मोरया गोसावी रचित - पाहतां त्रिभुवनीं हो दुजा...
पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.
पाहतां त्रिभुवनीं हो दुजा न देखों नयनीं ।
एका मोरयावांचूनी हो मोक्षदाता ॥१॥
अहो, येई तूं मोरया हो त्रयलोक वीसावया ।
जडजीव तारावया हो तूंचि (हाची) एक ॥२॥
अहो आकळु नकळू बा आहेसी सत्यलोकीं ।
नवल अवतार मृत्युलोकीं त्वां धरीयेला ॥३॥
अहो मूषक वाहन हो देव देखिले गहन - ।
महाविघ्न विघ्वंसन हो गणराज (मायबाप) ॥४॥
अहो फरशु, अंकुश कटी बा घेउनियां झडकरी ।
आपुलें ब्रीद साच करी हों गणराज (महाराज) ॥५॥
अहो मोरया गोसावी हो मोरया गोसावी देव योगिया गहन ॥
त्यांचे त्यांचे, ह्र्दयीं संपूर्ण हो नांदतसे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : July 22, 2016
TOP