मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग तिसरा| अनुसंधान प्रसंग तिसरा जीव निद्रा प्रश्र्निक प्रश्र्नांची आवश्यकता शक्तीचें रूपवर्णन शक्तींचा पृथक बोध पूर्वजन्म-पृच्छा स्वकुलवृत्त सिंधुसरिता दृष्टांत ग्रंथश्रवणफल कृपा व अविद्या महाशक्ती अनुसंधान आत्मा प्रसंगसमाप्ति प्रसंग तिसरा - अनुसंधान श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत महाशक्ती-भेदाभेद-अनुसंधान Translation - भाषांतर कळो न कळों हें ऐकतां धावें । वाराणसीचें स्नान घडे स्वभावें । मूर्खाचें हृदयी नाम नसावें । हा ईश्र्वरें वर दिधला ॥९४॥आतां अनुसंधान केतकीच्या झाडा । जो शुद्ध निपजला केवडा । तो सुगंध कृपेचा असे निवाडा । कांटे ते अविद्येचे ॥९५॥पानें चैतन्येचीं अंग महदेचें । सायंकाळी कोमेजणें निद्रेचें । ऐसें मिश्रितपण पांचा शक्तीचें । वोळखा चराचरीं ॥९६॥जड लोखंडपणें महदेचे असे । जग उमटोनि अविद्याच दिसे । पांढरेपण कृपेचें प्रकाशे । अंगसंगें समस्तांठायी ॥९७॥सुवर्ण तें असे कृपेचा अंश । बिंब तो ईश्र्वराचा प्रकाश । तेथें चहूं शक्तींच लवलेश । झळंबू न शके ॥९८॥हीं नातीं सूक्ष्म दृष्ठीनें पाहिलीं । अनुभव दृष्टीनें देखिलीं । तीं सांगेन करून वेगळालीं । श्रोत्यांतालगुनी ॥९९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP