सामुद्रिक शास्त्राधारे जाणण्याच्या गोष्टी
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
सामुद्रिकशास्त्र, बृहत्संहिताधारे स्त्रीचिन्हांच्या गुणदोषांचे कोष्टक. ( मूळ वचनांचा परिशिष्ट [ अ ] येथे उतारा. ) : सामुद्रिक शास्त्रावर संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ आहेत, व या शास्त्राचा मूळ उत्पादक कोणी समुद्र नावाचा आचार्य ऋषी होऊन गेला तो होय, अशी सामान्यत: लोकसमजूत आहे. या समुद्रऋषीने केलेला म्हणून संस्कृतात एक लहानसा ग्रंथही प्रसिद्ध आहे, व कै. श्री. तुकोजीराव होळकर यांच्या आज्ञेने त्याचे मराठी भाषान्तरही छापण्यात आलेले आहे. याच विषयावर शिवशक्ती नावाच्या एका विद्वान जोतिषाने निराळी लहानसा ग्रंथ लिहिला असून तोही भाषान्तरासुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. पौराणिक ग्रंथात ‘ काशीखंड ’ नावाचा ग्रंथ असून त्यातही या विषयाची चर्चा प्रसंगाने करण्यात आली आहे. या सर्व ग्रंथांचे सामान्यत: तात्पर्य एकच असले पाहिजे, तथापि क्वचित स्थळी मतान्तरे झाल्याचे दिसून येते.
ही सर्व मतान्तरे घेऊन लेख लिहिण्याचे म्हटल्यास पुस्तकाचा विस्तार बराच होईल; परंतु मागे क. ३३ येथे सांगितल्याप्रमाणे या शास्त्रग्रंथांतून प्रतिपादिलेला विषय पुष्कळ अंशी कल्पनामिस्त्रित व संशयित अनुभवाचा असल्यमुळे तसा विस्तार करीएत बसणे अगत्याचे वाटत नाही; व यासाठी या विषयावरील सर्वमान्य ग्रंथांपैकी काही थोड्यांचा मात्र उपयोग केला असता पुरे होणार आहे. ज्योति:शास्त्राच्या ज्ञानाबद्दलचा बाणा बाळगिण्यार्या ज्योतिषी लोकांकडून जे ग्रंथ आदरयोग्य म्हणून मानिले जातात, त्यांमध्ये सर्वमान्य ग्रंथ म्हटला म्हणजे वराहमिहिरकृत बृहसंहिता हा होय. ज्योतिषी लोक या ग्रंथाचा आदरपूर्वक अभ्यास करीत असून त्यांतील ७० व्या अध्यायात सामुद्रिकदृष्ट्या स्त्रियांची लक्षणे व त्यांची शुभाशुभ फ़ळे उत्तम रीतीने वर्णिली आहेत. हा अध्याय सौन्दर्यपरीक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो जसाच्या तसा सबंध परिशिष्ट ( अ ) येथे उतरून घेतला आहे, व या ठिकाणी प्रत्येक अवयवाचे गुणदोष स्पष्टपणे समजण्याकरिता त्याचे फ़क्त कोष्टकरूपाने भाषान्तर करण्यात येत आहे:
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP