मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|पंढरीमाहात्म्य| अभंग ३६ ते ४० पंढरीमाहात्म्य अभंग १ अभंग २ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २४ अभंग २५ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ४९ अभंग ५० ते ५३ पंढरीमाहात्म्य - अभंग ३६ ते ४० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव अभंग ३६ ते ४० Translation - भाषांतर ३६.उठाउठी जावों पंढरीस राहों । आनंदें क्षेत्र पाहों वि-ठ्ठलाचें ॥१॥नाम वदनीं घ्यावो चरण ह्लदयीं ध्यावो । रूप डोळां पाहों विठ्ठालाचें ॥२॥जीवें भेटी घेवों आनंदभावें गावों । प्रेमसुख घेवो ह्मणे नामा ॥३॥३७.विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घालीन लोळणी चरणांवरी ॥१॥शिणभाग द्रवाळिला म्हणेल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥हरुषें लोळत जाईन महाद्वारां । भेटाया सामोरा येईल मज ॥३॥उचलोनी सीस पुसील आदरें । मुख पीतांबरें पुसिल माझें ॥४॥धरोनि हनुवटी हनुवटी उठवील हस्तकीं । ठेवीन मस्तकीं अभयकर ॥५॥राई रखुमाई माता सत्यभामा । कडे घेऊनि नामा स्तनीं लावी ॥६॥३८.विठोबाच्या गांबा जाईन धांवोनी । घांलोनी लोळणी चरणांवरी ॥१॥शिणभाग द्रवाळिला म्हणोल । जीविंचें पुसेल जड-भारी ॥२॥हरुषें लोळत जाईन महाद्वारां । भेटाया सामोरा येईल मज ॥३॥उचलोनी सीस पुसील आदरें । मुख पीतांबरें पुसिल माझें ॥४॥धरोनि हनुवटी उठवील हस्तकीं । ठेवीन मास्तकीं अभयकर ॥५॥राई रखुमाई माता सत्यभामा । कडे घेऊनि नामा स्तनीं लावी ॥६॥३९.धांऊनियां मिठी घालीन संतचरणीं । सांगेन वचनीं मनिंचे गुज ॥१॥विठोबाचे गांवा न्यारे एकवेळां । फार आहळला जीव माझा ॥२॥आनंदाचें जीवन पाहेन श्रीमुख । शोक मोह दु;ख हरती माझे ॥३॥विटेसहित चरण देईन आलिंगनु । तेणें माझी तनु ओल्हावेल ॥४॥तुझी आवडते हरीचें अंतरंग । माझे जीवलग प्राणसखे ॥५॥नामा म्हणे विठोबा कृपेची माउली । तेव्हां ते साउली करील मज ॥६॥४०. ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ । जेथें समारंभ हरि-कथेचा ॥१॥तें एक पंढरी विख्यात त्रिभुवनीं । सकळां शिरोमणी चंद्रभागा ॥२॥ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुखरूप । जेथें त्रिविध ताप हारपती ॥३॥ऐसें तीर्थ कोणीं दाखवा सुंदर । गरुड टक्केभार विराजती ॥४॥ऐसें तीर्थ कोणीं दाखवा निर्मळ । जेथें नासे मळ दुष्टबुद्धि ॥५॥नामा म्हणे संतजनाचें माहेर । गातां मनोहर गोड वाटे ॥६॥ N/A References : N/A Last Updated : April 23, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP