मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|पंढरीमाहात्म्य| अभंग ६ ते १० पंढरीमाहात्म्य अभंग १ अभंग २ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २४ अभंग २५ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ४९ अभंग ५० ते ५३ पंढरीमाहात्म्य - अभंग ६ ते १० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव अभंग ६ ते १० Translation - भाषांतर ६.पंढरीचें सुख पाहतां एक घडी । वास कल्प कोडी वै-कुंठींचा ॥१॥आणितां अनुमाना न पवे सरी । महिमा न कळे थोरी सहस्रमुखा ॥२॥हें सुख सुरवरां स्वप्नीं नाही दृष्टीं । जैसें वाळंवटीं तुह्मां आह्मां ॥३॥धन्य चंद्रभागा पुण्य सरोवर । धन्य भीमातीर पुण्य भूमी ॥४॥धन्य नरनारी गर्जती हरिनामें । ऐ-कोनि प्रेमें डोले शूळपानी ॥५॥धन्य वेणुनाद धन्य वृंदावन । धन्य तें महिमान क्षेत्रवासी ॥६॥धन्य पंचक्रोशी धन्य आसपासी । दुम-दुमी अहर्निशीं नामघोष ॥७॥धन्य पशु पक्षि कीटक आणि भृंग । जयां अंगसंग पांडुरंगीं ॥८॥धन्य ते तरुवर अवघे लहान थोर । अवतरले अमर गुप्तरूपें ॥९॥धन्य ते संसारीं वर्तती जीवन्मुक्त । ज्यात आर्त असे पांडुरंगीं ॥१०॥धन्य त्याचा वंश ज्या नामीं वि-श्वास । धन्य विष्णुदास नामा तेथें ॥११॥७.ऐका पंढरीचें महिमान । राउळें तितुकें प्रमाण । ते-थील तृण आणि पाषाण । तेहि देव जाणावे ॥१॥ऐसी पंढरी मनीं ध्याती । त्यांसी तिहीं लोकीं गति । ते आनिका तीर्था जाती । तीं वंदिती तयांसी ॥२॥वाराणसी चालिजे मासा । गोदावरी एक दि-वसा । पंढरी पाऊल परियेसा । ऐसा ठसा नामाचा ॥३॥ऐसें शं-कर सांगे ऋषीं जवळी । सकळ तिर्थें माध्यानळीं । येती पुंड-लीकाजवळी । करिती अंघोळी वंदिती चरण ॥४॥ऐसेनि तिर्थीम पाप झडे । असस्य बोलतां जिव्हा झडे । नाम विनवी संतांपुढें । पंढरी पेठ वोसंडावी ॥५॥८.अगाध भवजळ तरावया दुस्तर । रची पंढरपूर कली-माजी ॥१॥तारु पंढरीनाथ मोलेंविण उतरी । उभा भिमातीरीं वाट पाहे ॥२॥बुडण्याचें भय नाही पैं संसारीं । कलीमाजी पंढरी थोर नाव ॥३॥जया नावेवरी अठराही आवलें । साही खण भले मिरवती ॥४॥चहूंमुखीं जिचा नकळेचि पार । पाहतां विचार सहस्र-मुखा ॥५॥सडया लावी कसे कुटुंबीं नावेवरी । उतरीलें तीरीं केशि-राजें ॥६॥प्रेमाचिया पेठीं बांधोनियां पोटीं । उतरी जगजेठी पांडु-रंग ॥७॥अंगें घाली उडी बुडतिया काढी । ऐसे कल्प कोडी तारियेले ॥८॥तारियेलें सत्य हाचि पैं निर्धार । नामा पैल पार उतरला ॥९॥९.धन्य पंढरीचे सकळही जन । जिहीं सख्य केलें जाण विठठलपायीं ॥१॥विठठल ह ध्यानीं विठठल हा मनीं । विठठल चिंतनीं रात्रंदिवस ॥२॥विठ्ठलविण जया नगमे एक घडी । सर्वस्वें आ-वडी विठठलाची ॥३॥विठठलची माता विठठलचि पिता । भगिनी आणि भ्राता विठठल ज्यांचा ॥४॥विठठलचि मित्र विठठलचि पुत्र । विठठल कुळगोत्र केला जिहीं ॥५॥विठठलचि क्रिया विठठलचि कर्म । विठठल सकळ धर्म कुळदैवत ॥६॥गुज गौप्य जीवींचें विठठला सां-गावें । विठठलें पुरवावें कोड त्यांचें ॥७॥सर्वकाळ करणें विठठलचि कथा । विठठल जडला चित्त जयाचिया ॥८॥विठठल जागृतीं स्वप्नीं आणि सुषुप्तीं । अखंड बोथरती विठठल विठठल ॥९॥ऐसा सर्वस्वेंसी विठठल भजतां । सुख आलें हातां विठठलाचें ॥१०॥नामा म्हणे त्याचें चरणरेणु होऊन । झालों मी पावन ह्मणे आतां ॥११॥१०.पंढरीचे जन अवघे पावन । ज्या जवळी निधान पांडु-रंग ॥१॥विठ्ठलनामें घेणें विठठलनामें देणें । विठठलनामें करणें सकळ काम ॥२॥विठठलनामें क्रिया विठठलनामें कर्म । हाचि प्रिय धर्म जया चित्ता ॥३॥सबराभरित विठठल मागें पुढें । जिकडे जाती तिकडे विठठलचि ॥४॥निरंतर गर्जती विठठल पवाडे । ऐत निवाडे विठठलरूप ॥५॥विठठलनाम सरतें विठठलनाम पुरतें । विठठल नाम ज्यातें भांडवल ॥६॥विठठलनामें करिती अवघा योग क्षेम । नित्य ज्यांचें प्रेम विठठलनामीं ॥७॥सदा ह्लदयीं भरित विठठलाचें प्रेम । हर्षे विठठलनाम गर्जताती ॥८॥विठठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥९॥नामा म्हणे अवघें विठठलचि झालें । विठठलें दिधलें प्रेमसुख ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : April 23, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP