पूर्वमेघ - श्लोक ६ ते १०
महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.
(६) घेसी जन्मा सुविदित कुलीं पुष्करावर्तकांचे ।
मंत्री, तूं गा ! विबुधपतिचा रूप घेसी रुचे जें ॥
तेणें प्रार्थीं तुज. विधिबळें होउनी बंधुहीन ।
याञ्चा वन्ध्या गुणिजनिं बरी, सत्फला दुर्जनीं न ॥
(७) संतप्तांचा अससि, जलदा ! सखा, स्वामिशापें ।
जी मत्कान्ता मुकलि मजला, तोषवीं ती निरोपें ॥
जाणें तूतें नगरि अलका जेथ यक्षेश्वरांची ।
सद्में इन्दू धवलित करी शर्वभालस्थ जीचीं ॥
(८) आशालोला, पवनपथिं तूं चालतां, पान्थकान्ता ।
न्याहाळीती वरि उचलुनी भालिंच्या कुंतलान्तां॥
येतां तूझे दिन न विधुरा प्रेयसी सेवि कोण ? ।
नोहे माझ्यापरि जरि दुजा, जो पराधीन दीन ॥
(९) मार्गीं तूतें प्रियसुह्रदसे प्रेरिती मंद वारे ।
डावे होती रव मधुरही चातकांचे तुझ्या, रे ॥
गर्भाधानोत्सव तव घडे दर्शनें, जाणुनीयां ।
येती पंक्ती गगनिं तुजला, सारसांच्या, पहाया ॥
(१०) धूमज्योति: सलिलमरुतां संनिपात: क्व मेघ:
संदेशार्था: क्व पटुकरणै: प्राणिभि: प्रापणीया: ।
इत्यौत्सुक्यादपरिगणयन्गुहयकस्तं ययाचे
कामार्ता हि प्रकृतिक्रुपणाश्चेतनाचेतनेषु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP