मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|भक्तवत्सलता १|भक्तवत्सलता २| अभंग २१ ते २५ भक्तवत्सलता २ अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ५१ अभंग ५२ ते ५५ अभंग ५६ ते ६० अभंग ६१ ते ६५ अभंग ६६ ते ७० अभंग ७१ ते ७२ अभंग ७३ ते ७७ भक्तवत्सलता - अभंग २१ ते २५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल अभंग २१ ते २५ Translation - भाषांतर २१. द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥गोरा कुंभाराच्यासंगें । चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥कविसच्या वैसोनि पाठीं । शेले विणितां सांगे गोष्टी ॥३॥चोखामेळ्यासाठीं । ढोरें ओढी जगजेठी ॥४॥जनीसंगें दळूं लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥२२. देव भक्तांचा अंकित । कामें त्याचीं सदा करित ॥१॥त्याचें पडों नेदी उण । होय रक्षिता आपण ॥२॥जनी म्हणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥२३. बाळे भोळे ठकविशी । तें तंव न चले आम्हांपाशीं ॥१॥गर्व धरिसी नामाचा । सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥आशा तृष्णा तुम्हांपाशीं । नाहीं म्हणें जनी दासी ॥३॥२४. जेवी जेवीं बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी ॥१॥कनकाचे ताटीं । रत्नजडित ठेविली वाटी ॥२॥आमुचें ब्रम्हा सारंगपाणी । हिंडतसे रानोरानीं ॥३॥गोपाळांचे मेळीं । हरि खेळे चेंडू फळी ॥४॥तुळसीचे वनीं । उभी राहे दासी जनी ॥५॥२५. जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा ।विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद । येउनी नारद कां राहिला ॥३॥कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा । येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 31, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP