राग - जय जयवंती
चाल : सद्गुरु नायके

आजी हरी - दिनीचा मंगल दिन ॥
मंगलदिनी हरीनाम गान ॥धृ॥
एकादशी हे पवित्र व्रत ॥
करती त्यांसी हरी फलद्रुप ॥१॥
पुज्यभावें करावे हरी चिंतन ॥
ठाईच बैसुनी करावे ध्यान ॥२॥
तेणे चित्तासी होय समाधान ॥
निष्काम भावनेने करावे भजन ॥३॥
गोविंदाचे गुण गावे प्रेमे गान ॥
आत्मवृत्ती खुलवी हरिभजन ॥४॥
दासीची नित्य हरीपदी मागणं ॥
जाऊ न द्यावा हरीनामाविण क्षण ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP