अनुभवामृत - प्रकरण ६ वें

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


आणि पुढिला कां आपणपे । जे विसराचेनि हाते हारपे । ते शब्देचि घेपे । अठवोनिया ॥१॥
इतुलिया परोते । चांगावें नाहि शब्दातें । जे स्मारकपणे कीर्तिते । भोगि हा जगि ॥२॥
बाप उपयोगि वस्तु शब्द ! । जिया धरा सधर नाद । अमूर्ताचा विषद । अरसा नव्हे ॥३॥
पाहाते आरसा पाहे । येथे कांहि नवल आहे । परि दर्पणे येणे होय । न पाहातेहि पाहाते ॥४॥
वडिल अव्यक्ताचिया वंशा । उद्यतकर सूर्य जैसा । येणे येके गुणे आकाशा । अंबरत्व ॥५॥
आपण तव खपुष्प । परि फळ दे सद्रूप । शब्द मविते माप । कोण आहे ॥६॥
दिवसाते उरउ गेला । तंव रात्रिचा द्रोह आला । ह्मणोनि सूर्य यया बोला । उपमा नव्हे ॥७॥
प्रवृत्ति आणि निवृत्ति । विरुद्धाहि हात धरिति । ते शब्देचि चालति । येकलेनि ॥८॥
हा अविद्या - अंगि पडे । तै नाथिले ऐसे रुढे । जे न लाहे तीन कवडे । साच वस्तु ॥९॥
विधि - निषेधाचिया वाटा । दाविता हाचि दिवटा । बंध - मोक्ष कळिकटा । सिष्ट हाचि ॥१०॥
शुद्ध शिवाचे शरीरि । हा कुमार जीवत्व भीर । जैसा अंगे पंच्याक्षरि । तेवि हा बोल ॥११॥
जीव देहि बांधला । तो बोले एके सुटला । आत्मा बोलेचि भेटला । आपणपया ॥१२॥
हा साह्य आत्मयाचे । करावया अंगे वेचे । गोमटे काय शब्दाचे । येकैक वाणु ॥१३॥
किंबहुना हा शब्दु । स्मरणदानि प्रसिद्धु । परि ययाहि संबंधु । नाहि येथे ॥१४॥
आत्मया यया बोलाचे । कांहि उपेगा न वचे । स्वसंवेद्या कोण्हाचे । वोझे अथि ॥१५॥
आठवे कां विसरे । विषो होउनि अवतरे । परि वस्तुसि वस्तु दूसरे । असेना कि ॥१६॥
आपण आपणयाते । आठवि विसरे केउते । काय जीभ जिभेते । चाखे न चाखे ॥१७॥
जागतया नींद नाहि । मा जागने घडे काई । स्मरणास्मरणे दोहि । स्वरूपि तैसि ॥१८॥
सूर्य रात्रिते नेणे । मा दिवो काय जाणे । तेवि स्मरणास्मरणे । वस्तुचे ठांई ॥१९॥
एवं स्मरणास्मरण नाहि । तरि स्मारके काज काई । ह्मणोनि इये ठांई । बोल न सरे ॥२०॥
आणिक एक शब्दे । काज कीजे भले सिद्ध । परि धिवसा न बांधे । विच्यारा येथे ॥२१॥
जे बोले अविद्या नासे । मग आत्मया आत्मा दिसे । हे ह्मणतखेवो पिसे - । पण आलेच किं ॥२२॥
सूर्य रातिते मारील । मग आपणा उदो करील । हे कुडे न सरति बोल । साचाचे गांवि ॥२३॥
चेइलिया नीद रुसे । ऐसि नीद एक असे । किं चेईले चेउ बैसे । ऐसे चेणे आहे ॥२४॥
ह्मणोनि नाशावया पुरति । अविद्या नहि निरुति । मा आत्मा आत्मप्रतीति । रिगेल कैसा ॥२५॥
अविद्या तवं स्वरूपे । वांझेचे कीर जाउपे । मा तर्काचे खुरपे । खांडि कोण्हा ॥२६॥
दीपाचिये सोये । अंधार कीर न साहे । परि तेथे कांहि आहे । जावया जोगे ॥२७॥
इंद्रधनुषि शीत । कोण पा न घालिते । ते दिसे तैसे होते । साच जरि ॥२८॥
अगस्तिचिया कवतुका । पुरति जरि मृततृष्णिका । तरि मारे देतो तर्का । अविद्येविषि ॥२९॥
साहे बोलाचि वळघि । ऐसि अविद्या अथि जगि । तरि जाळो ना का अगि । गंधर्वनगरें ॥३०॥
जेथे साउलि न पडे । तेथे नाहि जेणे पाडे । मा जेथे पडे तेथे जोडे । पदार्थ काई ॥३१॥
मृगजळ जेथे नुमंडे । तेथे असे कोरडे । मा उमंडे तेथे जोडे । वोल्हासा काई ॥३२॥
दिसतचि स्वप्न लटिके । ते जागरे होय ठाउके । तेवि अविद्याकाळि सतुके । अविद्या नाहि ॥३३॥
वांडंबरिचिया लेनिया । घरे भरति अतुडलिया । कि नागवे नागविलिया । विशेष काई ॥३४॥
मनोरथाचे परियळ । अरोगु का सहस्त्र वेळ । परि उपवासा वेगळ । आण अथि ॥३५॥
हे दिसे तैसे असे । तरि चित्रिचे पाउसे । बोलावोत मानसे । आगराते ॥३६॥
कालउनि अंधारे । लिहु येति अक्षरे । तरि मसिचे वोरबारे । सिणे कोण ॥३७॥
आकाश काय नीळे । न देखति हे डोळे । अविद्येचि टवाळे । जाण तैसि ॥३८॥
आनि इयेचे अनिर्वाच्यपण । ते दुजे देवांगण । आपला अभाव आपण । साधित असे ॥३९॥
अविद्या येणे नावे । मि विद्यमान नव्हे । हे अविद्याचि स्वभावे । सांगत असे ॥४०॥
ना कांहि जरि आहे । तरि निर्धारु कां न साहे । जेवि घट - भावि भोय । अंकित दिसे ॥४१॥
अविद्या नाशि आत्मा । ऐसि न घडे प्रमा । सूर्याअंगि तमा । घडे योग ॥४२॥
हे अविद्या तरि मायावि । मायाविपण न लपवि । सहजि आलि अभावि । आपुलिया ॥४३॥
बहुतापरि ऐसि । अविद्या नाहि अपैसि । आता बोल हात वसि । कोण्हावरि ॥४४॥
साउलियेते सबळे । खोचिलिया भोइ आदळे । किं हाणतिलिया अंतराळे । थोटावे हातु ॥४५॥
मृगजळाचे पानी । कां गगनाचे अलिंगनि । नातरि चुंबनि । प्रतिबिंबाचे ॥४६॥
उठावला तवका । तवं सुना ठाव पडे असिका । अविद्यानासि तर्का । तैसे होय ॥४७॥
ऐसि हि अविद्या नाशावि । हे कोण्हि वाहेल जिवि । तेणे साल काढावि । आकाशाचि ! ॥४८॥
तेणे सेळि गळा दुहावि । गुढगा वास पाहावि । वाळउनि कांचरि करावि । सांजवेळेचि ॥४९॥
जांभइ वाटुनि रसु । तेणे काढावा बहुवसु । कालउनि आळसु । मोधळा पाजावा ॥५०॥
तो पाटा आणि परतो पडलि सावलि उलथो । वारियाचे तांथु । वळो सुखे ॥५१॥
तो बागुलाते मारो । प्रतिबिंब खोळे भरो । तळहातिचे विंचरो । केश सुखे ॥५२॥
घटाचे नाहिपण फोडो । गगनाचे फुले तोडो । सशाचे मोडो । सिंग सुखे ॥५३॥
तो कापुराचि मसि करो । रत्नदीपि काजळ धरो । वांझेचे लेकरु । परणो सुखे ॥५४॥
अंवंसेचे सुधाकरे । पोसो पाताळिचे चकोरे । मृगजळिचि जळचरे । धरो सुखे ॥५५॥
असो हे किति बोलावे । अविद्या रचलि अभावे । आता काय नाशावे । शब्दे येणे ॥५६॥
जे नाहि तयाचे नाशे । शब्द नये प्रमाणदसे । अंधारि अंधारा जैसे । नोव्हे रूप ॥५७॥
अविद्या नाहि ज्याति । तेथे नाहि ह्मणतया युक्ति । दुपारिच्या होति वाति । अंगणिचिया ॥५८॥
न पेरिता सेति । संवगणि जे जाति । तया लाजेपरित । जोड आहे ॥५९॥
खवनियाचिया अंगा । जेणे केला वळघा । तो न करिता उगा । घरि होता ॥६०॥
पाणियावरि वरखु होता कोण विशेषु । अविद्यानासि उन्मेषु । फांकवे तैसा ॥६१॥
माप मापपणे श्लाघे । जव आकाश मउ न रिघे । तम न पाहता वाउगे । दीपाचे जन्म ॥६२॥
गगनाचि रसयोय । जीभ अरोगु जै जाय । तै रसना हे होय । अडनाव किं ॥६३॥
न निफजतेनि अन्ने । जेवणे तेचि लंघने । निमालेनि नयने । देखणा अंध ॥६४॥
नव्हतेनि वल्लभे । अहेवपण शोभे । खाता न खाता गाभे । केळिचे जैसे ॥६५॥
स्थूळ सूक्ष्म कोण एक । पदार्थ न प्रकाशि अर्क । परि रात्रिविखि अप्रयोजक । जालाचि किं ॥६६॥
दिठिसि काय एक न फावे । परि निदेते न देखवे चेता न संभवे । म्हणोनिया ॥६७॥
चकोराचिया उदिमा । लटकेपणाचि सीमा । जरि दिवसाचि चंद्रमा । गिवसु बैसे ॥६८॥
नुसधिया साचा । मुका होय वाचकाचा । अंतराळि पांयाचा । पेंधा होय ॥६९॥
तैसि अविद्या सन्मुखे । सिद्धांतप्रतिछेदके । उठलि निरर्थके । प्रमाणे होति ॥७०॥
अंवसे आला सुधाकर । न करिच काय अंधार । अविद्यानासि विच्यार । तैसा होय ॥७१॥
आता अचिद्याचि नाहि । हे कीर म्हणु कायी । परि ते नाशिता कांहि । नुरेचि शब्द ॥७२॥
कैसेनहि वस्तु नसे । जै शब्दार्थ होउ बैसे । तै निरर्थकपणे नाशे । शब्दहि थिता ॥७३॥
यालागि अविद्येचिया महुरा । उठलियाहि विच्यारा । अंगचाचि संसारा । होउनि ठेला ॥७४॥
ह्मणोनि अविद्येचेनि मरणे । प्रमाणा येईल बोलणे । हे अविद्याचि नाहिपणे । घडो नेदि ॥७५॥
तरि आत्मा हान आत्मया । दावोनि बोल महिमे इया । येईल हे सविया । विरुद्धाचि ॥७६॥
पाहावया दिवसु । किजे वातिचा सोसु । तो तेव्हडाहि उद्वसु । उदीम पडे ॥७७॥
आपणया आपणासि । लागले लग्न कोण्हे देसि । सूर्य निजांग ग्रासि । ऐसे ग्रहण आहे ॥७८॥
गगन आपणया निगे । सिंधु आपणया रिगे । आपला माथा वळघे । आपण कोण्हि ॥७९॥
चराचरांते पाणि । पाजु येइल येके क्षणि । परि पाणियासि पाणि । पाजु ये काई ॥८०॥
साट तिशा दिवसा । येखादा होय ऐसा । सूर्यास सूर्य जैसा । डोळा दावि ॥८१॥
कृतांत जरि कोपेल । तरि त्रैलोक्य जाळिल । वांचुनि अगि लाविल । आपणा काई ॥८२॥
आपणपे आपणया । समोर व्हावया । दर्पणेविण धात्रया । ठाकि आहे ॥८३॥
दिठि दिठिते रिघो पाहो । शके रुइ रुचिते खावो । चेता आणि चेवो । ते नाहिच किं ॥८४॥
चंदन चंदना लावि । रंगा रंगपणा रावि । मोतिपण मोति लेववि । ऐसे कैचे ॥८५॥
सोनेपण सोने कसि ॥ दीपपण दीप प्रकाशि । रसपण बुडि दे रसि । ते के जोडे ॥८६॥
शिवमुकुट आइता । म्हणोनि चंद्र बैसला वरुता । परि चंद्र चंद्राचे माथा । बैसे काई ॥८७॥
तैसा आत्मराज तंव । ज्ञानमात्र भरिव । ज्ञाने ज्ञाना खेव । कैसे दिजे ॥८८॥
आपुलेनि जाणपणे । आपणा जाणो नेणे । डोळ्या आपले पहाणे । दुवाड जैसे ॥८९॥
दिगंतरा पैलिकडिचे । धाउनि सुरिया खोचे । मा तियेसि तियेचे । अंग फुटे ॥९०॥
आरिसा आपुलिये । अंगि आपणा पाहे । तरि जाण - जाणो लाहे । आपणाते ॥९१॥
रसवृत्ति रस उगाणे । जिव्हा घेउ जाणे ।  परि काय कीजे नेणे । आपणा चाखो ॥९२॥
तरि जिभे हान आपले । पावणे ह्मणो काय ठेले । तसे नव्हे संचले । तेचि ते किं ॥९३॥
तैसा आत्मा सचिदानंदु । आपणया आपण सिद्धु । आता काय दे शब्दु । तयाते तया ॥९४॥
कोणा प्रमाणाचे हाते । वस्तु न घे आपणाते । जे स्वये आइते । घे ना नघे ॥९५॥
ह्मणोनि आत्मा आत्मलाभे । नांदवोनि शब्द शोभे । येइल ऐसा न लाभे । उमस घेवो ॥९६॥
एवं मध्यान्हिचि दिवि । तम दवडि ना दिवो दावि । तेवि उभयता पदवि । बोला जालि ॥९७॥
जे अविद्या नाहिपणे । नाहि तियेते काय नाशणे । आत्मा सिद्धचि मा तेणे । काय साधावे ॥९८॥
ऐसा उभय पक्षि । बोल न लाहोनि नखि । हारपला प्रळयोदकि । वोघ जैसा ॥९९॥
आता बोला भागु कांहि । असणे जया ठांई । अर्थता तरि नाहि । निपठोनिया ॥१००॥
बागुल आला ह्मणते । बोलणे जैसे रिते । आकाश वोळंवते । तळि हान ॥१०१॥
तैसि निरथक जल्पे । इये उठलि सपडपे । शोभति जैसि लेपे । रंगावरि ॥१०२॥
एवं शद्वैकजीवने । बापुदि ज्ञानाज्ञाने । साचपणे वने । चित्रिचि जैसि ॥१०३॥
यया शब्दाचा निमाला । महाप्रळय हो सरला । अभ्रासवे गेला । दुर्दिन जैसा ॥१०४॥ इति श्रीमत् अनुभवामृते शद्बखंडनं नाम षष्ठप्रकरणम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP