प्रसंग तिसरा - शक्तींचा पृथक बोध

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



भूगोलीं बोलती जाहीर । सृष्‍टी तेरा राणियांचा विस्‍तार । कश्यापापासूनि हें चराचर । शास्त्रें शास्त्र बोले ॥२८॥
या चहूं शक्तींस कोठें नाहीं सायिक । पंडित म्‍हणती काय बोले तुरुक । यालागीं सांगा विवेक उन्मेख । ग्रंथ वाढवावया ॥२९॥
सद्‌गुरु म्‍हणती चारी शक्ती वेगळाल्‍या सांगणें। कैशा यास व्याल्‍या मिळालेपणें। हें साधुसंतांचें गुह्यार्थ बोलणें । शास्त्रीं नाहीं लिहिलें ॥३०॥
जो आत्‍मज्ञानानें होईल धडफुडा तो लाधेल ब्रह्मविद्येचा हुडा । स्‍वयें पाहील चहूं शक्तींचा निवाडा । अंतर्यामीं म्‍हणोनियां ॥३१॥
जो अंतर्यामी साक्षात्‍कारी । तो या चहूं शक्‍तींचा निवाडा करी । येरे खटपटती परोपरी । शिजलें  शिजविती ॥३२॥
सायकीनें सायकेंलागी आरंदळला । तो जाणिजे पळाल्‍यामागें पळाला । परी स्‍वयें अनुभवें नाहीं निवाला । पाखांड उचलीतसे ॥३३॥
किती बोलसी ज्ञानयोगें । कथानुसंधान राहिलें मागें । ते गवसूनियां लाग वेगें । ग्रंथ चालता करी ॥३४॥
सद्‌गुरु म्‍हणे ऐक पां राव । पुढें सांगतों उपाव । तो केल्‍यावेगहा न होय वाव । स्‍वहितासी तुझिया ॥३५॥
तुझे शरीरीं भूतांचा मेळा । ते तुज होऊं नेदी सोंवळा । त्‍यांसी वोळखोनियां वेल्‍हाळा । श्रोत्‍यांसी नांवं सांगे ॥३६॥
नांवें सांगोनियां परोपरी । मग त्‍या भूतांचा संग्राम करी । तेव्हां तूं होशील अंबरी । अविनाश तैसा ॥३७॥
तंव शेख महंमद बोले वचन । ही दैवतें भूतें सत्‍य मारीन । परी आणिक एक आठवलें ज्ञान । तें परियेसा स्‍वामी ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP