प्रसंग पांचवा - फकीर कोण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


साही दर्शनांचे आचार सगुण । आत्‍मज्ञानें सांगेन त्‍यांचे लक्षण । तें ऐकोन सकळ साधुजन । स्‍वानंदें मानवती ॥७८॥
काजी तो ज्‍यास सांगितल्‍याविण कळे । मनसुबी करितां चित्त ना चळे । सम विषम तुळाधार न्याहाळे । लांच नेघे म्‍हणऊनी ॥७९॥
ज्‍याचें भूषण दूषण त्‍यासीच लावी । ईश्र्वरभजनी आपुलें मन गोवीं । अंतर धुवट करोनी बाहेर दावी । तो जाणा सत्‍य काजी ॥८०॥
मुलाणा तो जो आपुलें मूळ जाणें । आपुलें दुःख तैसे परावें माने । अनिर्वाच्य बांग ब्रह्मांड दणाणे । सोऽहं तसबी फेरी ॥८१॥
अहंकार टोणगा अक्‍कल सुरी । विवेकें कापून भक्षण करी । उन्मनी मशीदींत निमाज गुजरी । तो बोलिजे मुलाणा ॥८२॥
फकीर तो जो राग विषयीं सांडवला । श्र्वास उच्छ्‌वासें नित्‍य आठवी अल्‍ला । देखोनि पळें बाष्‍कळ गलबला । एकांत सुख भोगी ॥८३॥
फकीरपणाचा दावी ना तोरा । स्‍वयें वाटा बुजविल्‍या तेविस तेरा । प्रेमाचा अंमल लागली सहज मुद्रा । सत्‍य तो फकीर जिंदा ॥८४॥
जो स्‍वयें सावस्‍ताचा करील नाश । तोचि संन्यासी अखंड उदास । लोकत्रयाची त्‍यजिली आस । असोनि नसे जगीं ॥८५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP