प्रसंग तिसरा - आत्‍मा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



कृपाशक्ति चैतन्येची होय माता । चैतन्य महदेची माया लागे सत्त्वतां । अविद्या महदेची होय सुता । अंगलगे अंगसंगें ॥१००॥
या पाचांचा भ्रतार एक आत्‍मा । पांचहि बोभाती अहो जी मामा । तितुक्‍यांसी जाब देतो वोळा सीमा । भोळेपणाची ॥१०१॥
कीकून होय तो त्‍यांचा पिता । एकीकून होय त्‍यांचा चुलता । त्‍यासी बोभातील रे आमुच्या सुता । आडवा धरूनि पाजिती ॥१०२॥
एक भावोजी म्‍हणोनि आळवी । एक घोडें करूनियां पळवी । एक नातोंडें करूनियां खेळवी । आत्‍म्‍यालागुनी ॥१०३॥
आत्‍मा एकीस म्‍हणतो आई । एकीस म्‍हणतो तूं माझी काई । एकीस म्‍हणतो पहा हो बाई । तूं तंव बहिण माझी ॥१०४॥
एकीस म्‍हणे अहो आईजीसे । एकीस फुईजी म्‍हणे हर्षें । एकीस म्‍हणे तुवां लाविलें पिसें । प्रीतीचें मजलागीं ॥१०५॥
त्‍या एकसरा होऊनी बोलती । तुम्‍ही व्हावेती आमुचे पती । मेहुणे होऊनियां वित्‍पत्ति । विनोद करितां ॥१०६॥
येरू म्‍हणे वो तुमचा पणजा । एकीकून पहा जालों आजा । एकीकून वोळखा पै वोजा । मी माउसा लागे ॥१०७॥
मागुल्‍या बोलती त्‍या सुंदा । आम्‍ही कोठें पर्णिले या भ्रतारा । अष्‍टहि अंगे जाला सोइरा । नातलगपणें ॥१०८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP