करुणापर मागणें - अभंग २५ ते २८
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या
२५.
नामयाचे वंशीं जन्मा आलें सुनें । वडिलाचें ठेवणें प्राप्त झालें ॥१॥
संतसज्जनाचें राखितसे द्वार । सुनें सारासार म्हणती मज ॥२॥
प्रपंच थोरला घालोनि आसन । आडवें पैं ध्यान विठोबाचें ॥३॥
गुरुगुरु ऐसा शब्द माझा पाड । घातलें कवाड यमलोकीं ॥४॥
नामयाचा विठा सुनें सुनें एका । पूजिल्या निष्टंका परब्रम्हा ॥५॥
२६.
मरण हें पेरणें जन्म हें उगवणें । हे मायेची खूण जाणीतली ॥१॥
संग तुझा पुरे संग तुझा पुरे । संग तुझा पुरे नारायणा ॥२॥
तूं तरी न मरें मी तरी न मरें । भक्ति हे संचरे हाचि लाभू ॥३॥
विठा म्हणे केशवा ठाईचा मी नेणें । गर्भवास भोगणें तुझी लाज ॥४॥
२७.
वैकुंठनायका आनंदपददायका । यादवकुळटिळका केशीराजा ॥१॥
संसारतारका भक्तजनपाळका । यादवकुळटिळका केजीराजा ॥२॥
भवमुक्तिदायका गोपीमनरंजका । यादवकुळटिळका केशीराजा ॥३॥
विठयाचा स्वामी भक्त प्रेमसुखा । यादवकुळटिळका केशीराजा ॥४॥
२८.
एक होतें द्वैत पैं झालें । एक पाहतां द्वैत कैंचें उरलें ॥१॥
द्वैताचा भास मृगजळीं दिसे । पाहूं गेलें तेथें भास भासे ॥२॥
चहूचें बोलणें सहाचें नेणिव । अठराची जाणीव कैंच तेथें ॥३॥
नागरीचा भाव विठोबाचा दिसे । परत्रींचें पिसें लागुनी ठेलें ॥४॥
नामयाचा विठा नामीं विनट्ला । सर्वस्व हरपला देहभाव ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2015
TOP