प्रसंग पांचवा - दुराचार्यांचाहि उद्धार
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
सिकलकाराचें सामर्थ्य परियेसा । तदाकार केला मळका आरसा । भीतरी दिसती दाही दिशा । आकाश मही देखील ॥३८॥
सद्गुरु म्हणती तूं आत्मज्ञानें शोधी । मळका आरसा याती पोलादी । तरी शिकलकारें दाविली बुनादी । साक्षी त्याची परिसोनी ॥३९॥
रांजणाचे कांठमोरे महा थोर । उजळ करूं जातां शिकलकार । तंव काळकूट निघतसे अपार । तैसी अशिष्यीं ऐहिक्यता ॥४०॥
शेख महंमद द्रवे शूरत्वपणें । ऐका जी सद्गुरु तोतरी वचनें । तुमचे कृपें तुम्हांसी अनुवादणें । मज लडिवाळणें ॥४१॥
पहा नारळ वरी कठीणपणें । भीतरी रीघ केला असे जीवनें । तैसे तुम्हीं आपुल्या सामर्थ्यपणें । पाषाण हृदयीं संचरावें ॥४२॥
पहा सामर्थ्ये विज कडाडूनि । जेथें पडे तेथें शीघ्र लावी पाणी । पाषाण फोडोनि करी दाणादाणी । महा बळात्कारें ॥४३॥
पहा जळा जिरालें असें फिरंगीस । जगीं जळपणें मिरवी उदास । जेथे घाली तेथें करी रास । मोल पाणीपणें ॥४४॥
आतां बरा शब्दीं गवसलास । सद्गुरु म्हणजे शेख महंमदास । गरूत्वीं करी शिष्यत्वें प्रकाश । सगुणतव हेरीनें ॥४५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP