प्रसंग पांचवा - सद्‌गुरु कोण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


स्‍वप्नीं कळंत्री होन दिधला । जागा जाल्‍या कळंत्र मागों लागला । तेणें परतोनि तोंडावरी हाणीतला । तैसी निमाल्‍या मुक्ति ॥७०॥
गाऊं जाणें तो जाणिजे गायक । नाचों जाणें तो मोहील विश्र्वलोक । परी न होय कीं भवमोचक । सद्‌गुरु स्‍वामी जैसा ॥७१॥
वाचूं जाणें तो वाचणार अक्षरें । पंडित भला म्‍हणवी संस्‍कारें । बोलों जाणें तो बोलला विचारें । परि सद्‌गुरूची सरी न पवती ॥७२॥
लिहिणें पोहणें हे विद्या अभ्‍यास । सायासें करितां होय निजध्यास । परी सद्‌गुरुकृपेचा वेगळा प्रकाश । मती तर्की नेणती ॥७३॥
चौदा विद्या होत्‍या श्रीगणेशापासी । रावणाची घोडीं वळी नृत्‍य करीं निशीं । सद्‌गुरुकृपेविण परदेशी । जाला असे परियेसा ॥७४॥
यालागीं अनेक विद्या शिकविती । ते जाणा विद्या गुरु बोलिजेती । तरी भव तारावयातें न पवती । एका सदगुरुवांचूनी ॥७५॥
ब्रह्मा विष्‍णु रुद्र देव तेहतीस कोडी । जरी येऊनि भेटती आवडी । चौर्‍यांशी लक्षींची तोडूं न शकती बेडी । सद्‌गुरु दात्‍याविण ॥७६॥
ऐसे हे सद्‌गुरु बोलिले येथवरी । भावें ऐकोनि शेख महंमद नमस्‍कारी । तंव सांगों आरंभिली सगुणाची हेरी । ऐका श्रोते सावध ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP