करुणापर मागणें - अभंग ४ ते ६

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या

४.
बोल तो सधरू बोले तो उदारू । बोल राज्यधरू धीर धर्म ॥१॥
बोल तो न कळे बोल तो न कळे । बोल तो न कळे जाणतेया ॥२॥
बोलाच्या आधारें बोलाच्या विचारें । बोले सर्व सार जिणोनियां ॥३॥
बोले जें अव्यक्त स्वरूप विचारू । ब्रम्हा बोल सारू विठा म्हणे ॥४॥
५.
तूंचि येसी तूंचि जासी । तूंचि भोगिसी गर्भवास ॥१॥
नेणों आम्ही आणिक बापा । तुम्ही याची कृपा चिरंजीव ॥२॥
पापदोन्ही तूंचि भोगिसी । आमुचा नेदिसी भक्तिवांटा ॥३॥
नामयाचा विठा म्हणे केशवराजा । मी दाईज तुझा वांटेकरी ॥४॥
६.
पाय़ीं घातला तोडरू । देखूनि पळाला संसारू ॥१॥
आले हरीदास नेटके । भेणें पळालीं पातकें ॥२॥
हांकारिती सहस्र नामें । रंगीं नाचताती प्रेमें ॥४॥
पताका झळकती अंबरीं । वैष्णव नाचती गजरीं ॥५॥
विठा केशवाचा नटू । बोले कळिकाळासि धटू ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP