करुणापर मागणें - अभंग १९ ते २१

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या

१९.
विठोबाचे बहु उपकार शिरीं । चुकविली फेरी चौर्‍यांशीची ॥१॥
भ्रमणा दु:खाच्या बहुत वेदना । म्हणोनी नारायणा शरण आलों ॥२॥
अनाथाच्या नाथा तूं दीनाचा गोसावी । तोडर तुझ्या पायीं शोभे देवा ॥३॥
कर्ता करविता सर्व तुझी सत्ता । विश्वाचा चाळिता चित्तवृत्ती ॥४॥
विठा म्हणे नाम स्मरे त्याचे मुखीं । बहुकेलें सुखी शरणागतें ॥५॥
२०.
पतितपावन ऐकिलासी कानीं । म्हणोनी चक्रपाणी शरण आलों ॥१॥
जपतप नेणें मूढ मतिहीन । बोबडें गाईन नाम तुझें ॥२॥
मग कृपाळुवा जी वोळला संपूर्ण । वोलावलें मन भक्तिबोधें ॥३॥
विठा म्हणे पूर्वपुन्या कांहीं होतें । तरीच पंढरिनाथें अंगिकारिलें ॥४॥
२१.
ऐसें सुख कोठें आहे । मुक्त मागोन करिसी काय ॥१॥
सांडोनी पंढरीची वारी । मोक्ष मागे तो भिकारीं ॥२॥
सांडोनी वाळवंट । कां बा इच्छिसी वैकुंठ ॥३॥
मुखीं कवळ काल्याचे । ऐसे वैकुंठीं बा कैंचे ॥४॥
नामयाचा विठा खेळे । बाप नामची माझें भोळें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP