मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|प्रल्हाद चरित्र| भाग ५ प्रल्हाद चरित्र भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ प्रल्हाद चरित्र - भाग ५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpralhadअभंगनामदेवप्रल्हाद भाग ५ Translation - भाषांतर वर्णावया रूप कांहीं स्फुर्ती देईं । नरसिंह तूं होई साह्यभूत ॥१॥मुख तें सिंहाचें शरीर मानवाचें । भयंकर देवाचें रूप असे ॥२॥अनंत भूषणे जडित बाहूचीं । गळां पदकाची थाटी बहू ॥३॥केशर चंदन लावियलें अंगा । अखंड श्रीरंगा देवाजीचे ॥४॥नवनीत तुळशीचीं सुगंधित फुलें । माळा गुंफियले चंपकानें ॥५॥कासे पीतांबर जडित सुंदर । कडदोरा अपार शोभिवंत ॥६॥तोडर ब्रीदाचा विराजत भारी । आनंदला हरि नामा ह्मणे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 12, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP