घडयाळांतला चिमणा काटा - घडयाळांतला चिमणा काटा टिक...
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.
घडयाळांतला चिमणा काटा टिक टिक बोलत बोल फिरे,
किति हौसेनें धरित चालला एकामागुनि एक घरें.
जवळ थोरले थिरले काटे यास विसांवा नसे परी,
दुडुदुडु चाले चाल आपुली तुलना त्याची त्यास वरी,
परमानंदीं रमतो गमतो चिमणा काटा खरोखरी
चक्र आतलें टिक टिक बोले, त्यापरि हा वरि ताल धरी.
(हीच कविता थोडयाफर बदलानें श्री. कृ.बा. मराठे यांनीं छापली आहे.)
घडयालांतला चिमणा कांटा टिक बोलत गोल फिरे
हें धडपडतें काळित उडतें, विचित्र चंचल चक्र खरें !
घडयाळंतला चिमणा काटा त्याच घरावर पुन्हा पुन्हा
किति हौसेनें उडत चालला, स्वरूप - खिन्नता नसे मना !
जवळ थोरले काटे फिरती त्यास न हेवा कधी परी
डुडदुड चाले चाल आपुली तुलना ज्याची त्यास बरी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP