चिंतामणी महाराज रचित - मन माझें वेधलें गणराजीं ।...
पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.
मन माझें वेधलें गणराजीं । वृत्ति बैसली तुझे पायीं ॥धृ.॥
अहो वृथा माया लाविली हो कां मज बहु भारी ।
मोहापासुनी सोडवावें अरे तुज म्हणे एकभावें ॥ मन माझें० ॥१॥
अहो पुत्रदारा धनादिका । चाड नाहीं जन लोका ।
शरण कोणा जाऊं आणिका । अरे तूं मजवरी करी कृपा रे । मन माझें० ॥२॥
अहो पतितपावन नाम तुझें आहे रे त्रयलोकीं ।
ब्रीदावळी साच केली अरे मज थोर जोडी झाली । मन माझें० ॥३॥
अहो भ्रमर मन आहे हो लुब्ध तुझे पायीं ।
सुगंधित वास आंला आवागमन खुंटलें रे । मन माझें० ॥४॥
अहो दास तुझा विनवितो चिंतामणी देव ।
दीनरंका तारि वेगीं त्यासी लावी मुक्तिमार्गीं ॥ मन माझें० ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : July 22, 2016
TOP