पूर्वमेघ - श्लोक ८६ ते ९०

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


(८६) आराध्यैनं शरवणभवं देवमुल्लडिघताध्वा
सिद्धद्वन्द्वैर्जलकणभयाद्वीणिभिर्मुक्तमार्ग: ।
ब्यालम्बेथा: सुरभितनयालम्भजां मानयिष्यन्स्रोतोमूर्त्या भुवि परिणतां रन्तिदेवस्य कीर्तिम् ॥

(८७) तेव्हां घेण्या जल तिजकडे, श्यामला ! त्वाम रिघावें ।
भासे पात्र पृथुतर जिचें क्षीणसें दूरभावें ॥
द्दष्टी खालीं अमर करुनी द्दश्य  तैं पाहतील ।
कीं मोत्यांचा सर अवनिचा, ज्या, मधें इन्द्रनील ॥

(८८) ओलांडोनी तिज, मगकरी पात्र तूं रूप तूझें ।
जातां तेथें, दशपरवधूनेत्रकौतूहलांचें ॥
नानारंगीं तुज निरखितां रंगलीं, भ्रूविलासीं ।
जीं अभ्यासें चतुर; गमती कुंदगा भृंगराशी ॥

(८९) ब्रम्हावर्तीं मग जनपदीं पाडुनीयां स्वछाया ।
जें क्षत्रांचें मरणचि, कुरुक्षेत्र तें जा पहाया ॥
जेथें रूंडें सितशरशतें छेदुनी, सव्यसाची ।
धारासारें तव कमलिनी जेविं. वर्षी नृपांचीं ॥

(९०) छायारूपें सखिनयनिंचें तेज घे जी रसाळा ।
बन्धुस्नेहें, ससमर सुरा सोडुनी, राम धाला ॥
सारस्वत्यें पिउनि सलिलें: सेविं तीं, सौम्य ! तूर्ण ।
अंत:शुद्धी मग तुज घडे, तूं जरी कृष्णवर्ण ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP