मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १|भक्तवत्सलता २| अभंग ११ ते १५ भक्तवत्सलता २ अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५१ अभंग ५२ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७२ अभंग ७३ ते ७७ भक्तवत्सलता - अभंग ११ ते १५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग ११ ते १५ Translation - भाषांतर ११. भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥हें तों नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ॥३॥धूतां लाज नाहीं तुला । दासी जनी म्हणे भला ॥४॥१२. देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचें अवलोकीं ॥३॥उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडें भक्त कथा ॥४॥सर्व सुखाचा सागर । जनी म्हणे शारंगधर ॥५॥१३. दु:खासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥१॥दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥२॥आतां उपाय कृष्णा काय । धांवें माझे विठ्ठल माय ॥३॥निरी ओढितां दुर्जन । झालें आणिक निर्माण ॥४॥ऐसीं असंख्य फेडिलीं । देवीं तितुकीं पुरविलीं ॥५॥तया संतां राखिलें कैसें । जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥१४. ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥माता म्हणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥क्षिराब्धीची वाटी । म्हणे जनी लावी ओंठीं ॥३॥१५. पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥काय वर्णूं हरिच्या गोष्टी । अनंत ब्रम्हांडे याचे पोटीं ॥२॥सेना न्हावी याचे घरीं । अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥राम चिंता ध्यानीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 31, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP