मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|विठाचे अभंग|करुणापर मागणें| अभंग १६ ते १८ करुणापर मागणें अभंग १ ते ३ अभंग ४ ते ६ अभंग ७ ते ९ अभंग १० ते १२ अभंग १३ ते १५ अभंग १६ ते १८ अभंग १९ ते २१ अभंग २२ ते २४ अभंग २५ ते २८ करुणापर मागणें - अभंग १६ ते १८ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग १६ ते १८ Translation - भाषांतर १६. विश्वंभरा तुझें नाम गा दुर्लभ । परी केलें सुलभ नामदेवें ॥१॥नामाची सांगडी लावूनियां कांसे । नामदेवें कैसें उतरिलें ॥२॥नाम मज देईं आणिक न मागों काईं । प्रेम तुझे पायीं असों द्यावें ॥३॥पतितपावन देवकीनंदना । हरि नारायणा पद्मनामा ॥४॥मुखीं तुझें नाम आवडी प्रेमाची । मग वैकुंर्ठीची चाड नाहीं ॥५॥सुखाच्या सागरा केशवा उदारा । तो आम्हां सोयरा जिवलगू ॥६॥द्यावा प्रेमसौरसू नामामृतरसू । विठा विष्णुदासु विनवीतसे ॥७॥१७. माय वेल्हाळी लेल्हाळी । ब्रम्हरसा पान्हावली ॥१॥दोहणार चवघेजण । धार सुटेना अझून ॥२॥साहा लागले कासेसी । अठरा करिती निदिध्यासी ॥३॥न कळे ब्रम्हादिकां वाटा । म्हणे नामयाचा विठा ॥४॥१८. आनंदें नाचत पंढरीसी जाऊं । गीतीं गुण गाऊं विठोबाचे ॥१॥पंढरी पावन पुण्यभूमि जाणें । विठ्ठल दर्शनें दोष जाती ॥२॥आनंदें हो प्रेमें नाचों महाद्वारीं । आठवूं अंतरीं घडीघडी ॥३॥आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । घोष हरिनामाचा सदा वाचे ॥४॥विठा नामयाचा चरणीं झाला लीन । सांपडलें धन विटेवरी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP