ऐकुनी संताची अमोल वचनें ॥
लाऊ मन देहासी तैसे वळण ॥धृ॥
श्रद्धा ठेवीतां देवावरी पूर्ण ॥
तोचि करील आपुले कल्याण ॥१॥
रात्रंदिन करावे हरी स्मरण ॥
तेणे मनासी वाटे समाधान ॥२॥
व्यर्थ जिणें हरीनामाविण ॥
ऐसें वाटावे मनी क्षणोक्षण ॥३॥
दासीची सकला प्रती विनवण ॥
नका घालवु काल नामाविण ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP