कृतान्त - चराचरामधि बसुन हालवीं अखि...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
चराचरामधि बसुन हालवीं अखिल विश्व निज हातें
काळरूप मी विश्वनियंता कृतान्त म्हणती मातें,
ग्रहगोलावर पैल दाटली अगाध निस्तुल शांती
भाविजगाच्यानिहार - कणिका निवांत निजल्या असती.
अंधकारमय नाहीं. रविचा प्रकाश जेथे नाहीं.
लावुन बसलों रोख द्दष्टिचा भीषण तसल्या ठायीं,
विश्वारंभीं अग्निशिखामय फुंकर घालुनि यांत
गरगर फिरवुनि दिल्या तारका भिरकावुनि गगनांत
चंद्रसूर्य नक्षत्रमालिका गगनीं भिरभिरतात
मौज पहातों गिरगिर फिरवी जगास माझा हात.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP