संत एकनाथ रचित - ॐ नमो अनादि आद्या । वेद व...
पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.
ॐ नमो अनादि आद्या । वेद वेदांत वंद्या ।
वंद्य ही परम वंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥१॥
तुझें निर्धारितां रूप । केवळ अरूपाचें स्वरूप ।
तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप स्वरूपीं तुझ्या ॥२॥
या लागीं जैसा अससी तैसियासी । नमन निरावकाशें सावकाशी ।
तंव अंगत्व मुकलें अंगासी । भज्य भजकांसीं अद्वैत ॥३॥
ज्ञान तेजें सतेज सतेज फरशु । नित्य स्मरणाचा अंकुशु ।
आनंद मोदकाचा सुरसु । मुखीं देसी घासू निज भक्तां ॥४॥
ऐसें ऐकोनि स्तवन । संतोषला गजानन ।
माझे वसवूनिया वदन । वक्ता वचन स्वयें झाला ॥५॥
ऐसा झाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न ।
उन्मेखेसी बोलिला आपण । भावार्थ रामायण चालवी वेगीं ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : July 22, 2016
TOP