राग - झींझोटी
चाल : झाली ज्याची उपवर दुहिता

गोविंद गोविंद जिव्हे तु बोल ॥
होईल जन्म मग सफल ॥धृ॥
गोविंद नामे अती आनंद ॥
भजनीं गातां प्रेमे मुकुंद ॥१॥
जिवाचे जिवन माझा पांडुरंग ॥
आपुल्या भजनी करी मज दंग ॥२॥
असा हरीने लाऊनी छंद
दासी जिवनीं केला आनंद ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP