करुणापर मागणें - अभंग २२ ते २४

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या

२२.
धरोनी हनुवटी । मेळवीन द्दष्टीद्दष्टी ॥१॥
म्हणे मी ऐसाचि पाहीन । चरण धरोनी राहीन ॥२॥
जेवीं कमळणी दीनकरा । चातका वरुषे जळधारा ॥३॥
बाळक जननी ये भावीं । चकोर चंद्राते आळवी ॥४॥
कृपणाचें ठेविलें धन । तेथुनी न निघे त्याचें मन ॥५॥
विठा विनवी अनुसंधानें । तुज असतां मज काय उणें ॥६॥
२३.
नामयाचे वंशीं मैंद जन्मला । मार्ग हा पाडिला वैकुंठींचा ॥१॥
सत्तरावीचे पाश घेऊनियां हातीं । वाट दिवसरातीं पाडीतसे ॥२॥
मैंदाच्या हाता आला सावकार । भांडारी कुबेर घरीं ज्याचे ॥३॥
नामयाचा विठा सत्य हा मैंद । भुलवुनी गोविंद म्हणवी तुझें ॥४॥
२४.
नामयाचे वंशीं जन्मलें लबाड । साधिलें घबाड विटेवरी ॥१॥
प्रपचासा आम्हीं सोडिलें उदक । वैकुंठनायक आप्त केला ॥२॥
लौकीकाची लाज निश्चयें सोडिली । द्दढ मिठी दिल्ही विठोपायीं ॥३॥
लबाड म्हणती निर्माण पैं झालें । तेथें बुडविलें मीतूंपण ॥४॥
नामयाचा विठा सत्याचा लबाड । प्रपंच काबाड ब्रम्हा केलें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP