मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पांचवा| ईश्र्वर कीर्ति प्रसंग पांचवा गुरूच्या सहाय्याची आवश्यकता सच्छिष्याची वाण अपिवत्र-निखंदन उद्धरणाची आवश्यकता दुराचार्यांचाहि उद्धार उद्बोध व्यक्तिगत दुकाळे साधु गोसावी मूढ दोषी सद्गुरु कोण फकीर कोण खरा संन्यासी जोगी कोण खरा जंगम अय्या महात्मा कोण ब्राह्मण कोण खरा बैरागी शेवडा घरबारी कोण मिथ्या वाद ईश्र्वर कीर्ति प्रसंग समाप्ति प्रसंग पांचवा - ईश्र्वर कीर्ति श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत ईश्र्वर कीर्ति Translation - भाषांतर साही दश्रनामध्यें सद्गुरु असे । परी त्याची कृपा कोणी एकास प्रकाशे । येर घेताती द्वैत प्रपंचाचें झांसे । उदंड व्यर्थ मेले ॥१०८॥ज्यासी ईश्र्वराचें ज्ञान होईल । त्यासी ईश्र्वर सत्य भासेल । येर उदंड करितील बोल । आपुलाले मार्गें ॥१०९॥बाहेर उदंड झुंझले झुंझती । त्यांचे पवाडे कीर्ति केल्या करिती । परी त्या मजला नैश्र्वर्य वाटती । ईश्र्वर कीर्तिविण ॥११०॥स्वयें अंतरी झुंजल्याची कीर्ति । कोठें ऐकिली देखिली नव्हती। हें मज अनसुट संगें गवसली पुरती। स्वयें किर्तोन कीर्ति कीर्ताव्या ॥१११॥एकाच्या एका आसर्याने कथन । उदंडाचें केलें करिती कविजन । आपुल्या पुढिलांच्या स्वहितालागून । विरळा कोणी कथिती ॥११२॥गतल्यास वंचिती कन्या कुमर । त्यामागें केला शेकाकार । म्हणोनि कवित्वीं कवीश्र्वर । शोक केल करिती ॥११३॥ईश्र्वरकीर्ति अनुभवप्रचीति । भाव भक्ति वैराग्य सोऽहं स्थिती । येणें प्रकारें जें कवित्वीं अनुसरती । ते साधु ईश्र्वरत्वें ॥११४॥प्रसंग पाचवा समाप्त जाहला । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP