प्रसंग पांचवा - उद्‌बोध व्यक्तिगत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


तप्त लोह न्यायें जो सद्‌गुरु जाण । पाणी जिरे तैसें शिष्‍याचें लक्षण । ऐसें पाहिजे गुरूसी जिरालेपण । तया नांव सत्‌शिष्‍य ॥४६॥
तो वोळखे मज सद्‌गुरूच्या ठायीं । उत्तम मध्यम कनिष्‍ठ नाहीं । वर्षाव करितां न्यूनता नाहीं । अथेचि ना प्रबोधाची ॥४७॥
हें स्‍वयें वचन केलें सद्‌गुरूनें । पाहे सर्वत्री द्राव केला मेघानें । तैसें अनेक यातीस माझें अवतरणें । विश्र्व तारावयालागीं ॥४८॥
चंदन-बेलकाष्‍टीं हुताशन असे । शेर-हिंगण-रातांजनींहि वसे । प्रकाशल्‍या भाजिती मासे । अग्‍नि शुच तैसा सद्‌गुरु ॥४९॥
खाटिकाची सुरी मांगाची भाली । राजाची फिरंग उंच पदी मिरविली । जिराल्‍या पाण्यानें हीनता नाहीं आली । तैसा स्‍वयें सद्‌गुरु ॥५०॥
पर्जन्यें लावणी सामावे जीवन । उमाटीं जातसे लवंडोन । तैसें हृदयीं पाहिजे सखोलपण । तरीच निज प्रेम सामावें ॥५१॥
पाहे पर्जन्यकाळी स्रवती स्‍वाती । सकळिकांचे ठायीं द्रवती । सागरीं शिंपल्‍यापोटी होय मोती । कुंडीं व्यर्थ गेलें असें ॥५२॥
तैसे त्‍या अभाग्‍याचे कान । प्रत्‍यक्ष चर्मकुडासमान । तेथें कांहीच बोध नव्हे जाण । जैसा वारुळ छिद्रीं वायो ॥५३॥
स्‍वातीं-तोय कर्दळीपोटी होय कापूर । सर्पामुखी विष होय साचार । तैसा सद्‌गुरूवचनें विचार । अशिष्‍यीं केला असे ॥५४॥
अवगुणें साही दर्शनांची सोंगें । पाखांड्यांनीं घेतली अवर्णाच्या रंगे । सद्‌गुरूनीं सांगा आरंभिली भिंगें । सभे-श्रोत्‍यांप्रती ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP