प्रसंग तिसरा - महाशक्ती

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



ऐका खलविद शक्तीचा निवाडा । बयाजवार शक्तींचा पवाडा । वदनीं गोष्‍टी उमटतील गोडा । नामीं कृपेच्या ॥८७॥
कृपा शक्तीची परावाचा असे । चैतन्याची वैखरी दिसोनि ना दिसे । मध्यमा महदेची विश्र्वास असे । जनामध्यें प्रसिद्ध ॥८८॥
लिंग निद्राशक्तीची पश्यंती । वाचा स्‍थूळ देहसंगें बरळती । हे तंव लहानथोरां प्रचीति । चर्माचीं म्‍हणोनियां ॥८१॥
आत्‍मज्ञान कृपेचे आभास भासे । दुष्‍ट बोलणें अविद्येचें मुख रुसे । शास्त्रज्ञानें महदेचें वर्तन असे । प्रसिद्धपणें जनीं ॥९०॥
चैतन्याची मध्यमा असे वाणी । अविद्या तान्हेली कृपा पाजी पाणी । उचकी लागे महदेची घालणी । कृपा निवांत करी ॥९१॥
श्रोत्‍यांस साष्‍टांग नमस्‍कार । सावध ऐकावा हा भेदाकार । अनुसंधानी चित्तमनें उदार । होऊनियां ऐकिल्‍या चुके नरक उपाव । शेख महंमद म्‍हणे ॥९३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP