आशा - गेलें सुंदर इंद्रचाप विरु...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
गेलें सुंदर इंद्रचाप विरुनी, ते मेघही फांकुनी,
गेला गंध उडून वायुवरती, निर्माल्य झालीं फुलें,
गेले गोड विचारही उडुनिया रम्याकृती घेऊनी
गेलीं भारुनि गोड मोहन अहा तीं रम्य नेत्रोत्पलें !
गेली प्रीति, दिसे स्मशान हृदयीं माझ्या तरि केवढें !
जें जें सुंदर भव्य तें सकळही सोडून गेलें मला;
त्यांची भेट फिरून कां कधिंतरी होईल जीवा तुला ?
कां येथें तर थांबतोस असल्या या दु:खभूमीवर
जा गेले उडुनी तयांसह सुखें वास्तव्य तूंही कर
विश्वाचें पण चक्र अक्षय फिरे यामाजि कांहींतरी
माझी येऊनि भेट देइल मला, हा जीव आशा करी
ती आशा मग सृष्टिबंधनिं पुन्हां जीवास घे गोंवुनी
(हें अद्यापि पक्कें न झालेलें व अपूर्ण सुनीत असावें.)
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP