गोसावीनंदन रचित - सद्‌गुरू गणेशा अचला । सद्...

पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.


सद्‌गुरू गणेशा अचला । सद्‌गुरु गणेशा अमला ।
सद्‌गुरु गणेशा गोपाळा । नमो तुज ॥१.११॥
भक्त तारावया गणपति । धरिली गोपाळश्रमाकृति ॥
आतां मजला हेचि गमति । अवयव ॥१२॥
प्रसन्नता शुंडा सरळ । ज्ञानविज्ञान गंडयुगुळ ।
लुब्ध होति मुमुक्षुअली भ्रमर । ठाईं ठाईं ॥१३॥
अखंड निजात्मश्रवण । निगमागमद्वारें हेचि दोन्ही कर्ण ।
कुंडलें तीं दैदीप्यमान । विराजति ॥१४॥
शुद्धबोधाचा शुभ्र रजत । कैसा झळके एकदंत ।
सहज सुखें अखंडित । अनुभविति भक्त ॥१५॥
सत्‌ - चित्‌ - आनंदपण । सकल विश्वाची खाण ।
अभेदत्वें पूर्ण । त्रिनेत्रा ॥१६॥
त्यावरी अत्यंत सुंदर । सोहंभावाचा फणिवर ।
कैसा शोभे निरंतर । शाजचि ॥१७॥
चतुर्विध आश्रम प्रचंड । ते च्यार्‍ही भुजदंड ।
यथाविधि जे अखंड । विराजति ॥१८॥
सन्मार्गाचा पाशा । सद्‌भावाचा अंकुश ।
ऐशीं आयुधें विशेष । धरिशी तूं ॥१९॥
तृप्त करावया सकळिक । जे आपले भक्तलोक ।
घेतला ब्रह्मानंद मोदक । निज हस्तीं ॥२०॥
प्रपंच परमार्थ जाणे । तुझेचि दोन्ही चरणें ।
उभय ऐक्याचें बोलणें । घडे तुज ॥२१॥
जवळी भक्ति आणि मुक्ति । त्याचि शुद्धबुद्धि शोभति ।
अभयबरदा गणपति । तूंचि असे ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP