मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|प्रल्हाद चरित्र| भाग ६ प्रल्हाद चरित्र भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ प्रल्हाद चरित्र - भाग ६ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpralhadअभंगनामदेवप्रल्हाद भाग ६ Translation - भाषांतर अज्ञान बांळंक तुझा प्रल्हाद धांवा करितां । आणि त्रिभुवन देवता नाभीं नाभींरे आतां । माझा प्रर्हादु असे वो केउता । तो कवणें पां गांजिला ॥१॥वदन पसरूनि विक्राळ । झरझरीत झरे लाळ । नेत्र जैसें वडवानळ । शोषु पाहे जलनिधी ॥२॥संहार झालें नागकुळ । भ्याले अष्ट लोकपाळ । स्वर्गीं सुटली खळबळ । अमरावती इंद्रासीं ॥३॥मग दैत्यातें पाचारितु । लोह खणखणा वाजतु । धाकें अंबर गर्जतु । तेणें कांपे मेदिनी ॥४॥वेटाळूनि चहूं हातीं । विदारिला चपेट घातीं । जैसा रुद्र प्रळ्यांतीं । तैसा हरी दिसतसे ॥५॥दैत्य न मरे कवणेपरी । मग धरिला जानूवरी । नखें उदर फाडूनि सत्वरीं । अस्थिचुर्ण केलिया ॥६॥भोजें नाचत देवता । मुक्ति झाली दैत्यनाथा । नामया स्वामि वरदहस्ता । अभय दाता भक्तांसी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP