मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|प्रल्हाद चरित्र| भाग २ प्रल्हाद चरित्र भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ प्रल्हाद चरित्र - भाग २ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpralhadअभंगनामदेवप्रल्हाद भाग २ Translation - भाषांतर ऐसें हो असतां देव खेळे मेळा । सहित गोपाळा चाल केली ॥१॥भय तें मानुनी स्त्री पाठवी माहेरा । होता तो उदरा भक्तराज ॥२॥अकस्मात् वाटे नारद भेटला । उपदेश केला दैत्यपत्नी ॥३॥हरिमंत्र शुद्ध पडतां श्रवणीं । गर्भस्थ ते क्षणीं स्वहित मानी ॥४॥आठवीत नाम ह्रदय गुंफेंत । कालें तो प्रसूत होता झाला ॥५॥आनंदें भरित मेदिनी भरली । राजा मात आली पुत्र झाला ॥६॥भिकार्यासी दान सभाग्यें करूनि । संतोषला मनीं दैत्यभूप ॥७॥देव होते करीत अनुष्ठान सिद्धी । झाला भक्तनिधी महाराज ॥८॥स्वर्गीं ध्वज केलें उभे देवें सर्व । आनंद वैभव संतोषोनि ॥९॥ऐशापरी बाळ पावतां वृद्धीसी । पंच कर्म त्यासी संस्कार ॥१०॥मग करवी त्याला विद्या अभ्यासाला । गुरु शुक्र झाला सांगावया ॥११॥शंडामर्क नामें शिक्षेसी ठेविला । पढूं तो घातला कुमरवर ॥१२॥समस्त ते बाळ पढती जें कांहीं । गुरूचे ते ठायीं भावयुक्त ॥१३॥प्रल्हादासी पूर्वीं गर्भवास झाला । उपदेश फळला नारदचा ॥१४॥त्याचि छंदें गात हरिनाम अंतरीं । वाचेमाजी हरि आठवीत ॥१५॥गुरु वैरभाव सांगत हरीचा । न मानी तयाचा उपदेश ॥१६॥समस्तां बाळकां सांगे हरिनाम । प्रेमें तो आपण वाखाणीतो ॥१७॥तेणें तीं लेंकुरें हरिरूप जपतांची । हरिरुप साचीं झालीं पाहा हो ॥१८॥गुरु करी चिंता काय रायाप्रती । जाऊनि निगुती सांगों आतां ॥१९॥आपण तो कांहीं न शिके बोलिलें । समस्त लेंकुरें नाशियेलीं ॥२०॥जाऊनि हे मात रायासी निवेदी । कोप करुनि आधीं राजा बोले ॥२१॥मग म्हणे आणा अधमासी येथें । गुरुराज पंथें नेत जात ॥२२॥नाहीं कांहीं भय चिंतनीं हरीचे । आनंद करीत साचें चालिला तो ॥२३॥नामा म्हणे ऐसा भक्तराज बळी । स्मरे वनमाळी ह्रदयांत ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : January 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP