु चुके । मनाहूनि कल्पनिके । कोण आहे ॥११०॥
विषयाचिये बरडि । अखंड घांसिति तोंडि । ते इंद्रिये गोडि । न घेति हे ॥११॥
मीपणासगट । खाउनि भरी जे पोट । ते कोण्हाहि कटकट । फावेल का ॥१२॥
जो आपणा नव्हे विषो । तो कोण्हाला हे देखो । जे वाणि न सके चाखो । आपणपे ॥१३॥
जया आपले मुख । पाहावयांचे सुख । न बने मा आणिक । रिगेल के ॥१४॥
हे असो नावेरूपे । पुढासूनि उमोपे । जेथे आलि वासिपे । अविद्या हे ॥१५॥
खेळिजे वाधिकडे ते अंतचि बाहेर सवडे । तैसा निर्णयो सुनाट पडे । केला जेथे ॥१६॥
मस्तकांत निर्धारिलि । छाया उडे जो आपलि । तयाचि फाकावलि । बुद्धि जैसि ॥१७॥
तैसा टनकोनि सर्वथा । ते हे ऐसि व्यवस्था । निर्णयो करि तो चूकता । इये वस्तु ॥१८॥
आतां सांगिजे ते केउते । शब्दाचा संच्यार नाहि जेथे । कि दर्शनाचि तेथें । राणिव अथि ॥१९॥
जयाचेनि बळे । अचक्षुपण अंधळे । फिटोनि वस्तुसि मिळे । देखणि दशा ॥१२०॥
आपलेचि दृश्यपण । उमसो न लाहे आपण । द्रष्ट्रत्वासिहि आण । पढलि असे ॥२१॥
कोण कोण्हा भेटे । दिठि कैचि फुटे । ऐक्यासगट पोटे । अटोनि गेलि ॥२२॥
येव्हडेहि सांकडे । सारुनि येकिकडे । उघडिलि तळवटि । प्रकाशाचि ॥२३॥
दृश्या चिये सृठि । वोपित दिठिवरि दिठि । उठलिसे तळवटि । चिन्मात्रचि ॥२४॥
दर्शन रिद्धि बहुवसा । चित्छेष मातला ऐसा । जे सिळा न पाहे आरसा । वेद्यरत्नाचा ॥१२५॥
क्षणक्षणा नीच नवि । दृश्याचि चोख पदवि । दिठिकरवि वेढवि । उदार जो ॥२६॥
माघील क्षणिचि अंगें । पारसी ह्मणोनि वेगे । सांडुनि दिठि रिघे । नवीया रूपा ॥२७॥
तैसेच प्रतिक्षणि । जाणिवेचि लेणि । लेवउनि चित्त आनि । जाणतेपणा ॥२८॥
तया परमात्मपदि चित्छेष । ना कांहि तया सुसास । आणि होय यव्हडि कास । घातलि जेणे ॥२९॥
सर्वज्ञतेचि परि । चिन्मात्राचे तोंडवरि । परि एकाहि प्रमाणाचे घरि । जाणिजेना ॥१३०॥
एवं ज्ञानाज्ञानाचि मिठि । ते ते फाकतसे दिठि । दृश्यपण ये भेटि । आपलिया ॥३१॥
ते दृश्य मोटके देखे । आणि स्वये द्रष्टत्वे तोषे । तेचि दिठिचेनि मिषेस । माजि दाटे ॥३२॥
तेधवा देणे घेणे घटे । परि ऐक्याचे सूत न तुटे । जैसे मुखाचे मुखवटे । दर्णणे केले ॥३३॥
अंगे अंगावरि पहुडे । परि चेइला वेगळा न पडे । तया वारुवाचेनि पडे । घेणे देणे ॥३४॥
पाणि कल्लोळाचेनि मिषे । आपणपे वल्हावे जैसे । वस्तुवरि वस्तु तैसे । खेळो सुखे ॥१३५॥
गुंफिवा ज्वाळाचिया माळा । लेइलिया अनळा । भेदाचिया विटाळा । पडणे आहे ॥३६॥
कि रस्मिप्वेनि परिवारे । वेढोनि घेतला थोरे । सूर्यासि दूसरे । बोले ये काई ॥३७॥
चांदणियाचा गिवसु । चांदावरि बहुवसु । काय केवळपना त्रासु । देखिजेल ॥३८॥
दळाचिया सहस्त्रवरि । फांके आपुलिये परि । परि नाहीच दूसरि । भाष कमळि ॥३९॥
सहस्त्रवरि बाह्या । सहस्त्रार्जुना राया । तरि तो काय तया । येकोत्तरावां ॥१४०॥
सवकटाचिया वोजा । पदर बहुवे पुंजा । परि तांथुवि दुजा । भाव आहे ॥४१॥
कोडिवरि शब्दाचा । मेळावा जरि वाचेचा । मीनला तरि वाचा - । मात्राचि कि ॥४२॥
तैसे दृश्याचे डाखाळे । नाना दृष्टिचे उमाळे । उठति लेखावेगळे । द्रष्टत्वेहि ॥४३॥
कां गुळाचा बांधा । फुटालिया मोडिचा धांदा । जाला तरि नुसधा । गुळचि तो ॥४४॥
तसे दृश्य दावोनि देखो । कि बहु होउनि फाको । परि भेदाचा नव्हे विखो । तेचि ह्मणोनि ॥१४५॥
तया परमात्मियाचिया भाषा । न पडेचि दुसरि रेषा । जरि विश्व अशेषा । भरले असे ॥४६॥
दुबंधा क्षीरोदकि । वाणे परि अनेकि । दिसति तरि तितुकि । सुते अथि ॥४७॥
पातयाचि मिठि । नुकलिता दिठि । अवघिया सृष्टि । पाहे जरि ॥४८॥
न फुटता बीजकणिका । माजि विस्तारे वट असिका । तरि इया अद्वैतफाका । उपमा अथि ॥४९॥
मग माते मिया देखावे । ऐसे जरि भरे हांवे ।तरि अंगचि ये विसावे । सेजेवरि ॥१५०॥
पातयाचि मिठि । पडलिया दिठि । आपलिया पोटि । रिघोनि असे ॥५१॥
कां नुदेलिया सुधाकरु । आपणपे भरे सागरु । ना कूर्मि गिळि विस्तारु । आपेआप ॥५२॥
अंवसेचे दिवसि । सत्राविये अंशि । स्वये जैसे शशी । रिघणे होय ॥५३॥
तैसे दृश्य जीणता द्रष्टे । पडे जैताचिये कटे । तया नाव वावटे । आपणपाचि ॥५४॥
सहजे आपणचि आहे । तरि कोण कोण्हते पाहे । ते न देखणेचि होय । स्वरूपनिद्रा ॥१५५॥
ना न देखणे नको । ह्मणे मी माते देखो । तरि आपेआप विखो । अपैसा असे ॥५६॥
जे अनादि दृश्यपण । अनादीच देखणे । हे आता काय कोण्हे । रचु जावे ॥५७॥
आवकाशेसी गगन । स्पर्शेसि पवन । का दीप्तिसि तपन । संबधु कीजे ॥५८॥
विश्वपणे उजियेडे । तरि विश्वचि देखे फुडे । नाहितरि तेव्हडे । नाहिच देखे ॥५९॥
विश्वाचे आसणे नाहि । विपाये बुडाले तेहि । तरि दशा ऐसिहि । देखताचि असे ॥६०॥
कापुरा अथि चांदणे । परि तोचि न माखे तेणे । तैसे केवळ जे देखणे । ठाये ठाव ॥६१॥
किंबहुना ऐसैसे । वस्तु भलतये दशे । देखतचि असे । आपणयाते ॥६२॥
मनोरथाचि देशांतरे । मनि प्रकाशोनि नगरे । मग तेथे आदरे । हिंडिजे जैसे ॥६३॥
कां दाटला डोळा डोळिया । डोळाचि चितारा होउनिया । स्फुरे चोख ह्मणोनिया । विस्मयो नाहि ॥६४॥
यालागि एके चिद्रूपे । आपणिया आपणपे । देखिजे का आरोपे । काय काज ॥१६५॥
कीळेचे पांघरूण । अपजवि रत्नकण । सोने ले सोनेपण । जोडजोडु ॥६६॥
चंदन सौरभ वेढि । सुधा आपणपा वाढि । गूळ चाखे गोडि । ऐसे अथि ॥६७॥
की उजाळाचे कळे ‘ कापुरा पूट दीधले । ताउनि उन केले । अगिते काई ॥६८॥
ना जैसि लता । आपले वेलि गुंडाळता । घर करि न करिता । जियापरि ॥६९॥
कां प्रभेचा उभला । दीपप्रकाश संचला । तैसा चैतन्ये गिवसला । चिद्रूप स्फुरे ॥१७०॥
ऐसे आपले आपण । आपले निरिक्षण । करावे येणेवीण । करितचि आसे ॥७१॥
तैसे देखणे न देखणे । हे अंधारे चांदणे । माजो चंद्रत्वा उणे । स्फुरते काई ॥७२॥
ह्मणोनि हे न व्हावे । ऐसेहि करु पावे । तरि तैसाचि स्वभावे । अईता असे ॥७३॥
जे द्रष्ट दृश्य ऐसे । दोन्हिपण अळुमाळ दिसे । तेहि परस्परानुप्रवेशे । कांहि ना कि ॥७४॥
भलतेथे भलतेव्हा । माझारिलिया दुष्टिभावा । आटनि करित खेवा । येति दोन्हि ॥१७५॥
तेथे दृश्य द्रष्टा भरे । द्रष्टेपण दृश्यी सरे । दोन्हि न होनि उरे । दोन्हिचे साच ॥७६॥
कापुरि अग्निप्रवेशु । कां आगि घातला पोतासु । हा नेणिजे सौरसु । वेचु जाला ॥७७॥
एका एक वेंचला । शून्यबिंधु पुसिला । द्रष्टा दृश्याचा मेळा । तैसे होय ॥७८॥
किंबहुना आपुलिया । प्रतिबिंबा झोंबिलिया । झोंबिसगट अटोनिया । जाइजे जेवि ॥७९॥
तसे रुसता दिठि । द्रष्टा दृश्य भेटि । येति तेथे मिठि । दोहिचि पडे ॥१८०॥
न मिळता पूर्वापर । तंवरीचि सरितासागर । मग येकवट नीर । जैसे होय ॥८१॥
किंबहुना हे त्रिपुटि । सहजे होत राहाटि । प्रतिक्षणि भेटि । करीतसे ॥८२॥
दोनि विशेषे गिळि । मग निर्विसिष्टा उगळि । उघड झापि एक डोळि । वस्तुचि असे ॥८३॥
पातया पाते मिळे । कि दृड्मात्र सैंघ पघळे । तिये उन्मिळिता मावळे । नवलाव की ॥८४॥
द्रष्टा दृश्याचे ग्रासि । मद्धे लेख विकाशि । योग भूमिका ऐसि । अंगि गगे ॥१८५॥
उठला तरंग बैसे । पुढिल अंशु नुमसे । ऐसे ठाई जैसे । पाणि होय ॥८६॥
का नीद सरोनि गेली । ज्याग्रति नाहि चेईलि । तेव्हा होय आपलि । स्थिति जैसि ॥८७॥
नाना एका ठाउनि उठि आणि अन्यत्र नव्हे पैठि । हे गमे तैसिया दिठि । दिठि सूता ॥८८॥
कां मावळो सरला दिवो । राति न करि प्रस्तावो । तेव्हा गगना जो भावो । वाखाणिला ॥८९॥
घेतला स्वास बुडाला । घापता नाहि उठला । ऐसा दोहीसि शिवतिला । नव्हे जो अंशु ॥१९०॥
कां अवघाचि करणि । सर्व विषयाचि घेणि । करिता एके क्षणि । जे कांहि असे ॥९१॥
तयासारिखा ठावो । हा निकराचा आत्मभावो । आता येणे हा पाहो । न पाहो लाभे ॥९२॥
काय आपलिये भूमिके । आरसा आपले निके । पाहो न पाहो शके । ऐसे अथि ॥९३॥
समोर पाठमोरया । मुखे होइजे आपलिया । वांचुन आरिसया । ठाकि आहे ॥९४॥
सर्वांग देखणा रवि । परि ऐसे घडे केवि । जे उदो - अस्ताचि चवि । स्वयें घेपे ॥१९५॥
रस आपणया पिये । कि तोंड लपउन ठाये । हे रसपणेचि नव्हे । तया जोगे ॥९६॥
तैसे पाहाणे न पाहाणे । पाहाणेपणेचि हा नेणे । आणि दोन्हिहि येणे । स्वये आसिजे ॥९७॥
पाहणेचि म्हणोनिया । पाहने नव्हे आपणया । तै न पाहाणे अपसया । हाचि आहे ॥९८॥
आणि न पाहणे कैसे । आपणपे पाह्ये बैसे । तरि पाहाणे ऐसे । हाचि पूढति ॥९९॥
हे दोन्हि परस्परे । नांदति येके हारे । बाधूनि येरयेरे । नाहिसि केलि ॥२००॥
पाहायया पाहाणे आहे । तरि न पाहाणेहि हा नव्हे । म्हणोनि याचि सोय । नेणति दोन्हि ॥१॥
एवं पाहाणे न पाहाणे । चोरोनि यया आसणे । ना पाहिले तरि कोण्हे । काय पाहिले ॥२॥
दिसत्यानें दृश्य भासे । तया नाव देखिले ऐसे । तरि दृश्यास्तव दिसे । ऐसे नाहि ॥३॥
दृश्य कीर दृष्टि दिसे । परि साच द्रष्टा असे । आता नाहि तेथे कैसे । देखिले होय ॥४॥
मुख दिसो कां दर्पणि । परि आसणे तया मुखपणि । आलिया निद्रेचिनि हाते । तया स्वप्ना ऐसे येथे ॥२०५॥
देखताचि आपणयाते । आलिया निद्रेचिनि हाते । तया स्वप्ना ऐसे येथे । निहाळिजे ॥६॥
निद्रिस्त तव सुखासनि । वाहिला अन्य वाहणि । ते साच कि तेसनि । पावला दशा ॥७॥
ते निद्रा जेव्हा नाहि । तेव्हा तो जैसा ठाईचे ठाई । तैसाच स्वप्नि कांहि । न दाविजे की ॥८॥
की शिसेविण एके । राज्य करीति रंके । देखिले तैसे सतुके । अथि काई ॥९॥
तान्हेलया मृगतृष्णा । न भेटता सीण जेसना । माते भेटलीया कोण्हा । काय भेटले ॥२१०॥
की साउलिचेनि व्याजे । मेळविले दुजे । तयाचे करणे वांझे । जाले जैसे ॥११॥
तैसे दृश्य करोनिया । द्रष्टयातेच द्रष्ट्या । दावोनि धाडिले वांया । दाविले - पणहि ॥१२॥
जे द्रष्टा तो द्रष्टाचि आहे । मा दावणे कायसे वाये । न दाविजे तरि तो नव्हे । तया काई ॥१३॥
आरसा पाहुन राहे । तरि मुखचि वांया जाय । ना तेणेवीण आहे । आपणपे की ॥१४॥
तैसि आत्मयाते आत्मया । न दाविच पै माया । तरि आत्मा वावो कि वांया । तेचि कि ना ॥२१५॥
ह्मणोनि आपणपे द्रष्टा । न करिता असे पैठा । आता जालाचि या दिठा । कां करावा ॥१६॥
ना मानु ते दाविले । तरि पुनरुक्त जाले । येणेहि बोलिए गेले । दावणे वृथा ॥१७॥
दोरा सर्पाभासा । साचपणे दोर जैसा । द्रष्टा दृशि तैसा । द्रष्टा साच ॥१८॥
दर्पणे आणि मुखे । मुख दिसे हे न चुके । परि मुखि मुख सतुके । दर्पणि नाहि ॥१९॥
तैसा द्रष्ठा दृश्य दोहो । साच कि देखता ठावो । ह्मणोनि दृश्य ते वावो । देखिले जरि ॥२२०॥
वाव कीर होय । परि दिसत तव आहे । येणेहि बोले होय । देखिले ऐसे ॥२१॥
जरि आन आनाते । देखोनि होय देखते । तरि मानो येते । देखिले ऐसे ॥२२॥
येथे देखोनि का न देखोनि । ऐक्य कि नाना होउनि । परि हा वांचोनि । देखणे असे ॥२३॥
आरिसेन हो कां दाविले । परि मुखेचि मुख देखिले । तो न दावि तरि संचले । मुखि मुख ॥२४॥
तैसे दाविते जरि नाहि । तरि हाचि यया ठांई । ना दाविले तरिहि । हाचि यया ॥२२५॥
ज्यागृतीने दाविला । कां निदा हारविला । परि जैसा एकला । पुरुष पुरुषि ॥२६॥
कां रायाते रावो । ऐसा दाविजे प्रत्ययो । तरि ठाये ठावो । राजाचि तो ॥२७॥
ना रायपण राया । न अणिजे प्रत्यया । तरि काय उणे तया । माजि असे ॥२८॥
तैसे दाविता न दाविता । हा यया परौता । चढे ना तुटे आइता । असताचि असे ॥२९॥
अथवा निमित्तवसे । हाचि यया दाउ बैसे । देखते नाहि तै आरसे । देखावे कोणे ॥२३०॥
दीप दावि तयाते रचि । कि तेणे सिद्धि दीपाची । तैसि सत्ता निमित्ताचि । येणेचि साच ॥३१॥
वन्हिते वन्हिसिखा । प्रकाशि कीर देखा । परि वन्हि न होउनि लेखा । येईल कायी ॥३२॥
ह्मणोनि स्वय्म प्रकाशा यया । आपणापे देखावया । निमित्त हा वांचोनिया । नाहिच मा ॥३३॥
आणि निमित्त जे बोलावे । ते येणेचि असोनि दावावे । देखिले तरि स्वभावे । दृश्य ही हा ॥३४॥
भलतेनि विंन्यासे । दृश्यपणे दिसे । हा वांचुनि नसे । येथे कांहि ॥२३५॥
लेणे आणि भांगारे । भांगारचि एक स्फुरे । कां जेथें दूसरे । नाही ह्मणोनि ॥३६॥
जळ तरंग दोहि । जळावांचुनि नाही । ह्मणोनि आन कांहि । दिसे ना नसे ॥३७॥
हो का घ्राणानुमेयो । येवो कां हाति घेवो । लाहा कां दिठि पाहो । भलतैसा ॥३८॥
परि कापुराचे ठाई । कापुरावांचुनि नाहि । तैसे भलतिया रिति पाहि । हाचि यया ॥३९॥
आतां दृश्यापणे दिसो । कां द्रष्टा होउनि असो । परि हा वांचोनि अतिसो । नाही येथे ॥२४०॥
गंगा गंगापणे वाहो । का समुद्र होवोनि राहो । परि पाणिपण नोव्हे । आणिक ते ॥४१॥
थिजावे कि विघरावे । हे अप्रयोजक आघवे । घृतपण नव्हे । अनारिसे ॥४२॥
ज्वाळा आनि वन्हि । न लेखिजेति दोन्हि । वन्हिमात्र ह्मणोनि । आन नाहि ॥४३॥
तैसे दृश्य का द्रष्टा । या दोन्हि दशा वांजटा । पाहाता एकटा । स्फूर्तिमात्राते ॥४४॥
इये स्फुर्तिचिया कडोनि । नाहि स्फूर्ति मात्रा वांचोनि । तरि कोण काय देखोनि । देखतसे ॥२४५॥
पुढे फरके ना दीसते । ना माघे डोकावि देखते । पाहाता येणे ययाते स्फुरद्रूपचि ॥४६॥
कल्लोळे जळि घातले । सोने सोने पांघुरले । दिठिचे पाय गुंतले । दिठिसीचि ॥४७॥
श्रुतिसि मेळविलि श्रुति । दृतिसि मेळविलि दृति । कां तृप्तिसि तृप्ति । वोगरिलि ॥४८॥
गुळे गुळ परवडिला । मेरु सुवर्णे मढिला । ज्वाळा गुंडाळिला । अनळ जैसा ॥४९॥
हे बहु काय बोलिजे । नभ नभाचिये सेजे । तेथे कोण्हे निजिजे । कां जागा कोण ॥२५०॥
हा येणे पाहिला ऐसा । कांहि न पाहिला जैसा । आणि न पाहाता हि तैसा । पाहाताचि हा ॥५१॥
येथे बोलणे न साहे । जाणने न समाये । अनुभव न लाहे । अंग मिरउ ॥५२॥
ह्मणोनि ययाते येणे । या परिचे पाहाणे । पाहतां कांहि कोण्हे । पाहिले नाहि ॥५३॥
किंबहुना ऐसैसे । आत्मेन आत्मा न प्रकाशे । ना चेतवि चेवउ बैसे । ययास्तव ॥५४॥
स्वये दर्शनाचिया सवा । अवघियाचि जात फावा । परि निजात्मभावा । न मोडता ॥२५५॥
न पाहाता ऐसे पाहे । तरि तेचि पाहाणे होय । आणि न पाहाणे न तरि जाय । न पाहाणे पाहाणे ॥५६॥
भलतैसा फाके । परि एकपणा न मुके । संकोचे तरि असिके हाचि अथि ॥५७॥
सूर्याचिया हाता । अंधार नये सर्वथा । मा प्रकाशाचि कथा । ऐकतां कां ॥५८॥
अंधार का उजियेडु । सकळा एक अखंडु । जैसा का मार्तंडु । भलतेथे ॥५९॥
तैसा अवडतिये भूमिके । अरुढलिया कवतुके । परि ययाते हा न चुके । हाचि ह्मणोनि ॥२६०॥
सिंधूचि सीमा न मोडे । पाणिपणा सळु न पडे । वरि मोडुत कां गाडे । तरंगाचे ॥६१॥
रश्मि सूर्य अथि । परि बिंबाबाहेर जाति । ह्मणोनि बोध संपत्ति । उपमा न मनि ॥६२॥
सोनियाचा रवा । रवेपणाचा ठेवा । अवघिया अवयवा । लेणे नव्हे ॥६३॥
आणि पळ्हेचा दोडा । न पडता तढा । जग तव कापडा । भरेना कि ॥६४॥
न फेडिता आडवावो । दिगंतोनि दिगंता जावो । नये मा पावो । उपमा काई ॥२६५॥
ह्मणोनि इये आत्मलीळे । नाहि आन कांटाळे अता ययाचिये तुळे । हाचि होय ॥६६॥
स्वप्रकाशाचिया घांसि । जेविता बहु वेगेसि । वेचेना परि कुसि । वाखोपा न पडे ॥६७॥
ऐसा निरुपमापरि । आपलिये विलासावरि । आत्मा राणिव करि । आपला ठाई ॥२६८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 25, 2016
TOP